पोस्ट्स

सहज सुुचलेलं लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लम्हा लम्हा

इमेज
जरा फासले पर पहुंचे तो यह एससास हुआ कोई कितने करीब से गुजर कर चला गया था काही लोक अगदी साध्या शब्दात लिहीतात. म्हणजे ते शब्द तुम्ही – आम्ही वापरतो, तेच असतात. पण त्यांचे शब्द आपल्या मनाला भावतात. असं का होत असेल ?. अर्थात, प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी, याचा हटट्ही धरायला नको. काही शब्द असेच अनुत्तरीत राहू द्यायला हवे. जेणेकरून पुन्हा त्यांच्या वाटेला गेलो की काही जुन्या आठवणी उफाळून वर यायला हव्यात. त्या आठवणी नेहमीच जीवंत रहायला हव्यात. म्हणजे काही शब्दांचे अर्थ अगदी व्यवस्थित लागतात. आता दीप्ती नवल यांच्या या दोन ओळी अनुभवायच्या असतील तर सर्व काही जागच्याजागी असून कसं चालेल ? चलो दूर तक अजनबी रास्तो पे पैदल चलें कुछ न कहें अपनी अपनी तन्हाइयां लिये सवालों के दायरों से निकल कर रिवाजों की सरहदों के परे हम यूं ही साथ चलते रहें कुछ न कहें तुम अपनी माजी का कोई जिक्र न छेडो मैं भुली हुई कोई नज्म न दोहराऊं तुम कौन हो मै क्या हूं इन सब बातों को, बस रहने दें कुछ न कहें चलो दूर तक अजनबी रास्तों पे पैदल चलें स्वत:ला विसरून असं जगण्यात एक वेगळीच मजा अस...

बीती हुई एक छोटी घड़ी

इमेज
रिश्ते बनते हैं बडे धीरे से बनने देते सूखे लम्हे को जरा शाख पे पकने देते एक चिंगारी का लगना था कि पर काट दिए आंच आई थी  जरा आग तो जलने देते एक ही लम्हे पे एक साथ गिरे थे दोनों खुद संभलते या जरा मुझको संभलने देते कोणतीही नातं असचं तर असतं. म्हणजे ते तयार व्हायला काही वेळ द्यायला लागतोच. म्हणजे परस्परांना समजून घेण्यात आणि परस्परांची नेमकी ओळख होण्यात वेळ हा लागतोच. आणि तेवढा वेळ जर दिला नाही किंवा द्यायची तयारी नसेल तर मग मात्र समीकरण काही जुळत नाही. आणि मग पुन्हा ते समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करायला लागतो. या स्थितीचं अगदी योग्य वर्णन केलंय. संपुर्णसिंह कालरा उपाख्य गुलजार. आपल्या शब्दांनी जगाला वेड लावणारा अवलिया. नुकतचं (शुक्रवारी) त्यांनी 84व्या वर्षात पदार्पण केल. चेहऱ्यावर मिश्किल हास्य, शुभ्र रंगाचा कुडता, पायजमा आणि डोळ्यांवर साधासा चष्मा अशा रूपात असणारे गुलजार हे 83 वर्षांचे झाले, यावर विश्वास बसत नसला तरी ते सत्य आहे. गुलजार हे एक वेगळचं रसायन आहे. त्यांचं लिखाण अगदी साधं आणि सोपं आहे, फारसा शब्दफुलोरा त्यात कधीच नसतो. पण ते जे कागही लिहीता...

ओळख हरवलेलं शहर

इमेज
धुळे शहरात पारोळा रस्त्यावरच्या गोपाल टी हाऊससमोर (‘पिवर’ चहासाठी प्रसिध्द असलेलं धुळेकरांचं आवडत ठिकाण !) गुड्ड्या नामक गुन्हेगाराचा खून करण्यात आला. सकाळी साडेसहा – सातच्या सुमारास झालेल्या या खुनामुळे अवघं शहर हादरलं, त्याची चित्रफित काही वेळातच संपुर्ण देशभर पसरली. वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमांवर आजपर्यंत या घटनेची चर्चा सुरू आहे. फेसबुक, व्हॉट्स अप सारख्या समाजमाध्यमांवरून सदरची चित्रफित आणखी पसरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तशा सुचना जारी केल्या. गुड्ड्याच्या खुनानंतर शहरात अनेक ठिकाणी फटाके वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. शहराच्या एकूणच आरोग्याच्या दृष्टीने ही घटना अधिक विचार करण्यासारखी आहे. एका गुन्हेगाराबद्दल नागरिकांच्या मानत असलेला संताप व्यवहार्य असला तरी तो अशाप्रकारे बाहेर पडणे विचारी जनांना काळजीत टाकणारा आहे. या घटनेनंतर धुळ्यातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अगोदरच दंगलीमुळे धुळे शहराची विशेष ओळख सर्व देशभर झाली आहेच, त्यात या घटनेमुळे टोळीयुध्दासाठीही शहर ओळखलं जाऊ लागलंय. या सर्व गदारोळात धुळे शहराची न...

