पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फडणवीस युगाची चाहुल, ‘ईडी’च्या फेऱ्यात पवारपर्व...

इमेज
काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे ‘शरद पवारांचे राजकारण आता तुम्ही शिकला आहात, तुम्ही 21 शतकातले शरद पवार आहात...’   त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना अगदी सहजपणे सांगितले की ‘मी शरद पवार का बनू, मी देवेंद्र फडणवीस म्हणूनच ठीक आहे.’  यातला हजरजबाबीपण सोडता एक महत्वाची गोष्ट अधोरेखीत होते, ती म्हणजे आजही महाराष्ट्रात एखाद्या नेत्याची राजकीय उंची मोजावयाची असल्यास त्यासाठी परिमाण हे शरद पवारांचेच वापरावे लागते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणातील आपले स्थान भक्कम केले आहे. किंबहुना शरद पवारांच्या नेतृत्वाला एकहाती आव्हान देऊन फडणवीस यांनी आपले राजकीय नेतृत्व सामर्थ्यवान असल्याचेच दाखवून दिले आहे. शरद पवार या शब्दाभोवतीच राज्याचे राजकारण दीर्घकाळपासून फिरत राहिले आहे. त्यात पवारांना आव्हान देऊ शकणारे नेतेही राज्याच्या राजकारणात होते, त्यात भाजपचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांचे नाव घ्यावे लागेल. मात्र, या सर्व