पोस्ट्स

एप्रिल, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टाटायन....... प्रवास एका उद्योगसमूहाचा !

इमेज
आज २३ एप्रिल. जागतिक पुस्तक दिन. पुस्तकं आणि आपलं एक वेगळच नात असत. चंपक आणि चांदोबा पासून आपली पुस्तकांशी ओळख होते. मग ती ओळख हळुहळू वाढत जाते. तिचे घट्ट मैत्रीत कधी रूपांतर होते ते आपल्याला कळतही नाही. मग आपण त्यांच्याशी बोलतो आणि भांडतो सुद्धा. काही पुस्तकं आपली आवडती असतात आणि काही नावडतीही !. आज अशाच एका आवडत्या लेखकाच्या नव्या पुस्तकाबद्दल बोलूया. तो लेखक म्हणजे गिरीश कुबेर आणि पुस्तक म्हणजे नुकतच प्रकाशित झालेले “टाटायन”. टाटा.... भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षर नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसर नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली, भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती. टाटांनी केलेली संपत्तीनिर्मिती म्हणजे लक्ष्मी – सरस्वतीचा संगम. सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजीपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीन सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन !      अशा समर्पक शब्दात लेखकान