पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेश्या

"वेश्या" हा शब्द ऐकताच अंगावर पाल पडल्यासारखे "शी"  असे किंचाळणारे आपण "प्रतिष्ठित" नागरिक आपल्यात आणि वेश्येत फारसा फरक नाही हे विसरणारे आपण प्रतिष्ठित आम्ही राहतो तो समाज आणि त्या राहतात  ती वेश्यावस्ती अशी समजूत घालणारे आपण प्रतिष्ठित आपण करतो ते काम आणि त्या करतात तो धंदा अशी निर्बुद्ध विभागणी करणारे आपण प्रतिष्ठित चेहरा रंगवून रोज गिऱ्हाईक  घेतात म्हणून त्या वाईट आणि आपण रोज शुचिर्भूत होऊन तेच करणारे प्रतिष्ठित पण आपण एक गोष्ट विसरत असतो ही  गिऱ्हाईक  आपल्यातलीच प्रतिष्ठित असतात आज आपल्या समाजच रुपांतरही वेश्यावस्तीत होऊ लागलय रोज शुचिर्भूत होऊन सोवळ्याचा आव आणायचा आणि नंतर तथाकथित मूल्यांचा खुलेआम बलात्कार करायचा आज आपण प्रतिष्ठीतांनी समाजाला वेश्यावस्ती बनवलय खुलेआम तथाकथित मुल्यांचा धंदा मांडून आणि  आपणच गिऱ्हाईक  बनलोय                          - पार्थ विकास कपोले                          - ५/१२/२०१३
कधी कधी आपल्याला काहीच करावस वाटत नाही, अगदी आपण काहीच करत नसतांनासुद्धा! "काहीच करावस वाटत नाही" याची एक गंमतच असते. त्याला स्थळ काळ आणि वेळ अस कोणतच बंधन नसत. काहीच करावस न वाटल्यामुळे आपण फक्त बसलेलो असतो आणि (तरीही) एकदम एखाद पुस्तक हातात घेतो. ते वाचतांना एखादा उतारा आपल्याला आवडून जातो आणि त्याच्या संदर्भाने आठवणाऱ्या घटनांचा एक चित्रपट डोळ्यासमोर (की मनासमोर!) तरळून जातो, पण तो संपला की पुन ्हा एकदा काहीच करावस वाटत नाही. मग आपण उगाचच खिडकीपाशी उभे राहतो आणि समोर दिसणारी व्यक्ती वाचायला लागतो आणि त्यात एवढे गुंतून पडतो की आपल्याला काहीच करायच नव्हत याचाच विसर पडतो. तस पहायला गेलो तर "काहीच करावस" वाटत असतांनाही आपण खूप काही करत असतो. अनेकदा अस वाटण खूप आवश्यक असत, कारण त्या निमित्ताने अनेक अव्यक्त भावना आपण कळत- नकळत व्यक्त करत असतो. कधी कधी भावनांचा गुंता सोडवायला अस वाटण्याची खूप मदत होत असते. © *पार्थ कपोले *२०/९/२०१४

