पोस्ट्स

जानेवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वनवासी कल्याण आश्रम

इमेज
वनवासी कल्याण आश्रम. देशातील आदिवासी भागात काम करणारी एक स्वयंसेवी संघटना. संघटनेची आणखी एक ओळख म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नामक संघटनेच्या परिघातील म्हणजे ‘संघ परिवार’ यातील एक संघटना. संघटनेची स्थापना स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे १९५२ सालात झाली. रमाकांत केशव उपाख्य बाळासाहेब देशपांडे हे या संघटनेचे संस्थापक. प्रस्तुत लेखात संघटनेची स्थापना, त्यामागचा विचार, महत्वाचे टप्पे आणि कामाचे विविध आयाम यांचा आढावा घेऊया. स्थापना : वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापनेचे प्रामुख्याने दोन टप्पे सांगता येतील : स्वातंत्र्योत्तर काळात जशपूर (सध्या झारखंड राज्याचा भाग) या तत्कालीन मध्य प्रदेश आणि बरार प्रांतातील गावात या संघटनेची स्थापना झाली. अशा प्रकारची संघटना स्थापन करणे आवश्यक का वाटले, त्याची पार्श्वभूमी : स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५२ सालची एक घटना. तत्कालीन मध्य प्रदेश प्रांताचे मुख्यमंत्री पंडीत रविशंकर शुक्ल यांनी या भागास भेट दिली. अन्य ठिकाणी त्यांचे चांगले स्वागत झाले असले तरी जशपूरनगर येथे मात्र त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. हा प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येचा प्रदेश होता आण

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी)

इमेज
पुण्यातल्या सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर चौकातून निंबाळकर तालीम चौकीकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या एका वाड्यात महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी) असा फलक दिसतो. बाहेरून अगदी साध्या वाटणाऱ्या या वाड्यात नेमकं आहे काय, हे आत गेल्याशिवाय कळत नाही. मात्र आत गेल्यावर प्रचंड मोठे ग्रंथसंचित आपल्यापुढे खुले होते. महाराष्ट्रातीस सर्वांत जुनी साहित्य संस्था ही या संस्थेची आणखी एक ओळख. वाचन संस्कृती वाढावी, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी व्रतस्थपणे काम करणाऱ्या संस्था महाराष्ट्रात आहेत. अनेक संस्थांची स्थापना नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आदी मान्यवरांनी केली आहे. शंभरपेक्षा अधिक वर्ष या संस्था आजही अविरतपणे कार्यरत आहेत. अशाच प्रकारचे काम करणाऱ्या एका संस्थेचा परिचय या लेखातून आपण करून घेणार आहोत. ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ (डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी) गेल्या 122 वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. न्यायमूर्ती रानडे, डॉ. रामकृष्ण भांडारकर, हरि नारायण आपटे, लोकमान्य टिळक आदींसह पंचवीस मान

डिजिटल शाळेची गोष्ट

इमेज
स्थळ – धुळे जिल्ह्यातील वारूड गाव वेळ – सायंकाळी 6.30 - 7 गावातील मंदिरासमोरील चौकात शिक्षक मंडळींची प्रोजेक्टर, स्पिकर आदींची मांडामांड सुरू होती. निमित्त होतं ‘प्रेरणा सभे’चं. येणारीजाणारी लोक कुतूहलाने ते सर्व बघत होती, “नेमकं काय चाललंय या मास्तर लोकांचं ?” असा एकंदरीत अविर्भाव होता. हळुहळू विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत त्यांची आई, वडील, काका, काकू, आजी, आजोबा चौकात येऊन बसली. एका सरांनी थोडं प्रास्ताविक केलं आणि मग हर्षल बोलायला उभा राहिला. अगदी सोप्या शब्दात त्याने शाळा डिजीटल करणे म्हणजे काय, त्याने नेमका काय आणि कसा फायदा होईल हे समजावून सांगितलं. ते उपस्थितांना पटलंही. आणि आपल्या गावातील शाळा डिजीटल झाल्या पाहिजेत हे एकमताने ठरलंही. सध्या ‘डिजीटल’ या शब्दाला खूप महत्व आलंय. अगदी आबालवृद्धांच्य तोंडी हा शब्द खेळत असतो. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डिजीटल इंडिया’ हे धोरण ठरवल्यापासून तो एक राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. सरकारी पातळीवरून जे व्हायचे ते होईलच, मात्र डिजीटल इंडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी धुळ्यातील हर्षल विभांडीक हा तरूण झपाटल्यासारखा काम करतोय. धुळे जिल्ह्

