पोस्ट्स

पुस्तक बिस्तक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लम्हा लम्हा

इमेज
जरा फासले पर पहुंचे तो यह एससास हुआ कोई कितने करीब से गुजर कर चला गया था काही लोक अगदी साध्या शब्दात लिहीतात. म्हणजे ते शब्द तुम्ही – आम्ही वापरतो, तेच असतात. पण त्यांचे शब्द आपल्या मनाला भावतात. असं का होत असेल ?. अर्थात, प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी, याचा हटट्ही धरायला नको. काही शब्द असेच अनुत्तरीत राहू द्यायला हवे. जेणेकरून पुन्हा त्यांच्या वाटेला गेलो की काही जुन्या आठवणी उफाळून वर यायला हव्यात. त्या आठवणी नेहमीच जीवंत रहायला हव्यात. म्हणजे काही शब्दांचे अर्थ अगदी व्यवस्थित लागतात. आता दीप्ती नवल यांच्या या दोन ओळी अनुभवायच्या असतील तर सर्व काही जागच्याजागी असून कसं चालेल ? चलो दूर तक अजनबी रास्तो पे पैदल चलें कुछ न कहें अपनी अपनी तन्हाइयां लिये सवालों के दायरों से निकल कर रिवाजों की सरहदों के परे हम यूं ही साथ चलते रहें कुछ न कहें तुम अपनी माजी का कोई जिक्र न छेडो मैं भुली हुई कोई नज्म न दोहराऊं तुम कौन हो मै क्या हूं इन सब बातों को, बस रहने दें कुछ न कहें चलो दूर तक अजनबी रास्तों पे पैदल चलें स्वत:ला विसरून असं जगण्यात एक वेगळीच मजा अस...

‘अटल’ चरितकहाणी

इमेज
“अटलजी तेव्हा अवघ्या १५ वर्षांचे होते. डॉक्टरांचे एकदाच घडलेले, पण मनात घर केलेले दर्शन त्यांच्या डोळ्यांपुढून जात नव्हते. अशा अस्वस्थ आणि भारलेल्या मनस्थितीत त्यांच्या मनात एक एक शब्द जुळू लागला. कवितेची एकेक ओळ जन्म घेऊ लागली. अटल कागदावर एकेक ओळ लिहू लागला. त्या कवितेची पहिलीच ओळ होती... हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय...” माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुत्वविचार ठामपणे, मात्र अन्यांना न दुखविता मांडणारा एक कुशल राजनेता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता. प्रथम जनसंघ, अल्पकाळ जनता पक्ष आणि नंतर दीर्घकाळ भारतीय जनता पक्षाला दिशा देणारा मार्गदर्शक, आपल्या अमोघ वक्तृत्व आणि परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाने पं. नेहरूंचेही लक्ष वेधून घेणारा खासदार, लालकृष्ण आडवाणींचा सख्खा मित्र, लहानग्यांना ‘स्कुल चलें हम’ या अनोख्या गाण्याच्या रूपात सकाळी सकाळी भेटणारा प्रेमळ चेहरा, कर्तव्यकठोर पंतप्रधान आणि भारतरत्न... अशा विविध रूपांमध्ये अटलजींनी तब्बल पाच – सहा दशके ...

हिंसक माणिक 'सरकार'

इमेज
‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात पुष्पा कपाली या महिलेची कहाणी तर अंगावर काटा आणणारी आहे. ही महिला सात महिन्यांची गरोदर होती. माकपचे कार्यकर्ते तिच्या घरात शिरले. तिला मारहाण केली. मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. पोटातील अर्भकाचा बळी गेला. पुष्पा कपालीचा गुन्हा एवढाच होता, की ती भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत होती. एका गर्भवती महिलेला लाथाबुक्क्याने मारण्यासाठी किती क्रौर्य लागत असेल ? माकप कार्यकर्त्यांच्या क्रौर्याचे हे अपवादात्मक उदाहरण नाही. माकपचा डोलाराच या क्रौर्य आणि आणि दहशतीवर उभा आहे ! अडीच दशकांच्या काळात त्रिपुरामध्ये काडीचाही विकास न करता याच क्रौर्यावर माकपने आपल्या सत्तेचा गड शाबूत राखला.’ हिंसा आणि क्रौर्याचा 'हसरा चेहरा'- माणिक सरकार माणिक सरकार. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते. देशातील सामान्य जनतेला या माणिक सरकारांचे कोण कौतुक...  'माणिक सरकार कसे साधेपणाने राहतात, माणिक सरकार कसे कमी पैशात जगतात, माणिक सरकार कसे फक्त एक रूपया पगार घेतात, माणिक सरकार कसे लोकाभिमुख कारभार करतात, माणिक सरकार कसे त्रिपुराचा ...

