पोस्ट्स

राजधानीत पडले मराठमोळं 'पुढचं पाऊल' !

इमेज
मराठमोळं 'पुढचे पाऊल' राजधानी दिल्ली मध्ये कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या नव्या महाराष्ट्र सदनात गेल्या आठवड्यात 5 आणि 6 मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परराष्ट्र विभागातील सचिव आणि ‘पासपोर्ट मॅन’ अशी ओळख असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने राजधानीत विविध विभागात कार्यरत असणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांना एकत्रित करून ‘पुढचे पाऊल’ या विशेष सकारात्मक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचाच एक उपक्रम म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘महाराष्ट्र महोत्सव- जागर महाराष्ट्राचा’ या दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राचा ठसा आज राजधानीमध्ये फारसा दिसत नाही. राजधानीमध्ये महाराष्ट्रास नेहमीच सापत्न वागणूक देण्यात येते. खरे पाहता देशाच्या अर्थकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या महाराष्ट्रास दिल्लीच्या राजकारणात नेहमीच कमी महत्त्व दिले जाते. अन्य राज्यांप्रमाणे राजधानीत महाराष्ट्र फारसा कुठेच दिसत नाही. अन्य राज्यांचे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष असे दबावगट राजधानीत नेहमीच सक्रियरित्या कार्यरत...

संविधान बचाव ते शरियत बचाव: एक पुरोगामी प्रवास

इमेज
“मुस्लिम भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन, धर्मगुरूंना विश्वासात घेऊन काय पाऊल टाकायचं ते टाकता येईल. पण तलाक हा कुराणाने इस्लामच्या माध्यमातून दिलेला मार्ग आहे, संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याही राज्यकर्त्यांना नाही.” प्रथमदर्शनी हे विधान कोणा मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्या, धर्माला स्वत:ची वैयक्तिक जहागिरी मानणाऱ्या मुल्ला-मौलवीचे असावे, असा आपला समज होईल. मात्र तो समज साफ चुकीचा आहे. हे विधान आहे भारतीय राजकारणातील धुरंधर, फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार मानणारे आणि त्यावरच वाटचाल करणारे, नेहमी पुरोगामी भुमिकाच घेत प्रतिगाम्यांना शह देणारे असे पद्मविभुषण रा. रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांचे. धक्का बसला ना ?, पण शरदजी साहेबांचे राजकारण हे असेच, धक्के दिल्याशिवाय पुढे न जाणारे ! शरदजी साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान राज्यसरकारच्या कारभाराविरोधात ‘हल्लाबोल यात्रे’चे आयोजन केले होते. त्याचा समारोप काल औंरंगाबाद येथे झाला. समारोपाच्या सभेत शरदजी साहेबांनी वरील निखळ पुरोगामी, विवे...

नक्षलवाद : बदलते स्वरूप

इमेज
स ध्या स्वतंत्र भारतातील एक हिंसक मात्र कथित वैचारिक बैठक असणारी चळवळ म्हणजे नक्षलवादी चळवळ. देशातील रेड कॉरिडॉर म्हणवला जाणारा पशूपती ते तिरूपती आणि देशातील महत्त्वाची शहरे अशा विस्तीर्ण प्रदेशावर या चळवळीने आपले हातपाय पसरले आहेत. ज्याप्रमाणे हत्तीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, त्याचप्रमाणे या चळवळीचंही आहे. “देशातील आदीवासी, गरीब, कष्टकरी, कामगार या शोषित वर्गांना त्यांचे न्याय्य हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठा आम्ही भांडलदारांचे हस्तक असलेल्या सरकारविरूद्ध संघर्ष करत आहोत” अशा अगदी कोणालाही प्रथमदर्शनी सहानुभूती आणि आकर्षण वाटावं अशा शब्दात या चळवळीचं समर्थन केलं जात. मात्र वास्तव काहीतरी वेगळंच आहे, कारण सध्या नक्षल चळवळ ही पूर्णपणे भरकटलेली असून देशात हिंसक कारवाया करून अराजक माजवणे, हाच एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे. त्यांना आता आदीवासी, गरीब, कष्टकरी आणि कामगार वर्गाशी, त्यांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. कारण आता हिंसेची आणि अराजकाची एक नशा या चळवळीस चढलेली आहे. आणि या भयंकर नशेत त्यांना परकीय शक्तींची मदत मुक्तहस्ते होत असते. त्यामुळे संविधानावर चाल...

