पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'योद्धा शेतकरी' आणि बरंच काही...

इमेज
“प्रेमाची जोशींची व्याख्या वेगळीच होती. प्रेमावर बोलताना ते मला म्हणाले, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो नं, तेव्हा ती व्यक्ती जणू काही सूर्य होते आपल्यासाठी. सूर्याभोवती जसे ग्रह फिरतात, तसं आपलं अवघं विश्व तिच्याभोवती फिरत असतं. ती व्यक्ती म्हणजे जणूकाही जीवनाचं केंद्रच, असं वाटत. ती व्यक्ती नाही तर जीवन नाही, इतपत मनोवस्था येते. ओशोंनी हे फार सुंदर वर्णन केलं आहे. सुफी तत्त्वज्ञानात प्रेमासाठी दोन शब्द आहेत. एक म्हणजे मोहब्बत आणि दुसरं म्हणजे इश्क. मोहब्बत म्हणजे सामान्य दर्जाचं प्रेम. जे काही क्षणी असतं तर कधी नसतंदेखील. त्यामध्ये गेहराई नसते. ज्यामध्ये तुम्ही काही अंशी तरी स्वत:च्या नियंत्रणात असता. पण इश्क ही भिन्न गोष्ट आहे. इश्कात संपूर्ण विलय आहे. हरवणं आहे. स्वत:ला गमावून बसणं आहे. इश्कामध्ये मृत्यूपूर्वी मृत्यू अनुभवणं आहे.”  हे वाचून कोण्या प्रेमावर वगैरे लिहिणाऱ्या लेखकाने हे सांगितलं असावं, असा तुमचा समज होईल. पण शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे हे विचार. वाचून थोडा धक्का बसला ना ? 'शरद जोशी- शोध अस्वस्थ कल्लोळाचा' हे वसुंधरा काशीकर- भागवत

माहितीचा धबधबाचं...

इमेज
सहावी किंवा सातवीत असतानाची गोष्ट. संध्याकाळी शाळेच्या पटांगणावर सर्वांना बसवलं होतं. कोणीतरी मोठा माणूस येऊन काहीतरी बोलणार होते. सुरूवातीला आम्ही नेहमीप्रमाणे टवाळक्या करण्यात गुंतलो होतो. तेवढ्याच स्टेजवर “ते” बोलायला उभे राहिले. आणि त्यांनी आम्हाला गोष्ट सांगायला सुरूवात केती, ती म्हणजे ‘लिलीपूटच्या शोधात’. आणि सुरूवातीला टवाळक्या करणारे आम्ही तब्बल दोन तास आम्ही ‘लिलीपूटच्या शोधात’ अगदी हरवून गेलो. त्यानंतर एकदा धुळे शहराच्या नगररचनेसंबंधी त्यांच्याशी बोलायला नगरपट्टीतल्या त्यांच्या घरी जाणं झालं, कारण शहराची नगररचना मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांनी केल्याचा आमचा समज होता. पण त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी समजावून सांगितल की, ब्रिटीश कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने शहराची रचना केली असून त्यासाठी त्याने कौटिल्यीय अर्थशास्रातल्या दंडकग्राम रचनेचा अभ्यास त्याने केला होता, म्हणून धुळ्यातल्या गल्ल्या या परस्परांना काटकोनात छेदतात. त्यानंतर मग त्यांच्याशी स्नेह वाढतचं गेला, कारण वयाने मोठे असले तरी बोलताना वय कधीच आड आलं नाही. म्हणजे बोलताना ते अगदी तल्लीन होऊन जायचे आणि एवढी सर्व माहिती ऐकतान

नाहिसे लांब होताना...

इमेज
बऱ्याचदा आपण अस्वस्थ असतो, खूप काही बोलायचं असतं. पण ते शक्य होत नाही. मग अशाच एखाद्या अस्वस्थ क्षणी सर्व काही लिहून मोकळ व्हायचा प्रयत्न करतो. त्यातलंच हे लिखाण आपला ना एक प्राॅब्लेम असतो. अर्थात समस्त मानवाजातीचाच तो प्राॅब्लेम आहे, की आपण व्यक्तींमध्ये गुंतून पडतो. आता माणूस म्हटलं की त्याचा हजारो लोकांशी संपर्क येत असतो. त्यातच काही व्यक्ती मग त्याचे जवळचे होऊन जातात. म्हणजे बघा ना, आपल्याला एखादी व्यक्ती फार जवळची असते. म्हणजे त्यात मित्र, मैत्रीण, सहकारी, वरिष्ठ, किंवा आपलं एखाद्यावर प्रेम असेल ती व्यक्ती. मग आपण त्यात इतके गुंतून जातो की मन मोकळं करायचं असेल, भांडायचं असेल, अगदी छोटीशी गोष्ट सांगायची असेल, त्यासाठी आपण हक्काने त्याच्याकडे जातो. कारण आपल्याला खात्री असते की त्या व्यक्तीला हे सांगितल्यावर तो ऐकून घेणारच. म्हणजे सहवासातून ते एकमेकांशी अशी काही नाळ जुळलेली असते की बऱ्याच गोष्टी अगदी न सांगताही कळत असतात. म्हणजे अगदी वेगळंच फिलिंग असतं ते. आणि त्यामुळेच एक प्रकारचा आधार वगैरे असतो आपल्याला. पण त्यात होतं असं की आपण नकळत त्या व्यक्तीवर हक्क सांगायला लागतो. हक्क

आयसर : एक नवी आशा

इमेज
“जागतिक विचार करता भारताला विज्ञानात आंतरविद्याशाखीय संशोधनात काम करण्याची गरज आहे. कारण जगाच्या तुलनेत भारतात त्या प्रकारच्या संशोधनाचे प्रमाण फारचं कमी आहे. ‘आयसर’मध्ये मात्र आंतरविद्याशाखीय संशोधनाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवण्यात येते. एकूणच विज्ञानात मुलभूत संशोधन वाढावे हा आमचा प्रयत्न आहे.” ‘आयसर’चे समन्वयक डॉ. अरविंद नातू सांगत होते. ‘आयसर’. भारत सरकारने मुलभूत विज्ञानात नवनवे संशोधन व्हावे आणि दर्जेदार असे शिक्षण मिळावे यासाठी भारतात विविध ठिकाणी ‘आयसर’या संस्थेची स्थापना केली आहे. त्यापैकी पुण्यातल्या ‘आयसर’ने जगभरात संशोधनाच्या क्षेत्रात आपलं वेगळं असं स्थान अल्पावधीतच निर्माण केलंय. भारतात मुलभूत विज्ञानात संशोधन आणि शिक्षणाच्या बाबतीत सध्या ‘आयसर’ अग्रेसर अशी संस्था आहे. ‘आयसर’च्या स्थापनेबद्दल बोलताना डॉ. नातू म्हणाले, “आपल्याकडे बारावीनंतर करिअरच्या दृष्टीने विचार केल्यास 90 टक्के विद्यार्थ्यांचा कल हा मेडिकल आणि इंजिनिअरींगकडे असतो. मात्र त्याऐवजी जर संशोधनाकडे विद्यार्थी वळले तर काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी त्यांना असते. दुर्दैवाने आपल्याकडे याच्यासाठी योग्य आण