पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजधानीत रंगली दिवाळी पहाट !

इमेज
सकाळी साडेपाच-सहाची वेळ, हिवाळ्याची नुकतीच चाहुल लागल्यामुळे वातावरणात असलेला सुखद गारवा, खास ठेवणीतला झब्बा, पायजमा, आणि पैठणी परिधान करून आलेली मंडळी, त्यावरच्या अत्तराच्या हलक्या शिडकाव्याने आसमंतात भरून गेलेला हलकासा गंध आणि सज्ज झालेला रंगमंच ! आता सुरू होणार अभिजात आणि सुरेल मराठी गाण्यांची मैफल...... हे वर्णन ‘दिवाळी पहाट’चे आहे, हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेलच. मात्र, ही ‘दिवाळी पहाट’ रंगली  ती राजधानी दिल्लीत, इंडिया गेटजवळ- राजपथावर !   दिवाळी पहाट म्हणजे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट अगदी उत्साहात साजरी करण्यात येते. अगदी त्याच उत्साहात राजधानी दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे प्रतिष्ठानचे तिसरे वर्ष होते. या कार्यक्रमाचे स्थानही अगदी विशेष होते - इंडिया गेट ! इंडिया गेटची भव्यता सोबतीला असल्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उभारी प्राप्त झाली आणि दिवाळी पहाट अगदी बहारदारपणे साजरी झाली. राजधानीत 2016 साली इंडिया गेटवर दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला, आणि त्याची चर्चा केवळ दि

भाजप पुन्हा रामचरणी ?

इमेज
“1989 साली पालमपूर येथील अधिवेशनात अयोध्येत राम मंदिर उभारण्यासंबंधीचा ठराव केला होता. आता भाजप बहुमताने सत्तेत आहे, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बांधणे ही भाजपची जबाबदारी आहे. त्यात आता केंद्रात मोदी आणि उत्तर प्रदेशात योगी यांचे सरकार आहे, त्यामुळे मंदिर उभारणीस आता कोणतीही अडचण दिसत नाही”. विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार पत्रकारपरिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीस आता अवघे सहा महिने उरलेले असताना संघ परिवारातील एक प्रमुख संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा राम मंदिराचा प्रश्न अजेंड्यावर घेतला आहे. यावेळी मोदी सरकारला संसदेत कायदा करून मंदिराच्या उभारणीस सुरूवात करण्यासाठी 31 जानेवारी 2019 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत मोदी सरकारने कायदा न बनविल्यास 31 जानेवारी रोजी प्रयाग येथे होणाऱ्या धर्मसंसदेत पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल, असा ‘इशारा’ मोदी सरकारला देण्यात आला आहे. अर्थात अशा इशाऱ्यास किती महत्व द्यायचे, हे संघपरिवार आणि भाजपचे राजकारण अभ्यासणाऱ्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. कारण पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आणायचा निर्ण

‘अटल’ चरितकहाणी

इमेज
“अटलजी तेव्हा अवघ्या १५ वर्षांचे होते. डॉक्टरांचे एकदाच घडलेले, पण मनात घर केलेले दर्शन त्यांच्या डोळ्यांपुढून जात नव्हते. अशा अस्वस्थ आणि भारलेल्या मनस्थितीत त्यांच्या मनात एक एक शब्द जुळू लागला. कवितेची एकेक ओळ जन्म घेऊ लागली. अटल कागदावर एकेक ओळ लिहू लागला. त्या कवितेची पहिलीच ओळ होती... हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय...” माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुत्वविचार ठामपणे, मात्र अन्यांना न दुखविता मांडणारा एक कुशल राजनेता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता. प्रथम जनसंघ, अल्पकाळ जनता पक्ष आणि नंतर दीर्घकाळ भारतीय जनता पक्षाला दिशा देणारा मार्गदर्शक, आपल्या अमोघ वक्तृत्व आणि परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाने पं. नेहरूंचेही लक्ष वेधून घेणारा खासदार, लालकृष्ण आडवाणींचा सख्खा मित्र, लहानग्यांना ‘स्कुल चलें हम’ या अनोख्या गाण्याच्या रूपात सकाळी सकाळी भेटणारा प्रेमळ चेहरा, कर्तव्यकठोर पंतप्रधान आणि भारतरत्न... अशा विविध रूपांमध्ये अटलजींनी तब्बल पाच – सहा दशके

