पोस्ट्स

जून, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता

इमेज
सत्यजित आज पुन्हा एकदा तोच चित्रपट बघत होता. कितव्यांदा ? खर तर त्याने आता मोजणं सोडूनच दिल होत. म्हणजे आधी मोजायचा वगैरे नाही, पण म्हणजे लक्षात राहायचं त्याच्या. पण तो चित्रपट बघतांना आठवणीत बुडून जायला आवडायचं त्याला. म्हणजे चित्रपट त्याला स्वतःचीच गोष्ट वाटायचा. दि. २७ डिसेंबर २०१३ (२६ डिसेंबर संपून २७ लागलेला म्हणजे रात्री १२ नंतर...) वाढदिवस असल्याने Whats App वर सर्वांचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. पण तो अजूनही अस्वस्थ होतो, कारण अजून तिचा मेसेज आलेला नव्हता. तो येणार अशी त्याला खात्री होती... उगाचच दहा वेळा तिची chat window चेक करत होता. ती ऑनलाईन आहे हे पाहून सारखा अस्वस्थ होत होता. “पण मी अस्वस्थ का होतो? हे मला माहित नाही. खरच अस्वस्थ होण्यासारखं काही होता का ? आपण एखाद्या व्यक्तीसाठी अस्वस्थ होतो कारण त्या व्यक्तीच आपल्या आयुष्यातलं स्थान जरा खास असत म्हणून. मग तसं काही होतं म्हणून मी अस्वस्थ होतो का ?” अखेर १.३० वाजता तिचा मेसेज आला........ अॅमी : happy birthday सत्यजित : thanks मी जवळपास १० वेळा wts app चा DP उगाचच बदलण्याचा चाळा करत होतो... का ? ते  म

आम्ही दांभिक

इमेज
दांभिकता हे आपल्या समाजाच एक वैशिष्ट्य. प्रत्येक गोष्टीत म्हणजे खानपान, कपडेलत्ते, पेहराव, साहित्य, व्यवसाय अशा सर्व बाबतीत दांभिकता दाखवल्याशिवाय आमचं समाधानचं होत नाही. विशेष म्हणजे त्या दांभिकतेचं समर्थन धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा आदींच्या आडून करण्याचं कसब तर अगदी विशेषचं ! म्हणजे एकीकडे ‘आम्ही जात वगैरे मानत नाही’ म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र लग्नप्रसंगी जात आवर्जुन बघायची, अगदी साध्यासाध्या गोष्टी ‘आमच्यात हे चालत नाही असं’ म्हणून टाळायच्या, एकीकडे तोकडे कपडे, अंगप्रदर्शन यावर सडकून टीका करायची आणि दुसरी पैराणिक मालिकांमधील अंगप्रदर्शन आणि तोकडे कपडे भक्तीभावाने बघायचे. त्यातूनच मग ‘सॅटेनिक व्हर्सेस’ लिहिणाऱ्या सलमान रश्दींविरोधात फतवे निघतात आणि ‘बजरंगी सेना’ नामक गणंकांची टोळी खजुराहोच्या शिल्पांवर बंदी घालायची तद्दन आचरट मागणी करते. या दांभिकपणातून आपण वेळीच बाहेर पडले नाही तर समाज म्हणून आपण मागेच राहणार हे नक्की. वेश्या हा शब्द ऐकताच  अंगावर पाल पडल्यासारखे  "शी"  असे किंचाळणारे आपण प्रतिष्ठित नागरिक आपल्यात आणि वेश्येत  फारसा फरक नाही  हे विसरणारे आप

हिंसक माणिक 'सरकार'

