पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजधानीत रंगली दिवाळी पहाट !

इमेज
सकाळी साडेपाच-सहाची वेळ, हिवाळ्याची नुकतीच चाहुल लागल्यामुळे वातावरणात असलेला सुखद गारवा, खास ठेवणीतला झब्बा, पायजमा, आणि पैठणी परिधान करून आलेली मंडळी, त्यावरच्या अत्तराच्या हलक्या शिडकाव्याने आसमंतात भरून गेलेला हलकासा गंध आणि सज्ज झालेला रंगमंच ! आता सुरू होणार अभिजात आणि सुरेल मराठी गाण्यांची मैफल...... हे वर्णन ‘दिवाळी पहाट’चे आहे, हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेलच. मात्र, ही ‘दिवाळी पहाट’ रंगली  ती राजधानी दिल्लीत, इंडिया गेटजवळ- राजपथावर !   दिवाळी पहाट म्हणजे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट अगदी उत्साहात साजरी करण्यात येते. अगदी त्याच उत्साहात राजधानी दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे प्रतिष्ठानचे तिसरे वर्ष होते. या कार्यक्रमाचे स्थानही अगदी विशेष होते - इंडिया गेट ! इंडिया गेटची भव्यता सोबतीला असल्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उभारी प्राप्त झाली आणि दिवाळी पहाट अगदी बहारदारपणे साजरी झाली. राजधानीत 2016 साली इंडिया गेटवर दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला, आणि त्याची चर्चा केवळ दि