पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोदींनंतर ‘शहा’च...?

इमेज
“ऐ कून घेण्याची सवय आता लावून घ्या ओवेसी साहेब. ऐकून घ्यावेच लागेल. कोणाला घाबरविण्याचा प्रश्नच नाही, पण एखाद्याच्या मनातच भय असेल, तर त्यावर आम्ही काहीही करू शकत नाही...”. लोकसभेत एनआयए सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी एआयएमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना अशा भाषेत सुनावले. त्यानंतर सभागृहात भाजपच्या खासदारांनी बाके तर वाजवलीच, मात्र समाजमाध्यमांवरही भाजप समर्थक दोन दिवस याच गोष्टीची चर्चा करीत होते. अमित शहा यांचा हा आक्रमकपणा भाजप आणि समर्थकांच्या वर्तुळात नेहमीच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. यापू्र्वी केवळ पक्षाध्य़क्ष असताना ज्या ज्या वेळी शहा भाजप मुख्यालयात असतील, त्या त्या वेळी मुख्यालयात कमालीची शांतता पहावयास मिळायची. मुख्यालयात उगाच येणाऱ्या ‘भाईसाहब’ मंडळींनी तर कामाशिवाय येणेच बंद केले आहे. एकुणच शहा यांचा आदरयुक्त दरारा असल्याचे चित्र आहे. त्यात शहा यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज लावणे अगदीच कठीण, कारण कोणाशीही बोलताना त्यांचा चेहरा अगदी कोरा असतो, कामापुरती प्रतिक्रिया देणे ते पसंत करतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या

कार्यकर्त्याचे भावविश्व जगणारा नेता

इमेज
[चंद्रकांत पाटील यांची आजच महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा हा लेख. सदर लेख दैनिक मुंबई तरुण भारतमध्ये 16 जुलै, 2016 रोजी प्रकाशित झाला होता.] “चंद्रकांत पाटील यांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ते उत्तम संघटक आहेत. त्यांचे संघटनकौशल्य हे वादातीत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असताना त्यांना मी फार जवळून पाहीलंय. सरकारमध्येही आता ते उत्तम कामगिरी करणार, असा माझा विश्वास आहे”. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे सांगतात. सध्या महाराष्ट सरकारमध्ये चंद्रकांत दादा हे महसुल, मदत व पुर्नवसन आणि सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती सांभाळत आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. चंद्रकांत दादा यांचे नेतृत्व हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेतून पुढे आले. विद्यार्थी संघटना म्हटली की संघर्ष हा आलाच. त्याचप्रमाणे दादांचे नेतृत्वही संघर्षातून तावून सुलाखून निघालेले असे ‘आंदोलनात्मक नेतृत्व’ आहे. दादांच्या नेतृत्वाचे असे अनेक पदर सांगता येतात. त्याबद्दल प्रा. दे