आम्ही दांभिक

इमेज
दांभिकता हे आपल्या समाजाच एक वैशिष्ट्य. प्रत्येक गोष्टीत म्हणजे खानपान, कपडेलत्ते, पेहराव, साहित्य, व्यवसाय अशा सर्व बाबतीत दांभिकता दाखवल्याशिवाय आमचं समाधानचं होत नाही. विशेष म्हणजे त्या दांभिकतेचं समर्थन धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा आदींच्या आडून करण्याचं कसब तर अगदी विशेषचं ! म्हणजे एकीकडे ‘आम्ही जात वगैरे मानत नाही’ म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र लग्नप्रसंगी जात आवर्जुन बघायची, अगदी साध्यासाध्या गोष्टी ‘आमच्यात हे चालत नाही असं’ म्हणून टाळायच्या, एकीकडे तोकडे कपडे, अंगप्रदर्शन यावर सडकून टीका करायची आणि दुसरी पैराणिक मालिकांमधील अंगप्रदर्शन आणि तोकडे कपडे भक्तीभावाने बघायचे. त्यातूनच मग ‘सॅटेनिक व्हर्सेस’ लिहिणाऱ्या सलमान रश्दींविरोधात फतवे निघतात आणि ‘बजरंगी सेना’ नामक गणंकांची टोळी खजुराहोच्या शिल्पांवर बंदी घालायची तद्दन आचरट मागणी करते. या दांभिकपणातून आपण वेळीच बाहेर पडले नाही तर समाज म्हणून आपण मागेच राहणार हे नक्की. वेश्या हा शब्द ऐकताच  अंगावर पाल पडल्यासारखे  "शी"  असे किंचाळणारे आपण प्रतिष्ठित नागरिक आपल्यात आणि वेश्येत  फारसा फरक नाही  ...

पाऊस

इमेज
पाऊस... तसं पाहायला गेलो तर तीन अक्षरी, अगदी साधा शब्द. इतर शब्दांसारखाच अगदी. पण हा शब्द आपल्या प्रत्येकासाठी अगदी खास, जिवाभावाचा. लहानपणापासून आपल्याला हा पाऊस वेड लावत असतो. पाऊस आला रे आला की लहानपणी कागदाच्या होड्या सोडायला अगदी वेड्यासारखे धावत सुटायचो आपण. त्यासाठी कित्येकदा आई-बाबांचा ओरडा (आणि मारसुद्धा !) आनंदाने सहन करायचो आपण. कागदाच्या होड्या सोडण्यात, पावसात मनसोक्त नाचण्यात, डबक्यातलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात एक वेगळीच नशा असायची. त्यावेळी डबक्यातलं पाणी खराब वगैरे असत, त्यामुळे विविध आजार होतात हे असे विचार मनातही नसायचे आपल्या. तर असा पाऊस एकच असला म्हणजे जगाच्या सर्व भागांमध्ये तो सारखाच असला तरी त्याला अनुभवायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. शेतकऱ्याचा पाऊस, लहान मुलांचा पाऊस, कुटुंबाचा पाऊस, गरीबाचा पाऊस, श्रीमंताचा पाऊस, मित्रांचा पाऊस, मैत्रिणींचा पाऊस, प्रेमात पडू पाहणाऱ्यांचा पाऊस, प्रेमात पडलेल्यांचा पाऊस, प्रेमभंग झालेल्यांचा पाऊस (ही यादी आणखीही वाढवता येईल) अशा प्रत्येकाचा पाऊस हा वेगळाच असतो हे मात्र नक्की. हा पाऊस आपल्याला दरवषी भेटत असतो, प...

