पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘स्वीट’कॉर्न क्लब – मधुमक्याची गोष्ट

इमेज
फर्गसन महाविद्यालय रस्त्यावरील आउटलेट पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालय रस्त्यावर पोलीस ग्राउंडच्या समोर ‘कॉर्न क्लब’ असा बोर्ड असलेल एक छोटेखानी रेस्टोरंट आपल लक्ष वेधून घेत. तिथे पाउल ठेवल्यावर मधुमका अर्थात स्वीट कॉर्न च्या अनोख्या जगात आपला प्रवेश होतो. एरवी फक्त भाजून खाणे एवढाच आपला मक्याशी संबंध येत असतो, आणि इथे मात्र मधुमक्याची एक वेगळीच दुनिया आपल्या समोर येते आणि आपल्याला त्यात अगदी हरवून जायला होतं. त्याबद्दल कॉर्न क्लबचे राहुल म्हस्के यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले, ‘या उद्योगाची सुरुवात एका साध्या गोष्टीतून झाली. १९९९ साली माझी पत्नीने मॉडेल कॉलनीत स्वीट कॉर्नच्या विविध तयार पदार्थांचे दुकान सुरु केले. कारण मधुमका हा खायला अतिशय गोड आणि मऊ आहे. त्याची वैशिष्ट्यपूर्ण गोड चव सर्वांनाच आवडते. त्याचे वैविध्यपूर्ण पदार्थ विक्रीस ठेवले, त्याला ग्राहकांचा अगदी उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच काळात स्वीट कॉर्नची ओळख नुकतीच लोकांना व्हायला लागली होती. त्यामुळे लोकांची पसंती आम्हाला मिळाली. आज या अतिशय छोट्या प्रयोगाचे रूपांतर Monsoon Agro Bio LTD अशा मोठ्या उद्योगात झाले आहे.

पुरस्कार वापसी: एक स्टंटबाजी

सध्या देशभरातील साहित्यिकांमध्ये पुरस्कार परत करण्याची लागण झाली आहे. देशात वाढत असलेली असहिष्णुता हे कारण त्यासाठी हे लोक देत आहेत. मात्र खरे कारण काहीतरी वेगळेच आहे. लाल सलाम पुरस्कार परत करणाऱ्या लोकांकडे नजर टाकली तर यात बहुसंख्य हे डाव्या विचारांशी बांधीलकि सांगणारे असल्याचे दिसून येते. या सर्वांना काँग्रेसने खास पोसले आहे आणि संघ व भाजप विरोधी लढण्यासाठी आपली 'राखीव फौज' म्हणून वारंवार वापरले आहे. त्याचा मोबदला म्हणून या लोकांचा भरपूर फायदाही करून दिला आहे. काही लोकांनी तर निव्वळ चाटुगिरि करण्यात  धन्यता मांडली आहे (मुनव्वर राणा यांचे उदाहरण बोलके आहे). एरवी निधर्मीवादाच्या बोंबा मारणारे हे लोक काँग्रेसच्या वळचणीला गेल्यावर बिनकण्याचे होऊन जातात. खाल्ल्या मिठाला जागायला नको ? तर या सहित्यिकांना काँग्रेसने विविध संस्थांमध्ये नेमले, समित्यांवर नेमले, महामंडळांवर नेमले. आणि त्यांचा डावा अजेंडा सुखनैव राबवता येईल, याची सोय करून दिली. काँग्रेस सरकार होते तोपर्यंत सर्व व्यवस्थित होते, मात्र १६ मे २०१४ या दिवशी भाजपा सरकार आले आणि हे लोक अनाथ झाले. एरवी लोकशाहीच्या गप्पा मार

'आनंद'

इमेज
प्रिय ‘आनंद’, अरे बाबा तू अशी काय जादू केली आहेस ते एकदा तरी कळू देशील का ? की आम्ही कायमचं ते उत्तर शोधण्यात गुंतून राहणार आहोत... की तुझीच तशी इच्छा आहे ? काहीतरी तरी सांगशील का ? कारण बघ ना, तुला केव्हाही बघितलं तर तू प्रत्येक वेळी अगदी नवा (हो नवाच !) भासतोस. म्हणजे तोच आनंद, तोच डॉ. भास्कर बॅनर्जी, तेच रामुकाका आणि डॉ. कुलकर्णी आणि तुला झालेला लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटस्टाइन या अवघड नावाचा कॅन्सरही तोच. मग असं काय आहे की तू प्रत्येक वेळी नवा वाटतोस ?. म्हणजे होतं असं की तुला एकदा पाहिल्यावर तू प्रत्येक वेळी नवा भासतोस, मग ते नवेपण शोधायला तुला पुन्हा पाहतो, पण प्रत्येक वेळी फक्त प्रश्नच तयार होतात, त्यांची उत्तरं काही मिळतच नाहीत. कधी कधी वाटत मग कि जर उत्तर मिळत नाहीयेत तर मग मग आता तुला पहायचच नाही. पण खर सांगायचं तर तुझ्यापासून लांबही जाववत नाही रे. तू ना असं मधल्यामध्ये अडकवून ठेवलयसं. तू जेव्हा ‘दोस्त’ अशी हाक मारत आत येतो ना खर तर तेव्हाच तुझ्यात अडकून पडलेलो असतो. आणि नंतर ओळखही नसलेल्या डॉ. भास्कर बॅनर्जींना जेव्हा तू ‘बाबूमोशाय’ अशी हाक मारतोस ना, तेव्हा तू आम्हाल

