पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आप क्रोनोलॉजी समझिए...

इमेज
सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्याच्या नावाखाली दिल्लीत नियोजनपूर्वक हिंसाचार घडविण्यात आला आहे. केंद्र सरकार एकाही दंगेखोराला सोडणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाचा असो अथवा कोणत्याही धर्माचा असो. पुन्हा अशा प्रकारचा हिंसाचार घडविण्याची त्याची हिंमत होणार नाही, अशी कारवाई करण्यात येईल. हिंसाचार कोणी घडविली, त्यासाठी कोणी पैसा पुरविला, कोणत्या संस्था – संघटना त्यात होत्या याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे आली आहे. त्यामुळे हिंसाचार घडवून आपण नामानिराळे राहू, असे कोणास वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे... अशा शब्दात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिल्ली हिंसाचारावरील चर्चेस उत्तर दिले. ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ हे शहांचे आवडते वाक्य. आपल्या भाषणात त्यांनी दिल्ली हिंसाचाराचे नेपथ्य कोणी आणि कसे केले हे अगदी सविस्तर मांडले, त्यामुळे त्यांच्याच शब्दात सांगावयाचे तर दिल्ली हिंसाचाराची बाजू घेणाऱ्यांना आता ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ असा सवाल सर्वांनी विचारायला हवा. सुधारित नागरिकत्व कायदा, जनगणनेसोबत होणारा एनपीआर आणि अद्याप मसुदाही तयार नसणाऱ्या एनआरसीविरोधात विशिष्ट समुदायाकडून दिल