पाळणाघरं- गरज आणि वास्तव

इमेज
“अन्वी, आटप गं लवकर. तुला पाळणाघरात सोडून मला पुढे आॅफीसला जायचंय... किती हळुहळू आवरतेस तू…” “समीर, आज राधिकाला तू पाळणाघरात सोडशील का ? महत्वाची मिटींग आहे मला आज. संध्याकाळी मी घेऊन येईन तीला...” “निशा, आज मी अजिबात अर्जुनला पाळणाघरात सोडणार नाही. दोन दिवसांपासून त्यामुळे आॅफीसला उशीर होताय मला...”     ---------------------------------------------------------------- असे संवाद सध्या शहरांतल्या घरांमध्ये रोज सकाळी हमखास ऐकू येतात. आपल्या लहान मुलांना 9.30 वाजता पाळणाघरात सोडून 10 वाजता आॅफीसला पोहोचण्याची नवरा आणि बायको अशा दोघांनाही घाई असते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून साधारणपणे नऊ ते साडेनऊपर्यंतची वेळ ही शब्दश: हातघाईची असते. त्यात जर मुलांनी रडणं वगैरे सुरू केलं तर मग आणखीनच चिडचीड होते. त्यानंतर “मुलांना पाळणाघरात कोणी सोडायचं ?” यावरून बऱ्याचदा खटकेही उडतात. कारण दोघांनाही आॅफीसमध्ये वेळेत पोहोचण्याची घाई असते. आणि “रोज मीच का म्हणून सोडायचं मुलाना ?” हा अॅटीट्यूट आपली भूमिका अगदी इमानेइतबारे बजावत असतो. त्यामुळे बऱ्याचदा या विषयावरून घराच स्वास्थ्यही बिघडतं. सध्याच्या क

तू तेव्हा तशी... भाग २- अनुत्तरीत प्रश्न

इमेज
सकाळी नेहमीप्रमाणे सत्यजित आॅफिसला निघाला. नेहमीच्या चहाच्या दुकानात मार्लबरो अॅडव्हान्स पेटवली. चहासोबत दुकानातली नेहमीची गाणी होतीच. खरं तर आता सर्व होऊन दोन – अडिच वर्ष झाली होती. म्हणजे मुव्ह आॅन वगैरे व्हायला एवढा काळ पुरेसा असतो, असं रोज स्वतलाच बजावूनही झालं होतं आणि अनेकांकडून बजावूनही घेतलं होतं. पण व्हायचं ते रोज होतच होतं. म्हणजे अगदी कधीही आणि कुठेही सर्व काही आठवणं आणि त्यातच मग हरवून जाणं हा तर जवळपास दिनक्रमच झाला होता. म्हणजे अगदी कोणतही कारण त्या आठवणी जाग्या व्हायला पुरत होतं. म्हणजे अगदी कामात असताना, गाडी चालवताना, कार्यक्रमात असताना, मित्रांसोबत असताना आणि एकदा तसं झालं की मग सत्यजित एका वेगळ्याच कोषात जायचा. सुरूवातीला या सर्व प्रकाराने तो पुरता भांबावून गेला होता, कारण त्यामुळे बरेच गैरसमजही वाढले होते त्याच्याबद्दलचे. पण मग या सर्वांतून बाहेर पडायचा एक मार्ग अखेर सापडलाच... लिखाण... जो त्याचा व्यवसायही होताच आणि आवडही.   त्यामुळे असं आठवणी जाग्या झाल्यवर जो काही मनात भावनांचा कल्लोळ उठायचा, तो लिहून ठेवायला त्याने सुरूवात केली. त्यामुळे पार काही वेगळं घड

