पोस्ट्स

जुलै, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"गावा"वर अवलंबून असलेल शहर

कपडे  घ्यायचे - चला गावात, भाजी घ्यायची - चला गावात, पुस्तक घ्यायचे- चला गावात,असे शब्द कानावर पडले कि समजायचे कि आपण धुळ्यात आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी धुळेकर गावावर अवलंबून आहेत. धुळे शहराचे नैसर्गिकरीत्या पांझरा नदीमुळे गाव आणि देवपूर असे २ भाग झाले आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ म्हणजे आग्रा रोड (पूर्वीचा मुंबई - आग्रा महामार्ग), पाच कंदील मार्केट. धुळे करांचे खरेदी विषयक भावविश्व हे या दोन भागांशी घट्ट जोडलेलं आहे. अगदी लहानात लहान खरेदी सुद्धा गावात जाऊन केल्याशिवाय धुळे करांचे समाधान होत नाहि. आता आपण धुळ्यातील हि खरेदी विषयक महत्वाची ठिकाणे पाहुया.  कपड्यांसाठी आकाशदीप, जुगल वस्त्रालय, विजय, रेमंड, पारंपारिक आणि अभिजात वस्त्रांसाठी न्यू क्लोथ , खंडू गणपत शेठ वाणी (खास खण कापड! ), त्यानंतर सौदर्य प्रसाधने, सजावटीच्या वस्तू यासाठी यासाठी खोल गल्लीतील(अथवा बांबू गल्ली) राजू भावसार फेटेवाले, अलंकार. त्यानंतर पुस्तकांच्या आणि फुलांच्या खरेदीसाठी फुलवाला चौक. भेटवस्तू , क्रोकरी  यासाठी फक्त आणि फक्त ओल्ड आणि न्यू कादरी. भाजी, फळे,  मसाले यासाठी तर पाच कंदील मार्केट ला पर्यायच नाहि! ध

मन........तुटतं तेव्हा

आपलं मन. एक असा मित्र ज्याचा आपल्याला नेहमीचं आधार वाटत असतो, प्रसंगी धाक सुद्धा. अगदी साध्या गोष्टीपासून ते अगदी महत्वाच्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्यात आपल्या मनाचा आपल्याला प्रचंड आधार असतो. तर असं हे आपल मन अचानक कुणाबद्दलतरी फार विचार करायला लागतं, अगदी दिवसरात्र ते त्याच्याच विचारात असतं, त्याच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायलाही ते तयार असतं. पण.... समोरच्या व्यक्तिला त्याचं काहीच सोयरसुतक नसतं. त्याच्यासाठी तो निव्वळ एक खेळ असतो. आणि एक दिवस अचानक खेळ अर्ध्यावर मोडून ती व्यक्ति निघून जाते, मनाला एकटं सोडून. मग मात्र मन बहकतं, वेड्यासारखं वागायला लागतं. आता ते कुणावरचं विश्वास ठेवायला तयार नसत. कारण ते आतून पूर्णपणे तुटलेल असतं.......... मित्रांनो, कुणाच्याही मनाशी उगाचच खेळू नका, कारण मन तुटल्याचं दुःख फार फार मोठ असतं.

आपलं दूरदर्शन

इमेज
काल खूप दिवसांनंतर दूरदर्शनवर 'मिले सुर मेरा तुम्हारा' ऐकलं आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या..... सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी जेव्हा केबलचा इतका प्रसार झाला नव्हता तेव्हा दूरदर्शनच आपलं मनोरंजन करतं होत, दूरदर्शनचा लोगो, त्याचं ते थीम साँग या साऱ्या गोष्टी अगदी अप्रतिम होत्या. आठवतयं मित्रांनो... रविवारच्या सकाळची सुरूवात हेमा मालिनी यांच्या 'रंगोली' ने व्हायची आणि नंतर 'श्रीकृष्ण' मालिका बघूनच आपली आंघोळ व्हायची. दूरदर्शनवर लागणाऱ्या मालिकाही अतिशय दर्जेदार होत्या, आजच्या उथळ आणि भपकेबाज मालिकांची त्यांच्याशी बरोबरी होऊच शकत नाही. शनिवारी लागणाऱ्या 'शक्तिमान' ने तर आपल्या सर्वांना अगदी वेड केल होत, मी तर ते पाहण्यासाठी कित्येकदा शाळेत उशीरा जायचो. त्याच्याही आधी 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांनी तर संपूर्ण भारतालाचं वेड लावलं होतं. रात्री लागणारे 'छायागीत', 'चित्रहार' यांची आतुरतेनं वाट पाहायचो आपण, त्यांची सर आजच्या म्यूझीक चँनेल्सना येणं शक्यच नाही. दर सोमवारी लागणारे 'ओम नमः शिवाय', अलिफ लैला(सिंदबाद) आणि