पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धुळयातील संस्थावैभव

इमेज
एखाद्या शहराच्या एकूणच जडणघडणीत विविध संस्थांचा फार मोठा वाटा असतो. संस्था म्हणजे समाजाला दिशा देणारी एक व्यवस्था. संस्थांमुळे  समाज हा कायम जागृत राहतो, विविध प्रवाहांशी तो जोडलेला राहू शकतो. समाजाला एकूणच  क्रियाशील ठेवण्यासाठी संस्थांचे योगदान कमी लेखून चालणार नाही. धुळे शहराच्या ऐतिहासिक वाटचालीतही अशाच काही संस्थांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचाच या लेखात उलगडलेला वारसा. उत्तर महाराष्ट्र खान्देशातील धुळे शहराला काही वैशिष्ट्यपूर्ण संस्थांच्या कार्याची किनार लाभली आहे. धुळे शहरात इतिहासाचार्य विश्‍वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे समग्र संशोधन जतन केलेले राजवाडे संशोधन मंडळ, श्रीसमर्थहृदय शंकर श्रीकृष्ण देव स्थापित श्री समर्थ वाग्देवता मंदिर या जुन्या संस्था, तर नुकतेच उभे राहिलेले भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या स्मृती संग्रहालय अशा तीन महत्त्वाच्या संस्था  आहेत. यापैकी पहिल्या दोन संस्था या ऐतिहासिक बाबींचे महत्त्व सांगणार्‍या, तर तिसरी संस्था आधुनिक भारताचे प्रतिनिधित्व करणारी. म्हणजे एकाच शहरात अशा तीनही प्रकारच्या संस्था असणे खरे तर दुर्मीळच; मात्र धुळे शहरात हा योग

मुव्ह ऑन म्हणजे काय असतो हो ?

इमेज
आज काल या मुव्ह आॅन या शब्दाला भलतीच तेजी असल्याचं जाणवतय... म्हणजे अगदी प्रत्येक जण प्रत्येकाला मुव्ह आॅन होण्याचा सल्ला देत असतो. पण या मुव्ह आॅन होण्याला खरंच काही अर्थ असतो का हो ? म्हणजे तसं केल्याने म्हणे नव्या आयुष्याला वगैरे सुरूवात होते... पण अशा किती गोष्टींपासून मुव्ह अाॅन व्हायचं असत... म्हणजे माणूस हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात गुंतलेला असतो. म्हणजे एखादं पुस्तक, त्यातलं एखादं प्रकरण, त्यातली एखादी व्यक्तीरेखा, त्याचा प्रारंभ, त्याचा शेवट, त्याच मुखपृष्ठ..... किंवा मग एखादा सिनेमा... त्यातले संवाद, त्याची कथा, त्यातली गाणी.... किंवा मग एखादं शहर... त्या शहरातले रस्ते, तिथल्या काही खास जागा... नेहमीचा चहावाला, नेहमीचा सिगारेटवाला, नेहमीचा बार... त्या शहरातला पाऊस, त्या शहरातलं ऊन, त्या शहरातली थंडी, त्या शहराचा खास असा गंध.... त्या शहरातल्या आठवणी, त्या शहरातली चीडचीड, तिथला आनंद.... आणि मग तेव्हाच काही व्यक्तीही आपल्या आयुष्यात येत असतात... ते आल्यावर एकदम आपल्याला काहीतरी हरवलेलं सापडल्याचा किंवा एखादी अपूर्ण गोष्ट पुर्ण वगैर

होय, आम्हीही भारतीयच !

इमेज
स्थळ : नागालँडमधील एका जिह्यातील कौन्सिल हॉल. गावातील सर्व लोक समोर सुरू असलेला आरोग्यविषयक माहितीपट अगदी शांतपणे पाहत होते. इंग्रजीत असलेला तो माहितीपट तीन शाळकरी मुली स्थानिक भाषेत गावकर्‍यांना समजावून सांगत होत्या. माहितीपट संपल्यावर भारावलेले ते गावकरी म्हणाले, ’आजवर आमच्या गावातील अनेक मुलं बाहेर गेली. शिकून मोठी झाली. पण त्यांच्यापैकी कोणालाच आमच्यासाठी काही करावसं वाटलं नाही. असं काही करणार्‍या तुम्ही पहिल्याच आहात. तुम्ही हे सर्व शिकलात कुठून?’ त्यावर त्या मुली म्हणाल्या की, ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समिती‘ने आम्हाला असं काही करण्याची प्रेरणा दिली... केवळ त्या तीन मुलींनाच नाही तर पूर्वांचलातील अशा शेकडो मुलामुलींना महाराष्ट्रात शिक्षण देऊन त्यांच्या भागात काहीतरी चांगलं काम करण्याची प्रेरणा ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती‘ देेत आहे. समितीच्या ’पूर्वांचल विकास आयाम’कडून हे काम केलं जातं. पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणं, त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारणं, त्यांच्यासाठी वसतिगृह चालवणं, भारताबद्दल त्यांच्या मनात आपुलकी निर्माण

कधी कधी...!

