पोस्ट्स

मार्च, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजयोगी नेता

इमेज
आज अटलजींना भारतरत्न प्रदान करण्यात आले, यानिमित्ताने तरी त्यांचे दर्शन घडेल अशी अपेक्षा होती, मात्र फक्त छायाचित्रावर समाधान मानावे लागले. त्यामुळे जरा हिरमोड झाला असला तरी एका अटलजींना भारतरत्न मिळाला आहे, हा आनंद अगदी अवर्णनीय असाच आहे. तस पाहायला गेल तर अटलजी म्हणजे आमच्यासाठी जुन्या पिढीतले राजकारणी. पण या जुन्या पिढीतल्या नेत्याने आमच्यावर एक वेगळच गारुड केलय. अटलजींकडे पाहिल्यावर आपोआप आदर वाटतोच पण सोबतच एक आपलेपणाही जाणवतो.     अटलजी म्हटले की सर्वांत अगोदर आठवतात ती त्यांची भाषणे ! भारतरत्न प्रदान करताना महामहीम राष्ट्रपती !  हिंदीवर असामान्य प्रभुत्व, तोंडपाठ असणारे संदर्भ आणि जरा श्रोत्यांचा अंदाज घेत केलेली अचूक शब्दफेक. एक वेगळीच नजाकत त्यांच्या भाषणात असायची. त्यांची संसदेतील भाषणे ऐकणे म्हणजे तर पर्वणीच. ज्यांनी अटलजींना प्रत्यक्ष बोलतांना ऐकलय, पाहिलय त्या सर्वांचा खूप हेवा वाटतो. प्रचारसभा अथवा अन्य सभा यांत काय बोलावे आणि संसदेत काय बोलावे याचा वस्तुपाठच अटलजींनी घालून दिला आहे. आमच्या आजच्या “नेत्यांनी” हे जरुर शिकण्यासारखे आहे !.     अटलजी प

“शिवसैनिक” खासदार

इमेज
स्थळ – नवे महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली. “सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याखाली एक व्यक्ती ‘भावी’ पत्रकारांच्या प्रश्नांना आपल्या ‘खास शैलीत’ ‘बिनधास्त’ उत्तरे देत होती, त्या व्यक्तीची ती शैली पाहून सर्व भावी पत्रकार जरा गडबडलेच होते !”. ती व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि ते भावी पत्रकार होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभागाचे विद्यार्थी. या भेटीचे निमित्त होते  आमच्या बहुचर्चित ‘दिल्ली अभ्यास दौऱ्या’चे. या दौऱ्यादरम्यान दिल्लीतील ‘आलिशान’ महाराष्ट्र सदनात आमची अनेक खासदारांशी भेट झाली, पण सर्वाधिक लक्षात राहणारी भेट होती ती खासदार अरविंद सावंत यांचीच. “मी अतिशय सामान्य घरातून आलेलो आहे. सुरुवातीला एमटीएनएल मध्ये नोकरीस होतो, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या संपर्कात आलो. त्यानंतर माझ्यासारखा  राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला तरूण राजकारणात यशस्वी झाला ते फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळेच” हे सांगताना सावंत हे अतिशय वेगळच रसायन आहे, ते जाणवत होत. एरवी दूरचित्रवाणीवरील चर्चेतच दिसणा

आपली संसद

संसदेचे प्रथम दर्शन हे डोळे दिपविणारेच असते..... ''डौलाने उभी असलेली, स्वतःच एक इतिहास असलेली  भव्य, दगडी वास्तु, भव्य आवार, त्यात उभ्या  असलेल्या लाल दिव्याच्या मोटारी, एका बाजूला थांबलेले वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, प्रचंड(!) सुरक्षाव्यवस्था, वातावरणात असलेली एक वेगळीच ‘लोकशाहीची नशा’ आणि त्यात असणारे आपले लोकप्रतिनिधी.''  या सर्व गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहात नाही. एरवी दूरदर्शनवर संसदेचे दर्शन घेणारे आपण प्रत्यक्ष संसद पाहिल्यावर थोडे का होईना पण दडपणात येतोच. खर सांगायचं तर आपली त्यावेळची मनस्थिती म्हणजे,‘संसद प्रत्यक्ष बघतोय याचा आनंद, उत्साह आणि वाटणारी अगदी थोडीशी भिती याचं मिश्रण.’ ते अस शब्दात सांगता येणं खूप अवघड आहे, त्यासाठी तुम्ही ते स्वतःच अनुभवायला हवं! अगदी असाच अनुभव आम्हाला आला. निमित्त होत ते आमच्या अभ्यासक्रमातील बहुचर्चित ‘दिल्ली अभ्यास दौऱ्या’चे. तर आम्ही सर्व ‘भावी पत्रकार’ संसदेच्या आवारात पोहोचलो ते मनात उत्सुकता आणि दडपण घेऊन. अर्धा तास सुरक्षेचे सोपस्कार पार पडण्यात गेले आणि अखेर आम्ही लोकसभेच्या ‘प्रेक्षक द

प्रेमात पाडणारी ‘दिल्ली’

“एखाद्या अनोळखी शहरात एकट्याने फिरण्याची मजा काही औरच असते. सुरुवातीला अनोळखी वाटणारे रस्ते, झाडं, इमारती हळुहळू आपल्याशी संवाद साधू लागतात आणि मग आपलाही नवखेपणा गळून पडतो. आपली त्या सर्वांशी छान गट्टी जमते, आणि ते शहर आपल्याशी काय बोलतय ते आपल्याला समजायला लागत, मग आपण                           त्या शहराच्या प्रेमात पडायला लागतो” पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने दिल्लीला जायचा योग आला आणि अगदी असाच अनुभव मला आला. दिल्लीला जायची, दिल्ली अनुभवायची इच्छा यानिमित्ताने थोड्या प्रमाणात पुर्ण झाली असली तरी आठवड्याभराच्या या धावत्या भेटीमुळे तूर्तास तरी दुधाची तहान ताकावर भागली, असेच म्हणावे लागेल. सुमारे आठवडाभरासाठी आमचा पत्ता होता ‘आंतरराष्ट्रीय छात्र आवास, ५, न्याय मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली.’ चाणक्यपुरी या भागाबद्दल सांगायचे तर हा भाग म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण ठरविणारा एक महत्वाचा भाग, ते अशासाठी कारण प्रामुख्याने परकीय देशांच्या भारतातील वकीलाती आणि त्यांचे अधिकारी, कर्मचारी वर्ग यांची निवासस्थाने या भागात एकवटलेली आहेत. साधारण