ती यावी परत...?


ती यावी परत
असं नेहमीचं वाटतं
पण ती खरोखरच येईल का परत ?
हे मात्र नाही कळत

समजा आलीच ती परत
तर आनंद होईलच 
पण
सर्व पूर्वीसारखंच असेल का ?
हे नाही समजत

म्हणजे ती तशीच असेल
तोही तसाच असेल
दूर होताना जसं होतं सर्व
तसंच आजही असेल
पण एकमेकांना दोघेही असतील अनोळखी

अनोळखीचं रहायचं
की पुन्हा ओळख करून घ्यायची 
एकमेकांची
हा खरा प्रश्न
वरवर सोपा वाटणारा
पण उत्तर अगदी अवघड असलेला

आणि मग अवघड उत्तर
असलेला प्रश्न तो 
तो नेहमीप्रमाणे ऑप्शनला टाकतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता