पोस्ट्स

मे, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दीड वर्षाने मिळाली ‘ती’ सायकल...

इमेज
‘विक्रम पेंडसे सायकल्स- अ जर्नी इन्टू द पास्ट’ सायकल. आपणा सर्वांची पहिली दुचाकी. सायकल म्हटलं की अनेक गोष्टी आपसूकच डोळ्यासमोर तरळून जातात. म्हणजे अगदी हट्ट करून घेतलेली पहिली सायकल, लंगडी करत सायकल शिकणे, मित्रमंडळींसोबत सायकलच्या लावलेल्या शर्यती, सायकलला खास रेडीयम वगैरे लावून सजवणे, नियमित तेलपाणी करणे, घाईच्या वेळी सायकलची हमखास उतरणारी चेन आणि अगदी भर रस्त्यात सायकल उलटी पाडून बसवलेली ती चेन, त्यात आॅईलने माखलेले हात... एक ना दोन अशा अनेक आठवणी. विक्रम पेंडसे कालांतराने मग सर्वांच्याच आयुष्यातून सायकल रजा घेते आणि आपण मोटरसायकलला सरावतो. पण तरिही अगदी व्यायामासाठी का होईना, पुन्हा सायकलकडे वळतोच आपण. कारण आयुष्यातली पहिली गोष्ट माणूस सहसा विसरत नाही. मग ते प्रेम असो की सायकल ! आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी बाबांच्या अॅटलासच्या सायकलच्या दांडवर बसून मनसोक्त फेरफटका मारल्याचं आठवत असेलच... तर अशा या सायकलबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे पुण्यातल्या विक्रम पेंडसे या सायकलप्रेमीनं चक्क तीन मजली सायकलचं अनोखं असं संग्रहायलय उभारलय. अवघ सायकलविश्व सामावलंय त्यात. पुणे तसं सायकल

पुतिन

इमेज
व्लादिमिर व्लादिमिरोविच पुतिन “पुतिन हे कमालीचे केंद्रवादी... सेंट्रिस्ट... अशा मताचे आहेत. देशाचं केंद्र अत्यंत सामर्थ्यवान असायला हवं, असं त्यांचं मत आहे. अत्यंत सामर्थ्यवान केंद्र आणि आसपास छोट्या छोट्या आज्ञाधारक देशांची पिलावळ हा त्यांचा राज्यविचार आहे. केंद्र सक्षम असलं की, परिघावरच्या उचापतखोरांना आळा बसतो, असं त्यांना वाटतं. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर पुतिन यांची ही मानसिकता दिसून आली आहे. ‘सोविएत रशियाचं विघटन ही या शतकातली सर्वांत मोठी भूराजकीय हाहाकार घडवणारी घटना आहे,’ असं त्यांचं मत आहे. याचाच अर्थ रशिया पुन्हा पूर्वीइतकाच, आपल्या सोविएत काळाइतकाच मजबूत, दरारा निर्माण करणारा असायला हवा, असं त्यांना सातत्याने वाटचत आलेलं आहे. म्हणजे क्रीमीयाचा घास घेणं हा त्यांच्या या योजनेतलाच एक भाग आहे, हे उघड आहे. तो त्यांनी कमालीच्या निष्ठुरपणे राबवला”. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं हे यथार्थ वर्णन. अनेकांना भावणारं तर अनेकांना काळजीत टाकणारं... रशिया. रशियाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात कायमच एक प्रकारचं आकर्षण आहे. म्हणजे अगदी सोविएत रशिया असल्यापासूनचा भारताचा एक खंबीर म

संविधान सर्वोच्च की लाल किताब ?

इमेज
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कम्युनिस्टांच्या विचारसरणीला ओळखून त्यावर नेमकेपणीने भाष्य केलं आहे. बाबासाहेब म्हणतात, “कम्युनिस्टांचा संविधानाला विरोध आहे, तो संविधान कामगारांच्या अहिताचे आहे म्हणून नव्हे ! तर हे संविधान संसदीय लोकशाहीच्या आधारावर उभे आहे म्हणून. कम्युनिस्टांना भारतात प्रोलिट्रीएट लोकांची हुकुमशाही हवी आहे आणि या हुकुमशाहीला अनुसरून त्यांना संविधान हवे आहे. दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे डाव्यांना संविधानातील मुलभूत अधिकारांवर निर्बंध नको आहेत. जेणेकरून ते संसदीय मार्गांनी सत्तेवर येऊ शकले नाहीत तर या अनिर्बंध हक्कांचा वापर करून ते राज्य उलथून टाकू शकतील आणि भारतात हुकूमशाही आणू शकतील.” (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि लेखन, खंड- 17, पृष्ठ क्र. 406). कम्युनिस्ट तत्वज्ञानाने प्रेरीत वगैरे होऊन आदीवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्याच्या उदात्त हेतूने (नक्षल चळवळ आज पूर्णपणे भ्रष्ट झाली असून देशाविरोधात, संविधानाविरोधात त्यांनी उघडउघड युध्द पुकारलं आहे. आदीवासी बांधवांवरही हिसेचा वापर ही मंडळी आज करत आहेत) वगैरे सुरू झालेल्या नक्षली

साँझ की दुल्हन...

इमेज
आनंद. १९७१ सालातला ऋषिकेश मुखर्जींचा सिनेमा सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेला अफाट सिनेमा. हा सिनेमा एकदा बघितल्यावर कधी समाधान होतच नाही. म्हणजे अगदी वारंवार बघितला तरी तो प्रत्येक वेळी अगदी नवा (हो नवाच !) भासतोस. म्हणजे तोच आनंद, तोच डॉ. भास्कर बॅनर्जी, तेच रामुकाका आणि डॉ. कुलकर्णी आणि आनंदला झालेला लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटस्टाइन या अवघड नावाचा कॅन्सरही तोच. एक वेगळीच जादू या सिनेमात आहे. आता त्यात अर्थातच ऋषिकेश मुखर्जीं, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा वाटा सर्वाधिक आहे. सोबत त्यात असलेली गाणी एक वेगळंच वातावरण तयार करतात. अगदी प्रत्येक गाणं अगदी आठवणीत राहणारं आहे या सिनेमातलं. म्हणजे सुरुवातीचं ‘मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने’ असो की ‘जिंदगी कैसी ये पहेली’ असो. त्यापैकी ‘कहीं दुर जब दिन ढल जाए’ हे तर अगदी खास गाणं. म्हणजे हे गाणं ऐकताना जे आपल्यासाठीचं लिहीलंय याची प्रत्येक वेळी खात्री पटते. म्हणजे आनंद गॅलरीत उभं राहून, क्षितिजाकडे पाहत ‘कही दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं म्हणतो तेव्हा ते गाणं ऐकताना तू नकळत आपणही वेगळ्याच व