पोस्ट्स

निशिगंध लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ती यावी परत...?

इमेज
ती यावी परत असं नेहमीचं वाटतं पण ती खरोखरच येईल का परत ? हे मात्र नाही कळत समजा आलीच ती परत तर आनंद होईलच  पण सर्व पूर्वीसारखंच असेल का ? हे नाही समजत म्हणजे ती तशीच असेल तोही तसाच असेल दूर होताना जसं होतं सर्व तसंच आजही असेल पण एकमेकांना दोघेही असतील अनोळखी अनोळखीचं रहायचं की पुन्हा ओळख करून घ्यायची  एकमेकांची हा खरा प्रश्न वरवर सोपा वाटणारा पण उत्तर अगदी अवघड असलेला आणि मग अवघड उत्तर असलेला प्रश्न तो  तो नेहमीप्रमाणे ऑप्शनला टाकतो

कधी कधी...!

इमेज
कधी कधी काहीतरी करावस वाटतं मग अशा वेळी काय करावं ? तर अशा वेळी चहा घ्यावा मस्तपैकी नेहमीच्या टपरीवरचा... वाटल्यास पुन्हा एकदा घ्यावा  एक कटिंग... अशा वेळी कविता वाचाव्यात पाडगांवकर किंवा ग्रेस आणि सौमित्रही... आणखीन वाचायच्या तर वाचाव्यात अटलजींच्या किंवा हरीवंशरायांच्या आणि हरवून जावं त्यात... अशा वेळी मग वाचावीत मग प्रवासवर्णनं मीना प्रभुंची आणि जगावा प्रत्येक देश... नाहीतर मग जुनी  बालभारतीची पुस्तकं पहावीत  आणि शोधावं बालपण.... किंवा मग डायरीची जुनी पानं चाळावीत आणि... नाहीतर मग कागद आणि पेन घ्यावं आणि लिहावं  मनसोक्त.... मनात येईल ते, तेवढं आणि तसंच आणि मग तेच  वाचूनही पहावं.... सापडतंय का काही नवीन ? ते शोधावं.....

वेश्या

"वेश्या" हा शब्द ऐकताच अंगावर पाल पडल्यासारखे "शी"  असे किंचाळणारे आपण "प्रतिष्ठित" नागरिक आपल्यात आणि वेश्येत फारसा फरक नाही हे विसरणारे आपण प्रतिष्ठित आम्ही राहतो तो समाज आणि त्या राहतात  ती वेश्यावस्ती अशी समजूत घालणारे आपण प्रतिष्ठित आपण करतो ते काम आणि त्या करतात तो धंदा अशी निर्बुद्ध विभागणी करणारे आपण प्रतिष्ठित चेहरा रंगवून रोज गिऱ्हाईक  घेतात म्हणून त्या वाईट आणि आपण रोज शुचिर्भूत होऊन तेच करणारे प्रतिष्ठित पण आपण एक गोष्ट विसरत असतो ही  गिऱ्हाईक  आपल्यातलीच प्रतिष्ठित असतात आज आपल्या समाजच रुपांतरही वेश्यावस्तीत होऊ लागलय रोज शुचिर्भूत होऊन सोवळ्याचा आव आणायचा आणि नंतर तथाकथित मूल्यांचा खुलेआम बलात्कार करायचा आज आपण प्रतिष्ठीतांनी समाजाला वेश्यावस्ती बनवलय खुलेआम तथाकथित मुल्यांचा धंदा मांडून आणि  आपणच गिऱ्हाईक  बनलोय                          - पार्थ विकास कपोले    ...