पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नक्षलवाद : बदलते स्वरूप

इमेज
स ध्या स्वतंत्र भारतातील एक हिंसक मात्र कथित वैचारिक बैठक असणारी चळवळ म्हणजे नक्षलवादी चळवळ. देशातील रेड कॉरिडॉर म्हणवला जाणारा पशूपती ते तिरूपती आणि देशातील महत्त्वाची शहरे अशा विस्तीर्ण प्रदेशावर या चळवळीने आपले हातपाय पसरले आहेत. ज्याप्रमाणे हत्तीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, त्याचप्रमाणे या चळवळीचंही आहे. “देशातील आदीवासी, गरीब, कष्टकरी, कामगार या शोषित वर्गांना त्यांचे न्याय्य हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठा आम्ही भांडलदारांचे हस्तक असलेल्या सरकारविरूद्ध संघर्ष करत आहोत” अशा अगदी कोणालाही प्रथमदर्शनी सहानुभूती आणि आकर्षण वाटावं अशा शब्दात या चळवळीचं समर्थन केलं जात. मात्र वास्तव काहीतरी वेगळंच आहे, कारण सध्या नक्षल चळवळ ही पूर्णपणे भरकटलेली असून देशात हिंसक कारवाया करून अराजक माजवणे, हाच एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे. त्यांना आता आदीवासी, गरीब, कष्टकरी आणि कामगार वर्गाशी, त्यांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. कारण आता हिंसेची आणि अराजकाची एक नशा या चळवळीस चढलेली आहे. आणि या भयंकर नशेत त्यांना परकीय शक्तींची मदत मुक्तहस्ते होत असते. त्यामुळे संविधानावर चाल