सर्जनशिलता हेच डिजीटल आव्हानाला उत्तर

इमेज
  पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत 16 मे 2017 रोजी अर्थअभ्यासक अभय टिळक यांचे ‘ आव्हान डिजीटल विश्वातील रोजगाराचे ’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यात त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. सध्याच्या परिस्थितीत डिजीटल आव्हानाचा सामना करणं हे प्रत्येक राष्ट्रासाठी महत्वाचं आहे, आणि भारतासाठी तर ते अधिकच महत्वाचं. अवघ्या सातच वर्षांनंतर ही व्याख्यानमाला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करेल. त्या वसंत व्याख्यानमालेसारख्या पुण्यातल्या प्रतिष्ठीत आणि प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या मालेत मला बोलायची संधी दिल्याबदद्ल मी संयोजकांचा आभारी आहे. अर्थशास्त्रासारख्या विषयावर मला बोलायला सांगितल्याबदद्ल संयोजकांचे आभार. एक योगायोग असा आहे की या व्याख्यानमालेचे प्रणेते महादेव गोविंद रानडे हे हिंदी अर्थशास्त्राचे जनक. आणि प्रामुख्याने भारतासारख्या परसत्तेच्या अधीन असलेल्या देशाची अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर कशा प्रकारचं प्रशासन, योजना आणि कशाप्रकारच्या लोकेच्छा अंगिकारल्या पाहिजेत त्यासाठी न्यायमूर्तींनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि रानड्यांच्या आगेमागे म्हणजे फुल्यांपासून ते आंबेडक...

दीड वर्षाने मिळाली ‘ती’ सायकल...

इमेज
‘विक्रम पेंडसे सायकल्स- अ जर्नी इन्टू द पास्ट’ सायकल. आपणा सर्वांची पहिली दुचाकी. सायकल म्हटलं की अनेक गोष्टी आपसूकच डोळ्यासमोर तरळून जातात. म्हणजे अगदी हट्ट करून घेतलेली पहिली सायकल, लंगडी करत सायकल शिकणे, मित्रमंडळींसोबत सायकलच्या लावलेल्या शर्यती, सायकलला खास रेडीयम वगैरे लावून सजवणे, नियमित तेलपाणी करणे, घाईच्या वेळी सायकलची हमखास उतरणारी चेन आणि अगदी भर रस्त्यात सायकल उलटी पाडून बसवलेली ती चेन, त्यात आॅईलने माखलेले हात... एक ना दोन अशा अनेक आठवणी. विक्रम पेंडसे कालांतराने मग सर्वांच्याच आयुष्यातून सायकल रजा घेते आणि आपण मोटरसायकलला सरावतो. पण तरिही अगदी व्यायामासाठी का होईना, पुन्हा सायकलकडे वळतोच आपण. कारण आयुष्यातली पहिली गोष्ट माणूस सहसा विसरत नाही. मग ते प्रेम असो की सायकल ! आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी बाबांच्या अॅटलासच्या सायकलच्या दांडवर बसून मनसोक्त फेरफटका मारल्याचं आठवत असेलच... तर अशा या सायकलबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे पुण्यातल्या विक्रम पेंडसे या सायकलप्रेमीनं चक्क तीन मजली सायकलचं अनोखं असं संग्रहायलय उभारलय. अवघ सायकलविश्व सामावलंय त्यात. पुणे तसं सायकल...

साँझ की दुल्हन...

इमेज
आनंद. १९७१ सालातला ऋषिकेश मुखर्जींचा सिनेमा सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेला अफाट सिनेमा. हा सिनेमा एकदा बघितल्यावर कधी समाधान होतच नाही. म्हणजे अगदी वारंवार बघितला तरी तो प्रत्येक वेळी अगदी नवा (हो नवाच !) भासतोस. म्हणजे तोच आनंद, तोच डॉ. भास्कर बॅनर्जी, तेच रामुकाका आणि डॉ. कुलकर्णी आणि आनंदला झालेला लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटस्टाइन या अवघड नावाचा कॅन्सरही तोच. एक वेगळीच जादू या सिनेमात आहे. आता त्यात अर्थातच ऋषिकेश मुखर्जीं, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा वाटा सर्वाधिक आहे. सोबत त्यात असलेली गाणी एक वेगळंच वातावरण तयार करतात. अगदी प्रत्येक गाणं अगदी आठवणीत राहणारं आहे या सिनेमातलं. म्हणजे सुरुवातीचं ‘मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने’ असो की ‘जिंदगी कैसी ये पहेली’ असो. त्यापैकी ‘कहीं दुर जब दिन ढल जाए’ हे तर अगदी खास गाणं. म्हणजे हे गाणं ऐकताना जे आपल्यासाठीचं लिहीलंय याची प्रत्येक वेळी खात्री पटते. म्हणजे आनंद गॅलरीत उभं राहून, क्षितिजाकडे पाहत ‘कही दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं म्हणतो तेव्हा ते गाणं ऐकताना तू नकळत आपणही वेगळ्याच व...