पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अविश्वास ठरावाचे कवित्व- निवांत सत्ताधारी, गोंधळलेले विरोधक

इमेज
तेलुगू देसम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर उद्या लोकसभेत चर्चा होणार आहे. चार वर्षांच्या कालावधीत प्रथमच मोदी सरकार अविश्वास ठरावास सामोरे जाणार असून सरकार त्यासाठी तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितले. संख्याबळ बघता मोदी सरकारला कोणताही धोका नसल्याचे चित्र आहे, तर विरोधकाना मात्र संख्याबळ जमविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला असला तरीदेखील अविश्वास ठरावाच्या निमित्ताने विरोधकांच्या मर्यादा उघड्या पडण्याचीच शक्यता जास्त आहे. असे आहे संख्याबळ 545 सदस्यांच्या लोकसभेत बहुमतासाठी 273 एवढ्या संख्याबळाची आवश्यकता आहे. तेवढे संख्याबळ भाजप सरकारकडे असल्याने सरकारला अविश्वास ठरावाचा कोणताही धोका नाही. भाजपचे 273 खासदार आणि रालोआ घटकपक्षांचे 39 खासदार असे एकूण 311 सदस्यांचे भक्कम पाठबळ मोदी सरकारकडे आहे. विरोधकांचे संख्याबळ बघता काँग्रेस 48, अण्णाद्रमुक 37, तृणमूल काँग्रेस 34, बिजू जनता दल 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी प