पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धोका साईबाबांचा !

इमेज
मार्च महिन्यात दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्ष सुनावली. या प्राध्यापक महोदयांवर नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप होता. न्यायालयात तो सिध्द होऊन या पांढरपेशा नक्षलवाद्यास आता आपले उर्वरीत आयुष्य कारागृहात कथित क्रांतीची स्वप्न पाहत घालवावे लागणार आहे. शिक्षा सुनावताना न्यायालयाने जे म्हटले आहे ते अतिशय महत्वाचे आहे, “प्राध्यापक साईबाबा हा नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करीत असल्याचे न्यायालयात सिध्द झाले आहे. प्रा. साईबाबा 90 टक्के अपंग असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे कार्यरत असून तो माओवादी चळवळीमागील प्रेरणा असल्याचे सिध्द होते. 2008 पासून गडचिरोली जिल्ह्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या बंदी घातलेल्या संघटनेचा नेता असल्याने तो जन्मठेपच नाही, तर त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र आहे.” पेशाने प्राध्यापक असलेल्या या व्यक्तीकडून नवीन पिढी घडवण्याचे काम होणे अपेक्षित असताना देशविघातक अशा नक्षल चळवळीत त्याचे असलेले सक्रीय योगदान हे विचारी जनांना नक्कीच काळजीत टाकणारे आहे. पिढी घडविणारी व्यक्तीच जर देशविघातक अशा

गाय आणि सावरकर

इमेज
सध्या देशभरात गोरक्षक चळवळ आणि गोरक्षक मंडळींना भलताच उत्साह आला आहे. अवघ्या भारतभूमीत म्हणजे त्यांचे जत्थेच्या जत्थे मोठ्या संख्येने गोरक्षा करून “आम्हीच कसे हिंदूधर्मरक्षक आहोत” हे सिध्द करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. त्यांचा उत्साह एवढा की गाईचा जीव वाचवत असताना माणसाचा जीव घेण्यास त्यांना काहीही वावगे वाटत नाही. उलट ती त्यांना आणि त्यांच्यासारख्यांचे समर्थन करणाऱ्या मंडळींना मोठे शौर्याचे कृत्य वाटते. माणसांचे जीव घेण्याचा हा उन्माद हा विचारी जनांना निश्चितच काळजीत टाकणारा आहे. “रात्री गुन्हेगारी कारवाया करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात. त्यांना गोरक्षणाची दुकाने थाटली आहेत. हे पाहून संताप येतो” आणि “राज्य सरकारांनी अशा गोरक्षकांचे अहवाल बनवावेत, त्यामध्ये 80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक असल्याचे आढळेल”. ही दोन्ही विधाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 6 आॅगस्ट रोजी केली. त्यानंतर तर या स्वयंघोषित हिंदूत्वरक्षकांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी मोंदींवरही टिकेची झो़ड उठवली होती. थोडक्यात काय, “हिंदू धर्म हा आम्हालाच काय तो कळतो, त्याचं कथित रक्षण वगैरे ते आम्हीच आणि आमच्या

तू तेव्हा तशी... भाग ३- अॅमी

इमेज
मग दोघेही बँकेत चलन भरायला सोबतच निघाले. काॅलेजपासून अगदी पाचचं मिनिटावर बँक होती. चलन भरून झाल्यावर पुन्हा काॅलेजकडे येत असताना सत्यजितनने नाव विचारल... अॅमी. खरं तर सत्यजितला ती बघताच क्षणी आवडली होती. सावळा रंग, कुरळे केस आणि अगदी मोहक असं हास्य. म्हणजे त्याच्या मनात ज्या काही कल्पना होत्या, अॅमी अगदी तशीच होती.  त्यात तिचं नाव तर विशेष आवडलं होतं त्याला. त्यानंतर नवीन ओळख झाल्याच्या परंपरेप्रमाणे मोबाईल नंबर्सची देवाण – घेवाण झाली (आपण एवढ्या सहज आणि स्वत:हून नंबर कसा मागितला, याचं त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही !) आणि दोघेही राज्यशास्त्र डिपार्टमेंटमध्ये आले. डिपार्टमेंटमध्ये आल्यावर जुजबी थोडंफार बोलणं झालं आणि तो निघाला. खरं तर थांबायची ईच्छा होती, पण दुसरी काही कामं असल्याने निघाला. त्याची खोली काॅलेजपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर होती. रूमवर पोहोचल्यावर रूममेटसोबत गप्पा मारताना त्याने तिच्याबद्दल सांगितलं, त्यावर हाॅस्टेलाइट्सच्या प्रथेप्रमाणे सिरियस ते अगदी सुमार असे सल्ले त्याला मिळाले. आणि तो विषय तिथे संपला. संध्याकाळी मग त्याने व्हाॅट्स अॅप उघडून तिची वि

भारतीय समाजाला पुस्तकप्रेमी बनवूया

इमेज
फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सच्या २६ व्या वार्षिक सभेत ३ जुलै १९९९ रोजी नवी दिल्ली इथं लालकृष्ण अडवाणी यांनी भाषण केलं होतं. भारतीय समाजाला पुस्तकप्रेमी बनवण्यासाठी, एकूणच वाचन संस्कृती रुजवण्यासाठी काय काय करता येईल याबद्दल त्यांनी मांडलेले विचार कालातीत आहेत. आजही हे सगळे मुद्दे तंतोतंत लागू पडतात. अठरा वर्षांपूर्वीचं भाषण आज वाचतानाही ताजंच वाटेल. मी पुस्तकप्रेमी आहे, ही गोष्ट आज मी कबुल करतो. वाचन ही ज्याची दुखरी नस आहे, तो व्यक्ती प्रकाशकांचा अतिशय ऋणी असतो. कारण तुम्ही नसता तर  पुस्तकांच्या या अनोख्या जगाची दारं आमच्यासाठी कधीच खुली झाली नसती. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असं एक वाक्य आहे. म्हणजे ज्या गोष्टी सुर्य बघू शकत नाही, त्या गोष्टी कवी आणि लेखक अगदी सहजतेने बघू शकतात. मात्र हे पूर्ण सत्य नाही. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेल की, ‘प्रकाशकाशिवाय कोणत्याही लेखकाला वाचक पाहू शकत नाही आणि वाचकाला कोणताही लेखक पाहू शकत नाही.’ पुस्तक वाचनात व्यक्तीमध्ये आमुलाग्र बदल घडवण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे ज्याला वाचनाची आवड असते त्याला चांगली पुस्तकं वाचण्याची सवय आपोआपच लागते.