आम्ही दांभिक

दांभिकता हे आपल्या समाजाच एक वैशिष्ट्य. प्रत्येक गोष्टीत म्हणजे खानपान, कपडेलत्ते, पेहराव, साहित्य, व्यवसाय अशा सर्व बाबतीत दांभिकता दाखवल्याशिवाय आमचं समाधानचं होत नाही. विशेष म्हणजे त्या दांभिकतेचं समर्थन धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा आदींच्या आडून करण्याचं कसब तर अगदी विशेषचं !

म्हणजे एकीकडे ‘आम्ही जात वगैरे मानत नाही’ म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र लग्नप्रसंगी जात आवर्जुन बघायची, अगदी साध्यासाध्या गोष्टी ‘आमच्यात हे चालत नाही असं’ म्हणून टाळायच्या, एकीकडे तोकडे कपडे, अंगप्रदर्शन यावर सडकून टीका करायची आणि दुसरी पैराणिक मालिकांमधील अंगप्रदर्शन आणि तोकडे कपडे भक्तीभावाने बघायचे. त्यातूनच मग ‘सॅटेनिक व्हर्सेस’ लिहिणाऱ्या सलमान रश्दींविरोधात फतवे निघतात आणि ‘बजरंगी सेना’ नामक गणंकांची टोळी खजुराहोच्या शिल्पांवर बंदी घालायची तद्दन आचरट मागणी करते. या दांभिकपणातून आपण वेळीच बाहेर पडले नाही तर समाज म्हणून आपण मागेच राहणार हे नक्की.

वेश्या हा शब्द ऐकताच  अंगावर पाल पडल्यासारखे  "शी"  असे किंचाळणारे
आपण प्रतिष्ठित नागरिक
आपल्यात आणि वेश्येत  फारसा फरक नाही  हे विसरणारे आपण प्रतिष्ठित  आम्ही राहतो तो समाज  आणि त्या राहतात  ती वेश्यावस्ती  अशी समजूत पण रोज शुचिर्भूत  होऊन तेच करणारे प्रतिष्ठित  पण आपण एक गोष्ट  विसरत असतो  ही  गिऱ्हाईक  आपल्यातलीच  प्रतिष्ठित असतात
आज आपल्या समाजच रुपांतरही  वेश्यावस्तीत होऊ लागलय  रोज शुचिर्भूत होऊन  सोवळ्याचा आव आणायचा  आणि नंतर तथाकथित मूल्यांचा  खुलेआम बलात्कार करायचा  आज आपण प्रतिष्ठीतांनी  समाजाला दांभिक बनवलंय खुलेआम तथाकथित मुल्यांचा धंदा मांडून  आणि  आपणच गिऱ्हाईक  बनलोय  

●पूर्वप्रसिद्धी: 'सहज सुचलेलं', बहर- दैनिक आपला महाराष्ट्र, १८ जून २०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

पाळणाघरं- गरज आणि वास्तव

हिंसक माणिक 'सरकार'