तिसरं पात्र

इमेज
अमृता प्रीतम कथा ऐकायला आपल्या सर्वांनाचं आवडतं. म्हणजे आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग म्हटलं कथेला तर ती अतिशयोक्ती अजिबातचं ठरणार नाही. अगदी लहानपणापासून ते वार्धक्यापर्यंत माणूस कथा वाचतचं असतो. त्याची सुरूवात होते ती लहानपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या कथांपासून. त्या कथा असतात प्रामुख्याने रामायण, महाभारत किंवा पुराणांमधल्या. त्यातला आशय सोडला तर कथा ऐकायची सवय तेव्हापासून सागते आपल्याला. त्या कथा ऐकताना आपण अगदी गुंगून जात असतो. त्या कथांच्या प्रत्येक पात्रात आपण नकळत स्वत:ला पाहत असतो. त्याची इतकी सवय लागते आपल्याला की रोज रात्री कथा ऐकल्याशिवाय झोपत नाही आपण. त्यानंतर मग आपल्या हातात चंपक आणि चांदोबा ही अफाट मासिकं पडतात. चांदोबातल्या विक्रम आणि वेताळाची गोष्ट वाचून थोडी भिती वाटत असली तरी ती गोष्ट एक वेगळंच गारूड करते आपल्या मनावर. चांदोबातल्या गोष्टींसोबत अतिशय सुंदर चित्रही असायची, त्यामुळे कथेतली पात्र नेमकी कशी असतील, याचाही अंदाज यायचा. चंपकमधल्या गोष्टी तर अप्रतिम असतात, चंपकवन, चिकू हे अजुनही अगदी पक्क ठसलंय मनावर. त्यानंतर मग कथेचं व्यसन लागतं आणि अधिकाधिक कथा व...

वो भी एक दौर था !

इमेज
गोष्ट 'पांझरा-कान'ची “साखर कारखान्याच्या सकाळी वाजणाऱ्या पहिल्या भोंग्याच्या आवाजाने त्यांचा दिवस सुरू व्हायचा आणि शेवटच्या भोंग्याने संपायचा. मळीचा वास त्यांच्या जीवनातला एक अविभाज्य असा घटक होता. साखर कारखान्याच्या वसाहतीत त्यांचं आयुष्य गेलं, त्या वसाहतींनी खरं तर त्यांचं आयुष्य समृद्धचं केलं. ‘आदर्श वसाहत’ असं त्याचं वर्णन केल्यास अतिशयोक्ती अजिबातच ठरणार नाही. जन्म, मृत्यू, बारसं, लग्न असं सर्व काही, आयुष्यातले छोटे निर्णय ते मोठे निर्णय असे सर्व त्यांनी साखर कारखान्याच्या सोबतीने घेतले. साखर कारखाना, साखर कारखाना वसाहती, राज्यातली सहकार चळवळ आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम हा फार मोठा आणि महत्त्वाचा असा विषय आहे. तो विषय जगासमोर मांडून त्या ऐतिहासिक पर्वाची आठवण पुन्हा एकदा मला सिनेमाच्या माध्यमातून मला पुन्हा जीवंत करायची आहे.” ‘वो भी एक दौर था...’ या सिनेमांच टिझर जयंतने काही दिवसांपूर्वी पाठवलं. खान्देशातल्या पहिला साखर कारखाना म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातला ‘पांझरा-कान साखर कारखाना’. सध्या तो बंद आहे. त्याची कारणं अनेक आहेत. टिझर पाहिल्या...

बीती हुई एक छोटी घड़ी

इमेज
रिश्ते बनते हैं बडे धीरे से बनने देते सूखे लम्हे को जरा शाख पे पकने देते एक चिंगारी का लगना था कि पर काट दिए आंच आई थी  जरा आग तो जलने देते एक ही लम्हे पे एक साथ गिरे थे दोनों खुद संभलते या जरा मुझको संभलने देते कोणतीही नातं असचं तर असतं. म्हणजे ते तयार व्हायला काही वेळ द्यायला लागतोच. म्हणजे परस्परांना समजून घेण्यात आणि परस्परांची नेमकी ओळख होण्यात वेळ हा लागतोच. आणि तेवढा वेळ जर दिला नाही किंवा द्यायची तयारी नसेल तर मग मात्र समीकरण काही जुळत नाही. आणि मग पुन्हा ते समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करायला लागतो. या स्थितीचं अगदी योग्य वर्णन केलंय. संपुर्णसिंह कालरा उपाख्य गुलजार. आपल्या शब्दांनी जगाला वेड लावणारा अवलिया. नुकतचं (शुक्रवारी) त्यांनी 84व्या वर्षात पदार्पण केल. चेहऱ्यावर मिश्किल हास्य, शुभ्र रंगाचा कुडता, पायजमा आणि डोळ्यांवर साधासा चष्मा अशा रूपात असणारे गुलजार हे 83 वर्षांचे झाले, यावर विश्वास बसत नसला तरी ते सत्य आहे. गुलजार हे एक वेगळचं रसायन आहे. त्यांचं लिखाण अगदी साधं आणि सोपं आहे, फारसा शब्दफुलोरा त्यात कधीच नसतो. पण ते जे कागही लिहीता...

ती यावी परत...?

इमेज
ती यावी परत असं नेहमीचं वाटतं पण ती खरोखरच येईल का परत ? हे मात्र नाही कळत समजा आलीच ती परत तर आनंद होईलच  पण सर्व पूर्वीसारखंच असेल का ? हे नाही समजत म्हणजे ती तशीच असेल तोही तसाच असेल दूर होताना जसं होतं सर्व तसंच आजही असेल पण एकमेकांना दोघेही असतील अनोळखी अनोळखीचं रहायचं की पुन्हा ओळख करून घ्यायची  एकमेकांची हा खरा प्रश्न वरवर सोपा वाटणारा पण उत्तर अगदी अवघड असलेला आणि मग अवघड उत्तर असलेला प्रश्न तो  तो नेहमीप्रमाणे ऑप्शनला टाकतो