पोस्ट्स

जुलै, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'आनंद'

इमेज
प्रिय ‘आनंद’, अरे बाबा तू अशी काय जादू केली आहेस ते एकदा तरी कळू देशील का ? की आम्ही कायमचं ते उत्तर शोधण्यात गुंतून राहणार आहोत... की तुझीच तशी इच्छा आहे ? काहीतरी तरी सांगशील का ? कारण बघ ना, तुला केव्हाही बघितलं तर तू प्रत्येक वेळी अगदी नवा (हो नवाच !) भासतोस. म्हणजे तोच आनंद, तोच डॉ. भास्कर बॅनर्जी, तेच रामुकाका आणि डॉ. कुलकर्णी आणि तुला झालेला लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटस्टाइन या अवघड नावाचा कॅन्सरही तोच. मग असं काय आहे की तू प्रत्येक वेळी नवा वाटतोस ?. म्हणजे होतं असं की तुला एकदा पाहिल्यावर तू प्रत्येक वेळी नवा भासतोस, मग ते नवेपण शोधायला तुला पुन्हा पाहतो, पण प्रत्येक वेळी फक्त प्रश्नच तयार होतात, त्यांची उत्तरं काही मिळतच नाहीत. कधी कधी वाटत मग कि जर उत्तर मिळत नाहीयेत तर मग मग आता तुला पहायचच नाही. पण खर सांगायचं तर तुझ्यापासून लांबही जाववत नाही रे. तू ना असं मधल्यामध्ये अडकवून ठेवलयसं. तू जेव्हा ‘दोस्त’ अशी हाक मारत आत येतो ना खर तर तेव्हाच तुझ्यात अडकून पडलेलो असतो. आणि नंतर ओळखही नसलेल्या डॉ. भास्कर बॅनर्जींना जेव्हा तू ‘बाबूमोशाय’ अशी हाक मारतोस ना, तेव्हा तू आम्हाल