‘स्व’- रूपवर्धिनी – ‘माणूस’ घडवणाऱ्या प्रयोगशाळेची गोष्ट

इमेज
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो कार्यकर्ते आज देशभरात वेगवेगळ्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम करत आहेत. काही प्रचारक म्हणून, काही संघ परिवारातील संस्थांमधून तर काही स्वतंत्र संस्था स्थापन करून. अशीच एक संस्था म्हणजे ‘स्व’-रुपवर्धिनी. हि फक्त संस्था नाही, तर हि आहे माणूस घडवणारी प्रयोगशाळा. आजपर्यंत या संस्थेबद्दल खुप ऐकल होतं, त्यामुळे मंगळवार पेठेत असलेल्या या संस्थेस प्रत्यक्ष भेट दिली. संस्थेच्या शिरीष पटवर्धन यांच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांमधूनच या प्रयोगशाळेची गोष्ट उलगडत गेली. १९७९ साली आंतरराष्ट्रीय बालक वर्षाचे निमित्त साधून या आगळ्यावेगळ्या प्रयोगशाळेची स्थापना केली ती किशाभाऊ पटवर्धन यांनी. पेशाने शिक्षक असलेले किशाभाऊ संघ प्रचारकही होते. त्यामुळे समाजात मिसळून काम करणं त्यांना नवीन नव्हतं. ही संस्था स्थापन करण्यामागे किशाभाऊंनी एक विशिष्ट असा विचार समोर ठेवला होता, कारण संस्था स्थापन करून, देश विदेशातून देणग्या जमवून ‘दुकान’ चालवण त्यांना जमणारच नव्हतं. किशाभाऊ हे मंगळवार पेठेतील एका शाळेत मुख्याध्यापक होते. शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्याचं

यहा के हम सिकंदर.....

इमेज
लहान असतांना आपणा सर्वांनाच ‘हॉस्टेल’ बद्दल भीतीयुक्त आकर्षण असतं....! आपल्या सर्वांनाच आई बाबांनी एकदा तरी ‘तुला होस्टेलमध्ये ठेवल पाहिजे’ अशी तंबी दिलेली असते आणि त्यामुळे आपण काही दिवस तरी अगदी सुतासारखे सरळ वागायचो. तर ‘हॉस्टेल’ नावाच्या शब्दात एक वेगळीच जादू आहे, वेगळीच नशा आहे. आयुष्यात एकदा तरी घरापासून दूर, आपल्या नेहमीच्या अगदी सुरक्षित जीवनशैलीपासून दूर जात ‘हॉस्टेल लाईफ’चा अनुभव हा घेतलाच पाहिजे. दहावी किंवा बारावी नंतर पहिल्यांदाच घर सोडल्यानंतर ‘हॉस्टेल’ किंवा रूम शोधून त्यात राहायची सोय केली जाते. होस्टेलवरच्या पहिल्या काही दिवसांची अवस्था ‘क्या करे क्या ना करे’ अशी असते. रूममध्ये आधीच असलेल्या मुलांशी सुरूवातीला अगदीच संवाद नसतो, कारण प्रत्येक जण आपला ‘Ego’ आणि ‘Attitude’ सांभाळत असतो. पण नंतर एकमेकांशी इतकी चांगली ओळख होते आणि आपल्या ‘happy days’ना प्रारंभ होतो. हॉस्टेलमध्य आपल्याला भिन्न भिन्न भागांतले, भिन्न भिन्न भाषांचे असंख्य मित्र भेटतात. सोबत राहतांना एक वेगळाच आत्मविश्वास आपल्याला मिळतो. घरी असतांना अगदी साध्या साध्या गोष्टी करायला घाबरणारे, संकोचणा