पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीती हुई एक छोटी घड़ी

इमेज
रिश्ते बनते हैं बडे धीरे से बनने देते सूखे लम्हे को जरा शाख पे पकने देते एक चिंगारी का लगना था कि पर काट दिए आंच आई थी  जरा आग तो जलने देते एक ही लम्हे पे एक साथ गिरे थे दोनों खुद संभलते या जरा मुझको संभलने देते कोणतीही नातं असचं तर असतं. म्हणजे ते तयार व्हायला काही वेळ द्यायला लागतोच. म्हणजे परस्परांना समजून घेण्यात आणि परस्परांची नेमकी ओळख होण्यात वेळ हा लागतोच. आणि तेवढा वेळ जर दिला नाही किंवा द्यायची तयारी नसेल तर मग मात्र समीकरण काही जुळत नाही. आणि मग पुन्हा ते समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करायला लागतो. या स्थितीचं अगदी योग्य वर्णन केलंय. संपुर्णसिंह कालरा उपाख्य गुलजार. आपल्या शब्दांनी जगाला वेड लावणारा अवलिया. नुकतचं (शुक्रवारी) त्यांनी 84व्या वर्षात पदार्पण केल. चेहऱ्यावर मिश्किल हास्य, शुभ्र रंगाचा कुडता, पायजमा आणि डोळ्यांवर साधासा चष्मा अशा रूपात असणारे गुलजार हे 83 वर्षांचे झाले, यावर विश्वास बसत नसला तरी ते सत्य आहे. गुलजार हे एक वेगळचं रसायन आहे. त्यांचं लिखाण अगदी साधं आणि सोपं आहे, फारसा शब्दफुलोरा त्यात कधीच नसतो. पण ते जे कागही लिहीतात ते

ती यावी परत...?

इमेज
ती यावी परत असं नेहमीचं वाटतं पण ती खरोखरच येईल का परत ? हे मात्र नाही कळत समजा आलीच ती परत तर आनंद होईलच  पण सर्व पूर्वीसारखंच असेल का ? हे नाही समजत म्हणजे ती तशीच असेल तोही तसाच असेल दूर होताना जसं होतं सर्व तसंच आजही असेल पण एकमेकांना दोघेही असतील अनोळखी अनोळखीचं रहायचं की पुन्हा ओळख करून घ्यायची  एकमेकांची हा खरा प्रश्न वरवर सोपा वाटणारा पण उत्तर अगदी अवघड असलेला आणि मग अवघड उत्तर असलेला प्रश्न तो  तो नेहमीप्रमाणे ऑप्शनला टाकतो

दूरदर्शन

इमेज
काही दिवसांपूर्वी दूरदर्शन या सरकारी वाहिनीचं बोधचिन्ह (लोगो) बदलण्याविषयीची बातमी वाचली. दूरदर्शनचं बोधचिन्ह बदलण्यासाठी एक स्पर्धाच आयोजित करण्यात आली आहे. देशभरातून कोणालाही या स्पर्धेत भाग घेता येणार असून त्यातून सर्वोत्तम बोधचिन्ह हे यापुढे दूरदर्शनचं अधिकृत नवं बोधचिन्ह असणार आहे. ही बातमी वाचली खरं सांगायचं तर थोड वाईटच वाटलं. म्हणजे आपलं लहानपण ज्या बोधचिन्हाला पाहून समृध्द (!) झालं, ते बोधचिन्ह असं बदलण्याची खरोखर गरज आहे का ?, म्हणजे नव्या गोष्टींना विरोध वगैरे नसला तरी प्रत्येकच गोष्टीत नवेपण आणणं गरजेचं आहे का ? हे आणि असे अनेक प्रश्न मनात आले. दूरदर्शनच्या त्या बोधचिन्हाशी सर्व बालपण आणि आता बालपणाच्या आठवणी एवढ्या घट्ट जोडलेल्या आहेत की यापुढे लवकरच नवं बोधचिन्ह असणार, ही कल्पनाचं मनाला पटत नाहीये. दूरदर्शनंच एक वेगळंच स्थान समस्त भारतीयांच्या मनात आहे हे नक्की. सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी जेव्हा केबलचा इतका प्रसार झाला नव्हता तेव्हा दूरदर्शनचं आपलं मनोरंजन करत होतं, दूरदर्शनचा लोगो, त्याचं ते थीम साँग या साऱ्या गोष्टी अगदी अप्रतिम होत्या. आठवतयं... रविवारच्य