पुतिन

इमेज
व्लादिमिर व्लादिमिरोविच पुतिन “पुतिन हे कमालीचे केंद्रवादी... सेंट्रिस्ट... अशा मताचे आहेत. देशाचं केंद्र अत्यंत सामर्थ्यवान असायला हवं, असं त्यांचं मत आहे. अत्यंत सामर्थ्यवान केंद्र आणि आसपास छोट्या छोट्या आज्ञाधारक देशांची पिलावळ हा त्यांचा राज्यविचार आहे. केंद्र सक्षम असलं की, परिघावरच्या उचापतखोरांना आळा बसतो, असं त्यांना वाटतं. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर पुतिन यांची ही मानसिकता दिसून आली आहे. ‘सोविएत रशियाचं विघटन ही या शतकातली सर्वांत मोठी भूराजकीय हाहाकार घडवणारी घटना आहे,’ असं त्यांचं मत आहे. याचाच अर्थ रशिया पुन्हा पूर्वीइतकाच, आपल्या सोविएत काळाइतकाच मजबूत, दरारा निर्माण करणारा असायला हवा, असं त्यांना सातत्याने वाटचत आलेलं आहे. म्हणजे क्रीमीयाचा घास घेणं हा त्यांच्या या योजनेतलाच एक भाग आहे, हे उघड आहे. तो त्यांनी कमालीच्या निष्ठुरपणे राबवला”. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं हे यथार्थ वर्णन. अनेकांना भावणारं तर अनेकांना काळजीत टाकणारं... रशिया. रशियाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात कायमच एक प्रकारचं आकर्षण आहे. म्हणजे अगदी सोविएत रशिया असल्यापासूनचा भारताचा एक खंबीर म...

'योद्धा शेतकरी' आणि बरंच काही...

इमेज
“प्रेमाची जोशींची व्याख्या वेगळीच होती. प्रेमावर बोलताना ते मला म्हणाले, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो नं, तेव्हा ती व्यक्ती जणू काही सूर्य होते आपल्यासाठी. सूर्याभोवती जसे ग्रह फिरतात, तसं आपलं अवघं विश्व तिच्याभोवती फिरत असतं. ती व्यक्ती म्हणजे जणूकाही जीवनाचं केंद्रच, असं वाटत. ती व्यक्ती नाही तर जीवन नाही, इतपत मनोवस्था येते. ओशोंनी हे फार सुंदर वर्णन केलं आहे. सुफी तत्त्वज्ञानात प्रेमासाठी दोन शब्द आहेत. एक म्हणजे मोहब्बत आणि दुसरं म्हणजे इश्क. मोहब्बत म्हणजे सामान्य दर्जाचं प्रेम. जे काही क्षणी असतं तर कधी नसतंदेखील. त्यामध्ये गेहराई नसते. ज्यामध्ये तुम्ही काही अंशी तरी स्वत:च्या नियंत्रणात असता. पण इश्क ही भिन्न गोष्ट आहे. इश्कात संपूर्ण विलय आहे. हरवणं आहे. स्वत:ला गमावून बसणं आहे. इश्कामध्ये मृत्यूपूर्वी मृत्यू अनुभवणं आहे.”  हे वाचून कोण्या प्रेमावर वगैरे लिहिणाऱ्या लेखकाने हे सांगितलं असावं, असा तुमचा समज होईल. पण शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे हे विचार. वाचून थोडा धक्का बसला ना ? 'शरद जोशी- शोध अस्वस्थ कल्लोळाचा' हे वसुंधरा काशीकर- भागवत...