पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पश्चिम बंगाल- ममतांचे फुलटॉस आणि भाजपचे सिक्सर

इमेज
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारून ममता बॅनर्जीं यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प. बंगालमध्ये आगामी काळात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा सामना रंगणार आहे, त्याचा आढावा प्रस्तुत लेखातून घेण्यात आला आहे. ममतांच्या वर्चस्वाला सुरूंग !  पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या सुवर्णयुगास प्रारंभ होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्नशील रहावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार केले होते. कारण प. बंगालमध्ये तब्बल 34 वर्ष डाव्यांची आणि गेल्या काही काळापासून ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची एकाधिकारशाही होती. अनेक प्रयत्न करूनही प. बंगालमध्ये भाजपला आपला पाया उभा करता आला नव्हता. त्यामुळे आपण अजिंक्य आहोत, असा भ्रम ममतांना झाला होता. त्या भ्रमाचा भोपळा भाजपने 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवून फोडला आहे. मात्र, आता ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे.  ममता बॅन