"गावा"वर अवलंबून असलेल शहर

कपडे  घ्यायचे - चला गावात, भाजी घ्यायची - चला गावात, पुस्तक घ्यायचे- चला गावात,असे शब्द कानावर पडले कि समजायचे कि आपण धुळ्यात आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी धुळेकर गावावर अवलंबून आहेत. धुळे शहराचे नैसर्गिकरीत्या पांझरा नदीमुळे गाव आणि देवपूर असे २ भाग झाले आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ म्हणजे आग्रा रोड (पूर्वीचा मुंबई - आग्रा महामार्ग), पाच कंदील मार्केट. धुळे करांचे खरेदी विषयक भावविश्व हे या दोन भागांशी घट्ट जोडलेलं आहे. अगदी लहानात लहान खरेदी सुद्धा गावात जाऊन केल्याशिवाय धुळे करांचे समाधान होत नाहि. आता आपण धुळ्यातील हि खरेदी विषयक महत्वाची ठिकाणे पाहुया.  कपड्यांसाठी आकाशदीप, जुगल वस्त्रालय, विजय, रेमंड, पारंपारिक आणि अभिजात वस्त्रांसाठी न्यू क्लोथ , खंडू गणपत शेठ वाणी (खास खण कापड! ), त्यानंतर सौदर्य प्रसाधने, सजावटीच्या वस्तू यासाठी यासाठी खोल गल्लीतील(अथवा बांबू गल्ली) राजू भावसार फेटेवाले, अलंकार. त्यानंतर पुस्तकांच्या आणि फुलांच्या खरेदीसाठी फुलवाला चौक. भेटवस्तू , क्रोकरी  यासाठी फक्त आणि फक्त ओल्ड आणि न्यू कादरी. भाजी, फळे,  मसाले यासाठी तर पाच कंदील मार्केट ला पर्यायच नाहि! ध

मन........तुटतं तेव्हा

आपलं मन. एक असा मित्र ज्याचा आपल्याला नेहमीचं आधार वाटत असतो, प्रसंगी धाक सुद्धा. अगदी साध्या गोष्टीपासून ते अगदी महत्वाच्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्यात आपल्या मनाचा आपल्याला प्रचंड आधार असतो. तर असं हे आपल मन अचानक कुणाबद्दलतरी फार विचार करायला लागतं, अगदी दिवसरात्र ते त्याच्याच विचारात असतं, त्याच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायलाही ते तयार असतं. पण.... समोरच्या व्यक्तिला त्याचं काहीच सोयरसुतक नसतं. त्याच्यासाठी तो निव्वळ एक खेळ असतो. आणि एक दिवस अचानक खेळ अर्ध्यावर मोडून ती व्यक्ति निघून जाते, मनाला एकटं सोडून. मग मात्र मन बहकतं, वेड्यासारखं वागायला लागतं. आता ते कुणावरचं विश्वास ठेवायला तयार नसत. कारण ते आतून पूर्णपणे तुटलेल असतं.......... मित्रांनो, कुणाच्याही मनाशी उगाचच खेळू नका, कारण मन तुटल्याचं दुःख फार फार मोठ असतं.

आपलं दूरदर्शन

इमेज
काल खूप दिवसांनंतर दूरदर्शनवर 'मिले सुर मेरा तुम्हारा' ऐकलं आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या..... सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी जेव्हा केबलचा इतका प्रसार झाला नव्हता तेव्हा दूरदर्शनच आपलं मनोरंजन करतं होत, दूरदर्शनचा लोगो, त्याचं ते थीम साँग या साऱ्या गोष्टी अगदी अप्रतिम होत्या. आठवतयं मित्रांनो... रविवारच्या सकाळची सुरूवात हेमा मालिनी यांच्या 'रंगोली' ने व्हायची आणि नंतर 'श्रीकृष्ण' मालिका बघूनच आपली आंघोळ व्हायची. दूरदर्शनवर लागणाऱ्या मालिकाही अतिशय दर्जेदार होत्या, आजच्या उथळ आणि भपकेबाज मालिकांची त्यांच्याशी बरोबरी होऊच शकत नाही. शनिवारी लागणाऱ्या 'शक्तिमान' ने तर आपल्या सर्वांना अगदी वेड केल होत, मी तर ते पाहण्यासाठी कित्येकदा शाळेत उशीरा जायचो. त्याच्याही आधी 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांनी तर संपूर्ण भारतालाचं वेड लावलं होतं. रात्री लागणारे 'छायागीत', 'चित्रहार' यांची आतुरतेनं वाट पाहायचो आपण, त्यांची सर आजच्या म्यूझीक चँनेल्सना येणं शक्यच नाही. दर सोमवारी लागणारे 'ओम नमः शिवाय', अलिफ लैला(सिंदबाद) आणि