बीती हुई एक छोटी घड़ी
रिश्ते बनते हैं
बडे धीरे से
बनने देते
सूखे लम्हे को जरा
शाख पे पकने देते
एक चिंगारी का लगना था
कि पर काट दिए
आंच आई थी
जरा आग तो जलने देते
एक ही लम्हे पे
एक साथ गिरे थे दोनों
खुद संभलते
या जरा मुझको संभलने देते
कोणतीही नातं असचं तर असतं. म्हणजे ते तयार व्हायला काही वेळ द्यायला लागतोच. म्हणजे परस्परांना समजून घेण्यात आणि परस्परांची नेमकी ओळख होण्यात वेळ हा लागतोच. आणि तेवढा वेळ जर दिला नाही किंवा द्यायची तयारी नसेल तर मग मात्र समीकरण काही जुळत नाही. आणि मग पुन्हा ते समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करायला लागतो. या स्थितीचं अगदी योग्य वर्णन केलंय.
संपुर्णसिंह कालरा उपाख्य गुलजार. आपल्या शब्दांनी जगाला वेड लावणारा अवलिया. नुकतचं (शुक्रवारी) त्यांनी 84व्या वर्षात पदार्पण केल. चेहऱ्यावर मिश्किल हास्य, शुभ्र रंगाचा कुडता, पायजमा आणि डोळ्यांवर साधासा चष्मा अशा रूपात असणारे गुलजार हे 83 वर्षांचे झाले, यावर विश्वास बसत नसला तरी ते सत्य आहे.
गुलजार हे एक वेगळचं रसायन आहे. त्यांचं लिखाण अगदी साधं आणि सोपं आहे, फारसा शब्दफुलोरा त्यात कधीच नसतो. पण ते जे कागही लिहीतात ते आपल्याला थेट भिडणारं मात्र असतं. त्यांच्या लेखणीतून बाहेर पडणारी अक्षरं ही तुम्ही आम्ही वापरतो तीच असतात, मात्र खास ‘गुलजार टच’ त्याला लाभतो आणि ते शब्द काहीतरी खास होतात.
जाने कैसे बीतेंगी ये बरसातें
मांगे हुए हैं दिन, मांगी हुई रातें
धुआं धुआं सा रहता है
बुझी बुझी आंखों में
सुलग रहें हैं गीले आँसू
आग लगाती है ये बरसाते
जाने कैसे बीतेंगी...
भरा हुआ था दिल शायद
छलक गया हैं सीने में
बहने लगे हैं सारे शिकवे
बडी गमगी हैं दिलकी बातें
जाने कैसे बीतेंगी...
अनेक आठवणी, प्रसंग असे असतात की ते आठवल्याशिवाय राहतंच नाहीत. त्यात पाऊस पडत असतो, वातावरण धुंदकुंद झालेलं असतं, खिडकीत बसून आपण पाऊस अनुभवत असतो आणि एका बेसावध क्षणी त्या साऱ्या आठवणी एका मागोमाग एक आठवायला लागतात. तो काळ अगदी अल्पसा असतो, पण तो फार मोठा असल्याचा भास आपल्याला होत असतो. तो क्षण लगेच संपावा आणि दीर्घकाळ तसाच रहावा, अशा संमिश्र भावना असतात त्यावेळी मनात, गुलजार यांनी या काव्यात ती भावना अतिशय चपखळ मांडली आहे. गुलजार म्हणजे खऱ्या अर्थाने शब्दप्रभू. त्यांनी लिहीलेल्या दीर्घकविता असो की अगदी चार ओळी. त्या आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतात, हे मात्र नक्की. खूप काही आठवायला आणि विसरायलाही भाग पाडतात गुलजार आपल्याला. आता हे आनंद सिनेमातंल गाणंचं बघा ना,
छोटी बातें, छोटी छोटी बातों की है यादें बडी
भूले नही, बीती हुई एक छोटी घडी
जनम जनम से आंखो बिछाई तेरे लिए इन राहों ने
गुलजार आपल्या शब्दांनी सर्व काही अगदी सोपं करून टाकतात. म्हणजे जे व्यक्त करण्यासाठी आपण खूप विचार करत असतो, नेमके शब्द शोधण्याचा प्रयत्न करत असतो, ते सर्व गुलजार अगदी मोजक्या शब्दात सांगून मोकळे होतात.
जब भी ये दिल उदास होता है
जाने कौन आस-पास होता है
होंठ चुपचाप बोलते हों जब
सासं कुछ तेज तेज चलती हो
आंखें जब दे कहीं हों आवाजे
ठंडी आहों में सांस जलती हो
जाने कौन आस-पास होता है
मन जेव्हाही असं उदास होतं, तेव्हा कुणाकडे तरी ते मोकळं करण्याची गरज असते. पण तेव्हाच आपल्याला कुणाशीही बोलावसं वाटत नसतं, व्यक्त व्हावसं वाटत नसतं, मग वेगळ्याच अश्या गुंत्यात आपण अडकून पडतो. रात में जब भी आंख खुले
कुछ जरा दूर टहलने के लिए
नंगे पाव ही निकल जाता हूं
आकाश उतर के
कहकशां छू कर निकलती है जो पगदंडी
अपने पिछवाडे के संतूरी सितारे की तरफ
दूधिया सितारों पर पांव रखता हूं
चलता रहता हूं यह सोच कि मैं
कोई सय्यारा अगर जागता मिल जाए कहीं
एक पडोसी की तरह पास बुला ले शायद
और कहे
आज की रात यहीं रूक जाओ
तुम जमीं पर हो अकेले
मैं यहां तन्हा हूं
आपली अशी अवस्था खरं तर अनेकदा होत असते. म्हणजे अचानक एकटेपणा जाणवायला लागतो, त्यातून बाहेर पडण्यासाठी मग आपण विविध उपाय करण्याच्या मागे लागतो. पण ती अवस्था काही आपली पाठ सोडत नसते. मग कधीतरी चांदण्या रात्री एकटेच बाहेर पडल्यावर चांदण्यांशी आपली गाठ पडते आणि मनसोक्त गप्पा होतात. मग कुठेतरी एकटेपणातून बाहेर येत असल्याची जाणीव मनाला होते आणि त्या गप्पांत आपण रंगून जातो पुन्हा.
● पूर्वप्रसिद्धी: 'सहज सुचलेलं', दै. आपला महाराष्ट्र, २० ऑगस्ट २०१७
गुलज़ार...
गुलज़ार यांचा आज ८३ वा जन्मदिवस...त्यानिमित्ताने त्यांच्या लिखाणाबद्दल भावना व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा