पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओळख हरवलेलं शहर

इमेज
धुळे शहरात पारोळा रस्त्यावरच्या गोपाल टी हाऊससमोर (‘पिवर’ चहासाठी प्रसिध्द असलेलं धुळेकरांचं आवडत ठिकाण !) गुड्ड्या नामक गुन्हेगाराचा खून करण्यात आला. सकाळी साडेसहा – सातच्या सुमारास झालेल्या या खुनामुळे अवघं शहर हादरलं, त्याची चित्रफित काही वेळातच संपुर्ण देशभर पसरली. वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमांवर आजपर्यंत या घटनेची चर्चा सुरू आहे. फेसबुक, व्हॉट्स अप सारख्या समाजमाध्यमांवरून सदरची चित्रफित आणखी पसरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तशा सुचना जारी केल्या. गुड्ड्याच्या खुनानंतर शहरात अनेक ठिकाणी फटाके वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. शहराच्या एकूणच आरोग्याच्या दृष्टीने ही घटना अधिक विचार करण्यासारखी आहे. एका गुन्हेगाराबद्दल नागरिकांच्या मानत असलेला संताप व्यवहार्य असला तरी तो अशाप्रकारे बाहेर पडणे विचारी जनांना काळजीत टाकणारा आहे. या घटनेनंतर धुळ्यातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अगोदरच दंगलीमुळे धुळे शहराची विशेष ओळख सर्व देशभर झाली आहेच, त्यात या घटनेमुळे टोळीयुध्दासाठीही शहर ओळखलं जाऊ लागलंय. या सर्व गदारोळात धुळे शहराची न