पोस्ट्स

मे, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुरूवात परिवर्तनाची

२६ मे २०१४ रोजी श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली आणि देशाच्या इतिहासात एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. हे पर्व आहे विकास आणि सुशासनाचे. १६ मे २०१४ ला जो निकाल आला, तो फक्त एका पक्षाचा विजय आणि दुसऱ्या पक्षाचा पराभव एवढाच नसून देशाच्या राजकारणात झालेल्या एका मोठ्या बदलाचं ते प्रतिक आहे. नरेंद्र मोदी यांचे सर्वांत मोठे श्रेय म्हणजे त्यांनी भारतीय राजकारणाला प्रचलित धर्म आणि जात यांच्या विळख्यातून सोडवून विकासाच्या मार्गावर आणले. हे एक महत्वपूर्ण परिवर्तन आहे. कालपासून (२६ मे २०१५) मोदी सरकारचे दुसरे वर्ष सुरू झाले आहे. अनेक बाबतींत मोदी सरकारचे एक वर्ष हे वैशिष्ट्यपुर्ण राहिले आहे. त्यावर एक नजर टाकूया : ·          अर्थव्यवस्था : मागच्या एक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. जीडीपी विकास दर ४% झाला आहे. एफडीआय इक्विटी इनफ्लो ३९% ने वाढून $२८८१३ मिलियन इतका झाला आहे. १ एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू झाल्यावर कर प्रणाली आणखी सोपी होईल. ·           जनधन योजना : देशातील जास्तीतजास्त लोकांना बॅंकेत खाते उघडण्याची संधी. सर

गोष्ट भास्कर बॅनर्जींची......

इमेज
काही व्यक्तिरेखा आपल्याला इतक्या आवडून जातात की आपल्या मनात त्या घर करून बसलेल्या असतात. मग त्या व्यक्तिरेखेला आपण एकतर पुस्तकात वाचलेलं असत किंवा एखाद्या नाटकात नाहीतर चित्रपटात पाहिलेलं असत. त्या व्यक्तिरेखेत आपण कळतनकळत इतके गुंतलेलो असतो की वास्तवातही त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. डॉ. भास्कर बॅनर्जी (आनंद - १९७१) मनात घर करून राहिलेली अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे ‘भास्कर बॅनर्जी’. तर हे पहिल्यांदा भेटले ते १९७१च्या ‘आनंद’ या चित्रपटात डॉ. भास्कर बॅनर्जी म्हणून. ‘आनंद’ हा चित्रपट म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यांचा हृद्यस्पर्शी अभिनय. अगदी कधीही आपण बघू शकतो असे मोजकेच काही चित्रपट असतात, त्यात ‘आनंद’चा समावेश हमखास होतोच होतो. त्यात राजेश खन्ना यांनी साकारलेला ‘ आनंद ’ अप्रतिमच आहे. पण वरवर अगदी शिस्तप्रिय, अबोल (आणि थोडासा खडूसही ! )पण तितकाच हळवा असा अमिताभ बच्चन यांनी साकारलेला ‘डॉ. भास्कर बॅनर्जी’ आपल्या आपल्या मनात एक जागा पक्की करून टाकतो. सुरुवातीला आनंदवर चिडचिड करणारा, एका चौकटीत स्वतःला बंदिस्त करून घेतलेला आणि फक्त आपल्या कामातच गढलेला डॉ. भास्क

'ती' आणि 'तो'

इमेज
त्याला ती आवडलेली. अगदी पहिल्यांदा पाहिल्यावरच. Love at First Sight म्हणतात ना. तसच घडलं. तिलाही तो आवडलेला. मग एक दिवस त्याने तिला मनातलं सर्व सांगून टाकलं. तिनेही ते ऐकून घेतलं. ते सर्व सांगतांना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सुखावून गेलेला त्याला . तो हे सर्व बोलणार जणू काही माहितीच होत तिला. त्याला अपेक्षा होती तिच्या होकाराची. पण तिचा नकार आला. मग तो अस्वस्थ काही दिवस. नंतर सावरलाही. त्याचं एकमेकांशी बोलणही सुरु झाल पुन्हा. मग एक दिवस एकदम तिने विचारल. ‘मी अजूनही आवडते तुला ?’ ‘माझी अजूनही आठवण येते’ तो तेव्हा खोट बोलला – ‘नाही’ (तो सर्वांत मोठा मुर्खपणा होता त्याचा हे नंतर जाणवलेलं त्याला.) मग पुन्हा नेहमीसारखे ‘मित्र’ झाले ते एकमेकांचे. (खर तर एकदा प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीसोबत मैत्री नसतेच आपली.) पण खर तर सर्व बदललेलं होत. ते दोघ बोलायचे तेव्हा मनात काहीतरी वेगळच असायचं. ते दोघ भेटायचे तेव्हाही मनात काहीतरी वेगळच असायचं. पण तो विषय कुणीही काढत नव्हत. मग असचं एकदा ते भेटले. तेव्हा तिने त्याला प्रेमाची