पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुरोगामी द्वेषाचा पराभव

इमेज
“आत्महत्या करण्यापूर्वी हिटलरही जर्मनीत खूप लोकप्रिय होता”  “मोदी – शहांनी देशात विष पसरवले आहे” “हा धक्कादायक आणि धोकादायक निकाल आहे” “हा भारतीय गोबेल्सचा विजय आहे” “मनुवादी पुन्हा सत्तेत आले” अ शा प्रकारची सुमारे विधाने करीत आपले नैराश्य लपविण्याची केविलवाणी धडपड देशातील पुरोगामी टोळी सध्या करीत आहेत.  त्यात नवीन असे काहीच नाही, द्वेष करणे हाच पुरोगामी टोळीचा व्यवसाय आहे. त्यामुळे अशी विधाने करीत गावगन्ना हिंडणे हा पुरोगामी टोळीचा आवडता छंद आणि 2014 पासून तर गावगन्ना हिंडत “अघोषित आणीबाणी आली हो”, “असहिष्णुता वाढली हो” अशा बोंबा मारण्यात जर वाढच झालेली होती. पुरोगाम्यांचा उन्माद एवढा वाढला होता की भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवून फार मोठी चूक केली आहे आणि ती चूक सुधारण्याचा ठेका फक्त आपल्याकडेच आहे, अशा विचारात पुरोगामी टोळी आकंठ बुडाली होती. पण देशातील जनता अतिशय हुशार असल्याने त्यांनी 2019 मध्ये पुन्हा मोदींनाच पंतप्रधानपदी विराजमान केले आणि पुरोगामी टोळीचा उरलासुरला आवेशही धुळीत मिळवला. त्यामुळे हा भारतीय जनतेचा विजय आहे आणि पुरोगामी द्