पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रामजन्मभूमी आंदोलनाचे नायक अस्ताला

इमेज
भाजपच्या आतापर्यंतच्या इतिहासात राम मंदिर आंदोलनास अतिशय महत्वाचे स्थान आहे. किंबहुना भाजपला राम मंदिरामुळे सर्वप्रथम सत्तासोपन चढणे शक्य झाले होते. मात्र, यावेळी भाजपने राम मंदिराच्या मुद्याला अलगद बाजूला सारले आहे, त्यासोबतच आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अन्य दिग्गज नेतेही यावेळी निवडणूकीच्या मैदानात नाहीत. "भाजपा के तीन धरोहर- अटल, आडवाणी, मुरली मनोहर" ही घोषणा एकेकाळी लोकप्रिय होती... नव्वदच्या दशकात लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेमुळे देशात अभुतपूर्व ‘रामज्वर’ निर्माण झाला होता. भाजपचे सहसंस्थापक असलेले लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रेद्वारे राम मंदिराच्या मुद्यास हिंदू अस्मितेशी जोडण्यात यश मिळविले होते. त्यानंतर 1992 साली कारसेवकांनी वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा उध्वस्त करीत हिंदू अस्मितेवरील आक्रमण मोडून काढल्याचा दावा केला होता. या आंदोलनामुळे भाजपला मोठा राजकीय फायदा झाला, कारण 1984 साली केवळ दोन जागांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला 1989 साली तब्बल 85 जागा मिळाल्या, त्याचप्रमाणे 1998 – 1999 साली अटल