पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तो बोल मंद हळवासा...

इमेज
पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत होतो, २०१२ची गोष्ट. नुकत्याच नवीन झालेल्या दृकश्राव्य सभागृहात संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी सव्वापाच वाजेपासूनच तिथे येऊन बसलो होतो. मांडलेल्या सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या तरीही व्यासपीठासमोरच्या मोकळ्या जागेतच बसलो होतो, जेणेकरून अधिक जवळून त्यांना अनुभवता यावं. आणि बरोबर सहा वाजता त्यांचं व्यासपीठावर येणं झालं. आजवर त्यांना वाढलेली दाढी आणि कधीकधी डोक्यावर हॅट या वेशात पाहीलेलं असल्याने थोडं वेगळं वाटलं. सुरुवातीला परिचय, सत्कार वगैरे सोपस्कार संपल्यावर त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि पुढचे दोनेक तास ते मनमुराद बोलत होते आणि आम्ही अगदी तल्लीन होऊन ऐकत होतो. ग्रेस उपाख्य माणिक सिताराम गोडघाटे या माणसाचं पहिलं दर्शन (आणि दुर्दैवानं शेवटचंही. कारण त्या कार्यक्रमानंतर अवघ्या आठेक दिवसातचं ग्रेस गेले !) या अशा पध्दतीने झालं. तोपर्यंत अनेकांकडून ग्रेसबद्दल ऐकलं होतं, काही कविताही वाचल्या होत्या त्यांच्या. त्यातून ग्रेस या व्यक्तीभोवती एखादं गुढवलय वगैरे आहे, असं वाटायला लागलेलं. त्या कार्यक्रमात ते खरं असल्याचं जाणवलंही. आणि मग

बात निकलेगी तो फिर...

इमेज
अनेकदा आपल्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडत असतात, की त्यामुळे आपण अगदी अस्वस्थ होतो. आणि ती अस्वस्थता आपल्या रोजच्या आयुष्याचा पार मोठा भाग व्यापून टाकते. त्यामुळे आपला रोजचा दिनक्रमचं अगदी बिघडून जातो. आणि त्या घडामोडी काहीही असू शकतात. प्रेमात पडणं, प्रेमभंग होणं, जवळच्या व्यक्ती एकदम दुर होणं, ओळखीच्या व्यक्ती अचानक अनोळखी होत जाणं, आणि त्यात आपण एवढे अडकून पडलेलो असतो की विचारता सोय नाही. अगदी कधीही त्या घडामोडी आपल्यावर परिणाम करत असतात. म्हणजे स्थळ-वेळ-काळ याचं बंधनचं जणू त्यांना मान्य नसतं.  मग अशा वेळी काफील अजहरनी लिहिलेली आणि जगजीत सिंगांनी गायलेली गझल आपल्या मनाचं अगदी यथार्थ वर्णन करते.... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे ये भी पूछेंगे के तुम इतनी परेशान क्यों हो उंगलीयाँ उठेंगी सूखे हुए बालों की तरफ म्हणजे जर आपण अस्वस्थ झालोय, हे एकदा अन्यांना समजलं की मग त्यांचे प्रश्न सुरू होतात. प्रश्नांची सरबत्तीच असते ती.. त्याला काय उत्तर द्यावं, याचा  विचार करून आणखीनच गुंता वाढतो. कारण लोकांना आपल्या मनाची अस्वस्थता जाणून घेण्यात

त्यांना आपण गृहित धरतोय...

इमेज
“श्रमिकांच्या म्हणजे विविध प्रकारची कामं करणाऱ्या आणि तुलनेने समाजातील निम्न स्तरातील लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल कोणत्याही आस्था नसते, महत्त्व नसतं. त्यांना फक्त दोनवेळच्या जेवणाची आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाची चिंता असते. शिवाय शिक्षण हे त्यांना परवडणारंही नसतं. हे अत्यंत चुकीचं अॅनालिसिस आपण करत आलेलो आहोत. त्यात काहीही तथ्य नाही. खरं तर आपण या त्यांच्या प्रश्नांना समजून घ्यायला कमी पडतोय. कारण आपण त्याचा विचार आपल्या पद्धतीने करतोय. त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण बरंच काही करू शकतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलांना आपण सपोर्ट देऊ शकतोच. पण ते आपल्यापैकी किती लोक करतात.. आपण फक्त लांब राहून चुकीचे निष्कर्ष काढण्याचं काम करत असतो. खरं तर त्यापेक्षा खूप काही करता येण्यासारखं आहे आपल्याला.” रजनी परांजपे बोलत होत्या. रजनी परांजपे. पुणे आणि मुंबईत गेल्या 25 वर्षांपासून ‘डोअरस्टेप स्कूल’ ही संस्था चालवणाऱ्या शिक्षणसाधक... साधक याच्यासाठी की अतिशय निरपेक्ष भावनेने आणि काहीतरी बदल घडावा या उद्देशाने रजनीजी काम करताय. त्यातला हेतू एक