पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिसरं पात्र

इमेज
अमृता प्रीतम कथा ऐकायला आपल्या सर्वांनाचं आवडतं. म्हणजे आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग म्हटलं कथेला तर ती अतिशयोक्ती अजिबातचं ठरणार नाही. अगदी लहानपणापासून ते वार्धक्यापर्यंत माणूस कथा वाचतचं असतो. त्याची सुरूवात होते ती लहानपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या कथांपासून. त्या कथा असतात प्रामुख्याने रामायण, महाभारत किंवा पुराणांमधल्या. त्यातला आशय सोडला तर कथा ऐकायची सवय तेव्हापासून सागते आपल्याला. त्या कथा ऐकताना आपण अगदी गुंगून जात असतो. त्या कथांच्या प्रत्येक पात्रात आपण नकळत स्वत:ला पाहत असतो. त्याची इतकी सवय लागते आपल्याला की रोज रात्री कथा ऐकल्याशिवाय झोपत नाही आपण. त्यानंतर मग आपल्या हातात चंपक आणि चांदोबा ही अफाट मासिकं पडतात. चांदोबातल्या विक्रम आणि वेताळाची गोष्ट वाचून थोडी भिती वाटत असली तरी ती गोष्ट एक वेगळंच गारूड करते आपल्या मनावर. चांदोबातल्या गोष्टींसोबत अतिशय सुंदर चित्रही असायची, त्यामुळे कथेतली पात्र नेमकी कशी असतील, याचाही अंदाज यायचा. चंपकमधल्या गोष्टी तर अप्रतिम असतात, चंपकवन, चिकू हे अजुनही अगदी पक्क ठसलंय मनावर. त्यानंतर मग कथेचं व्यसन लागतं आणि अधिकाधिक कथा व

वो भी एक दौर था !

इमेज
गोष्ट 'पांझरा-कान'ची “साखर कारखान्याच्या सकाळी वाजणाऱ्या पहिल्या भोंग्याच्या आवाजाने त्यांचा दिवस सुरू व्हायचा आणि शेवटच्या भोंग्याने संपायचा. मळीचा वास त्यांच्या जीवनातला एक अविभाज्य असा घटक होता. साखर कारखान्याच्या वसाहतीत त्यांचं आयुष्य गेलं, त्या वसाहतींनी खरं तर त्यांचं आयुष्य समृद्धचं केलं. ‘आदर्श वसाहत’ असं त्याचं वर्णन केल्यास अतिशयोक्ती अजिबातच ठरणार नाही. जन्म, मृत्यू, बारसं, लग्न असं सर्व काही, आयुष्यातले छोटे निर्णय ते मोठे निर्णय असे सर्व त्यांनी साखर कारखान्याच्या सोबतीने घेतले. साखर कारखाना, साखर कारखाना वसाहती, राज्यातली सहकार चळवळ आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम हा फार मोठा आणि महत्त्वाचा असा विषय आहे. तो विषय जगासमोर मांडून त्या ऐतिहासिक पर्वाची आठवण पुन्हा एकदा मला सिनेमाच्या माध्यमातून मला पुन्हा जीवंत करायची आहे.” ‘वो भी एक दौर था...’ या सिनेमांच टिझर जयंतने काही दिवसांपूर्वी पाठवलं. खान्देशातल्या पहिला साखर कारखाना म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातला ‘पांझरा-कान साखर कारखाना’. सध्या तो बंद आहे. त्याची कारणं अनेक आहेत. टिझर पाहिल्या