इमेज
कधी कधी काहीतरी करावस वाटतं मग अशा वेळी काय करावं ? तर अशा वेळी चहा घ्यावा मस्तपैकी नेहमीच्या टपरीवरचा... वाटल्यास पुन्हा एकदा घ्यावा  एक कटिंग... अशा वेळी कविता वाचाव्यात पाडगांवकर किंवा ग्रेस आणि सौमित्रही... आणखीन वाचायच्या तर वाचाव्यात अटलजींच्या किंवा हरीवंशरायांच्या आणि हरवून जावं त्यात... अशा वेळी मग वाचावीत मग प्रवासवर्णनं मीना प्रभुंची आणि जगावा प्रत्येक देश... नाहीतर मग जुनी  बालभारतीची पुस्तकं पहावीत  आणि शोधावं बालपण.... किंवा मग डायरीची जुनी पानं चाळावीत आणि... नाहीतर मग कागद आणि पेन घ्यावं आणि लिहावं  मनसोक्त.... मनात येईल ते, तेवढं आणि तसंच आणि मग तेच  वाचूनही पहावं.... सापडतंय का काही नवीन ? ते शोधावं.....

गोष्ट बारीपाड्याची

इमेज
“वनवासी कल्याण आश्रमाचा उद्देश म्हणजे गावं सक्षमतेने उभी करणे आणि त्यासाठी तिथेच माणूस घडवणे. जे काही करायचं ते गावानेच करायचं, तरुणांनी त्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. हा विचार मनात रुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम करते. मला हे खूपच महत्वपूर्ण वाटते कारण मी सुद्धा याच व्यवस्थेतून उभा राहिलोय आणि गावासाठी काहीतरी वेगळ करू शकतो आहे”.                वनवासी कल्याण आश्रम नेमकं करत काय ? हा प्रश्न चैत्रामभाऊंना विचारला असता अगदी थोडक्या शब्दात दिलेलं हे उत्तर. बारीपाडा.. उत्तर महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील एक आदिवासी पाडा. धुळे, नाशिक आणि गुजरातमधील डांग या तीनही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला १००% आदिवासी पाडा. कोकणी, मावची/पावरा आणि भिल्ल या आदिवासी जमाती या पाड्यात आहेत. या पाड्यातील एक सुशिक्षित तरूण- चैत्राम पवार वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आला आणि पाड्याच स्वरूपच बदलायला सुरुवात झाली. बारीपाडा आणि वनवासी कल्याण आश्रम यांचा संपर्क येण्यापूर्वी बारीपाडा अन्य पाड्यांप्रमाणेच समस्यांनी ग्रस्त होतं- नैसर्गिक अनुकुलता असूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्यामुळे शेती नाही, पिण्याचे पा

"बरे झाले, निवडणूक हरलो !"

इमेज
"गेल्या बारा वर्षांपासून मी टीडीआरच्या व्यवसायात आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना या व्यवसायात आलो. सामान्यपणे या व्यवसायाकडे समाज काहीशा वेगळया नजरेनेच पाहतो. टीडीआरवाले म्हणजे बदमाष अशीच प्रतिमा समाजात आहे. मात्र एवढया वर्षांत मी माझी सचोटी कधीच सोडली नाही. त्यामुळेच माझी एवढी उन्नती होऊ  शकली, समाजात एक वेगळे स्थान निर्माण करू शकलो. आता मला निवृत्तीचे वेध लागले आहेत. जास्तीत जास्त वेळ सामाजिक कार्यासाठी द्यायचा आहे.'' श्यामसुंदरजी म्हणाले. श्यामसुंदर कलंत्री. टीडीआर व्यवसायातील पुण्यातील अनुभवी व्यक्ती. पुण्यातील गंगाधाम परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी मुलाखतीच्या निमित्ताने जाणे झाले. श्यामसुंदरजी म्हणजे अनुभवांचा खजिनाच. सुमारे बारा वर्षांपासून ते टीडीआरच्या व्यवसायात आहेत. अगदी काहीशे रुपयांच्या व्यवहारापासून सुरुवात केलेला माणूस आज कोटयवधीची उलाढाल करतो आहे. टीडीआर व्यवसायातील खाचाखोचा हा माणूस कोळून प्यायला आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांची व्यवसायातली वाटचाल आणि पुणे शहरातील टीडीआरविषयक अनेक गोष्टी समजल्या. श्यामसुंदरजींचा जन्म अगदी