तू तेव्हा तशी भाग १- अॅडमिशन

इमेज
काॅलेजमध्ये नवीन अॅडमिशन घ्यायचा तो दिवस. साधारणपणे त्या दिवसांत प्रत्येक काॅलेजमध्ये जी परिस्थिती असते, तशीच परिस्थिती त्या काॅलेजमध्ये होती. म्हणजे काही चेहरे नवीन काॅलेज बघून भांबावून गेली होती, काही उगाचच टेंशनमध्ये होती, काही अगदी उत्साहात होती.  फाॅर्म भरायच्या ठिकाणी नेहमीचीच गर्दी होती, विशेष म्हणजे UG ते PGच्या अॅडमिशन एकाच वेळी, अगदी शेजारी शेजारी असलेल्या टेबल्सवर होत असल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. अर्थात सत्यजित त्यातही अगदी निवांत उभा होता, कारण डिग्रीच्या तीन वर्षांत हे असं त्याने पुरेपुर अनुभवलेलं असल्याने तो त्याच्या डिपार्टमेंटमध्ये बसला होता. पुण्यात मध्यभागी असलेल्या काॅलेजच्या मोठ्या कँपसमध्ये अगदी एका टोकाला असलेलं राज्यशास्त्र डिपार्टमेंट एक स्वतंत्र असं जगचं होतं. म्हणजे एकदा तुम्ही डिपार्टमेंटचे झालात की बाकी काॅलेजशी संपर्क आपोआप तुटायचा. तर थोड्या वेळाने सत्यजित फाॅर्म भरायला निघाला. चालत जायचा खरं तर कंटाळा आला होता, डिपार्टमेंटमध्येच फार्म का सबमिट करता येत नाही, यावर चर्चा करत तो अखेर पोहोचला. रांग बरीच कमी झाली होती. नेहमीच्या व्यक्तीकडे फार्म देऊ

पुरोगामी जल्पकं

इमेज
सध्या एकूणच कथित पुरोगामी, लोकशाहीवादी, सेक्यूलर वगैरे विचारवंत, पत्रकार, कलाकार मंडळींनी ‘जल्पकां’चा (पक्षी ट्रोल्स) म्हणे प्रचंड त्रास होतोय. काही मंडळींना त्यात नेहमीप्रमाणे फॅसिस्टवाद वगैरे दिसलाय, काहींना त्यात संघाचं षडयंत्र दिसलंय तर काहींनी त्याचा आधार घेऊन आपला मोदीविरोधाचा कंड शमवून घेतला आहे. अर्थात या मंडळींचे नैराश्य पाहता ते स्वाभाविकच आहे. जल्पकांची व्याख्या करायची झाल्यास ती साधारणपणे अशी करता येईल, एखाद्या व्यक्तीला संताप आणणे, भंडावून सोडणे, त्याचं लक्ष अन्यत्र वळवणे, विरोधक असल्यास खच्चीकरण करणे, विश्वासार्हता वगैरे कमी करणे. साधारणपणे समाजमाध्यमांत हा प्रकार चालत असतो. तर कुण्या स्वाती चतुर्वेदी यांनी आपल्या पुस्तकातून त्याबद्दल लिखाण केले आणि नेहमीप्रमाणे ढोंगी पुरोगाम्यांनी ‘आम्हाला आलेले जल्पकांचे’ अनुभव या छापाचे रडगाणे सुरु केले. त्यांचा एकूणच आवेश हा ‘आम्हाला संपवण्याचे हे कारस्थान आहे’ अशा प्रकारचा होता. अर्थात 2014 नंतर असा रडगाण्यांत वाढ झाली आहेच. असो. तर या मंडळींचा सूर असा असतो की, “एका विशिष्ट विचारसरणीचे म्हणजे रा. स्व. संघ, भारतीय जनता पार्टी यां