अविश्वास ठरावाचे कवित्व- निवांत सत्ताधारी, गोंधळलेले विरोधक

इमेज
तेलुगू देसम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर उद्या लोकसभेत चर्चा होणार आहे. चार वर्षांच्या कालावधीत प्रथमच मोदी सरकार अविश्वास ठरावास सामोरे जाणार असून सरकार त्यासाठी तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितले. संख्याबळ बघता मोदी सरकारला कोणताही धोका नसल्याचे चित्र आहे, तर विरोधकाना मात्र संख्याबळ जमविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला असला तरीदेखील अविश्वास ठरावाच्या निमित्ताने विरोधकांच्या मर्यादा उघड्या पडण्याचीच शक्यता जास्त आहे. असे आहे संख्याबळ 545 सदस्यांच्या लोकसभेत बहुमतासाठी 273 एवढ्या संख्याबळाची आवश्यकता आहे. तेवढे संख्याबळ भाजप सरकारकडे असल्याने सरकारला अविश्वास ठरावाचा कोणताही धोका नाही. भाजपचे 273 खासदार आणि रालोआ घटकपक्षांचे 39 खासदार असे एकूण 311 सदस्यांचे भक्कम पाठबळ मोदी सरकारकडे आहे. विरोधकांचे संख्याबळ बघता काँग्रेस 48, अण्णाद्रमुक 37, तृणमूल काँग्रेस 34, बिजू जनता दल 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी प

राजधानीत पडले मराठमोळं 'पुढचं पाऊल' !

इमेज
मराठमोळं 'पुढचे पाऊल' राजधानी दिल्ली मध्ये कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या नव्या महाराष्ट्र सदनात गेल्या आठवड्यात 5 आणि 6 मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परराष्ट्र विभागातील सचिव आणि ‘पासपोर्ट मॅन’ अशी ओळख असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने राजधानीत विविध विभागात कार्यरत असणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांना एकत्रित करून ‘पुढचे पाऊल’ या विशेष सकारात्मक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचाच एक उपक्रम म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘महाराष्ट्र महोत्सव- जागर महाराष्ट्राचा’ या दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राचा ठसा आज राजधानीमध्ये फारसा दिसत नाही. राजधानीमध्ये महाराष्ट्रास नेहमीच सापत्न वागणूक देण्यात येते. खरे पाहता देशाच्या अर्थकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या महाराष्ट्रास दिल्लीच्या राजकारणात नेहमीच कमी महत्त्व दिले जाते. अन्य राज्यांप्रमाणे राजधानीत महाराष्ट्र फारसा कुठेच दिसत नाही. अन्य राज्यांचे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष असे दबावगट राजधानीत नेहमीच सक्रियरित्या कार्यरत

संविधान बचाव ते शरियत बचाव: एक पुरोगामी प्रवास

इमेज
“मुस्लिम भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन, धर्मगुरूंना विश्वासात घेऊन काय पाऊल टाकायचं ते टाकता येईल. पण तलाक हा कुराणाने इस्लामच्या माध्यमातून दिलेला मार्ग आहे, संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याही राज्यकर्त्यांना नाही.” प्रथमदर्शनी हे विधान कोणा मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्या, धर्माला स्वत:ची वैयक्तिक जहागिरी मानणाऱ्या मुल्ला-मौलवीचे असावे, असा आपला समज होईल. मात्र तो समज साफ चुकीचा आहे. हे विधान आहे भारतीय राजकारणातील धुरंधर, फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार मानणारे आणि त्यावरच वाटचाल करणारे, नेहमी पुरोगामी भुमिकाच घेत प्रतिगाम्यांना शह देणारे असे पद्मविभुषण रा. रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांचे. धक्का बसला ना ?, पण शरदजी साहेबांचे राजकारण हे असेच, धक्के दिल्याशिवाय पुढे न जाणारे ! शरदजी साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान राज्यसरकारच्या कारभाराविरोधात ‘हल्लाबोल यात्रे’चे आयोजन केले होते. त्याचा समारोप काल औंरंगाबाद येथे झाला. समारोपाच्या सभेत शरदजी साहेबांनी वरील निखळ पुरोगामी, विवे