इमेज
‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात पुष्पा कपाली या महिलेची कहाणी तर अंगावर काटा आणणारी आहे. ही महिला सात महिन्यांची गरोदर होती. माकपचे कार्यकर्ते तिच्या घरात शिरले. तिला मारहाण केली. मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. पोटातील अर्भकाचा बळी गेला. पुष्पा कपालीचा गुन्हा एवढाच होता, की ती भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत होती. एका गर्भवती महिलेला लाथाबुक्क्याने मारण्यासाठी किती क्रौर्य लागत असेल ? माकप कार्यकर्त्यांच्या क्रौर्याचे हे अपवादात्मक उदाहरण नाही. माकपचा डोलाराच या क्रौर्य आणि आणि दहशतीवर उभा आहे ! अडीच दशकांच्या काळात त्रिपुरामध्ये काडीचाही विकास न करता याच क्रौर्यावर माकपने आपल्या सत्तेचा गड शाबूत राखला.’ हिंसा आणि क्रौर्याचा 'हसरा चेहरा'- माणिक सरकार माणिक सरकार. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते. देशातील सामान्य जनतेला या माणिक सरकारांचे कोण कौतुक...  'माणिक सरकार कसे साधेपणाने राहतात, माणिक सरकार कसे कमी पैशात जगतात, माणिक सरकार कसे फक्त एक रूपया पगार घेतात, माणिक सरकार कसे लोकाभिमुख कारभार करतात, माणिक सरकार कसे त्रिपुराचा

पाऊस

इमेज
पाऊस... तसं पाहायला गेलो तर तीन अक्षरी, अगदी साधा शब्द. इतर शब्दांसारखाच अगदी. पण हा शब्द आपल्या प्रत्येकासाठी अगदी खास, जिवाभावाचा. लहानपणापासून आपल्याला हा पाऊस वेड लावत असतो. पाऊस आला रे आला की लहानपणी कागदाच्या होड्या सोडायला अगदी वेड्यासारखे धावत सुटायचो आपण. त्यासाठी कित्येकदा आई-बाबांचा ओरडा (आणि मारसुद्धा !) आनंदाने सहन करायचो आपण. कागदाच्या होड्या सोडण्यात, पावसात मनसोक्त नाचण्यात, डबक्यातलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात एक वेगळीच नशा असायची. त्यावेळी डबक्यातलं पाणी खराब वगैरे असत, त्यामुळे विविध आजार होतात हे असे विचार मनातही नसायचे आपल्या. तर असा पाऊस एकच असला म्हणजे जगाच्या सर्व भागांमध्ये तो सारखाच असला तरी त्याला अनुभवायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. शेतकऱ्याचा पाऊस, लहान मुलांचा पाऊस, कुटुंबाचा पाऊस, गरीबाचा पाऊस, श्रीमंताचा पाऊस, मित्रांचा पाऊस, मैत्रिणींचा पाऊस, प्रेमात पडू पाहणाऱ्यांचा पाऊस, प्रेमात पडलेल्यांचा पाऊस, प्रेमभंग झालेल्यांचा पाऊस (ही यादी आणखीही वाढवता येईल) अशा प्रत्येकाचा पाऊस हा वेगळाच असतो हे मात्र नक्की. हा पाऊस आपल्याला दरवषी भेटत असतो, प

सर्जनशिलता हेच डिजीटल आव्हानाला उत्तर

इमेज
  पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत 16 मे 2017 रोजी अर्थअभ्यासक अभय टिळक यांचे ‘ आव्हान डिजीटल विश्वातील रोजगाराचे ’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यात त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. सध्याच्या परिस्थितीत डिजीटल आव्हानाचा सामना करणं हे प्रत्येक राष्ट्रासाठी महत्वाचं आहे, आणि भारतासाठी तर ते अधिकच महत्वाचं. अवघ्या सातच वर्षांनंतर ही व्याख्यानमाला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करेल. त्या वसंत व्याख्यानमालेसारख्या पुण्यातल्या प्रतिष्ठीत आणि प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या मालेत मला बोलायची संधी दिल्याबदद्ल मी संयोजकांचा आभारी आहे. अर्थशास्त्रासारख्या विषयावर मला बोलायला सांगितल्याबदद्ल संयोजकांचे आभार. एक योगायोग असा आहे की या व्याख्यानमालेचे प्रणेते महादेव गोविंद रानडे हे हिंदी अर्थशास्त्राचे जनक. आणि प्रामुख्याने भारतासारख्या परसत्तेच्या अधीन असलेल्या देशाची अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर कशा प्रकारचं प्रशासन, योजना आणि कशाप्रकारच्या लोकेच्छा अंगिकारल्या पाहिजेत त्यासाठी न्यायमूर्तींनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि रानड्यांच्या आगेमागे म्हणजे फुल्यांपासून ते आंबेडकरांप