पोस्ट्स

दीड वर्षाने मिळाली ‘ती’ सायकल...

इमेज
‘विक्रम पेंडसे सायकल्स- अ जर्नी इन्टू द पास्ट’ सायकल. आपणा सर्वांची पहिली दुचाकी. सायकल म्हटलं की अनेक गोष्टी आपसूकच डोळ्यासमोर तरळून जातात. म्हणजे अगदी हट्ट करून घेतलेली पहिली सायकल, लंगडी करत सायकल शिकणे, मित्रमंडळींसोबत सायकलच्या लावलेल्या शर्यती, सायकलला खास रेडीयम वगैरे लावून सजवणे, नियमित तेलपाणी करणे, घाईच्या वेळी सायकलची हमखास उतरणारी चेन आणि अगदी भर रस्त्यात सायकल उलटी पाडून बसवलेली ती चेन, त्यात आॅईलने माखलेले हात... एक ना दोन अशा अनेक आठवणी. विक्रम पेंडसे कालांतराने मग सर्वांच्याच आयुष्यातून सायकल रजा घेते आणि आपण मोटरसायकलला सरावतो. पण तरिही अगदी व्यायामासाठी का होईना, पुन्हा सायकलकडे वळतोच आपण. कारण आयुष्यातली पहिली गोष्ट माणूस सहसा विसरत नाही. मग ते प्रेम असो की सायकल ! आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी बाबांच्या अॅटलासच्या सायकलच्या दांडवर बसून मनसोक्त फेरफटका मारल्याचं आठवत असेलच... तर अशा या सायकलबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे पुण्यातल्या विक्रम पेंडसे या सायकलप्रेमीनं चक्क तीन मजली सायकलचं अनोखं असं संग्रहायलय उभारलय. अवघ सायकलविश्व सामावलंय त्यात. पुणे तसं सायकल...

पुतिन

इमेज
व्लादिमिर व्लादिमिरोविच पुतिन “पुतिन हे कमालीचे केंद्रवादी... सेंट्रिस्ट... अशा मताचे आहेत. देशाचं केंद्र अत्यंत सामर्थ्यवान असायला हवं, असं त्यांचं मत आहे. अत्यंत सामर्थ्यवान केंद्र आणि आसपास छोट्या छोट्या आज्ञाधारक देशांची पिलावळ हा त्यांचा राज्यविचार आहे. केंद्र सक्षम असलं की, परिघावरच्या उचापतखोरांना आळा बसतो, असं त्यांना वाटतं. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर पुतिन यांची ही मानसिकता दिसून आली आहे. ‘सोविएत रशियाचं विघटन ही या शतकातली सर्वांत मोठी भूराजकीय हाहाकार घडवणारी घटना आहे,’ असं त्यांचं मत आहे. याचाच अर्थ रशिया पुन्हा पूर्वीइतकाच, आपल्या सोविएत काळाइतकाच मजबूत, दरारा निर्माण करणारा असायला हवा, असं त्यांना सातत्याने वाटचत आलेलं आहे. म्हणजे क्रीमीयाचा घास घेणं हा त्यांच्या या योजनेतलाच एक भाग आहे, हे उघड आहे. तो त्यांनी कमालीच्या निष्ठुरपणे राबवला”. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं हे यथार्थ वर्णन. अनेकांना भावणारं तर अनेकांना काळजीत टाकणारं... रशिया. रशियाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात कायमच एक प्रकारचं आकर्षण आहे. म्हणजे अगदी सोविएत रशिया असल्यापासूनचा भारताचा एक खंबीर म...

संविधान सर्वोच्च की लाल किताब ?

इमेज
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कम्युनिस्टांच्या विचारसरणीला ओळखून त्यावर नेमकेपणीने भाष्य केलं आहे. बाबासाहेब म्हणतात, “कम्युनिस्टांचा संविधानाला विरोध आहे, तो संविधान कामगारांच्या अहिताचे आहे म्हणून नव्हे ! तर हे संविधान संसदीय लोकशाहीच्या आधारावर उभे आहे म्हणून. कम्युनिस्टांना भारतात प्रोलिट्रीएट लोकांची हुकुमशाही हवी आहे आणि या हुकुमशाहीला अनुसरून त्यांना संविधान हवे आहे. दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे डाव्यांना संविधानातील मुलभूत अधिकारांवर निर्बंध नको आहेत. जेणेकरून ते संसदीय मार्गांनी सत्तेवर येऊ शकले नाहीत तर या अनिर्बंध हक्कांचा वापर करून ते राज्य उलथून टाकू शकतील आणि भारतात हुकूमशाही आणू शकतील.” (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि लेखन, खंड- 17, पृष्ठ क्र. 406). कम्युनिस्ट तत्वज्ञानाने प्रेरीत वगैरे होऊन आदीवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्याच्या उदात्त हेतूने (नक्षल चळवळ आज पूर्णपणे भ्रष्ट झाली असून देशाविरोधात, संविधानाविरोधात त्यांनी उघडउघड युध्द पुकारलं आहे. आदीवासी बांधवांवरही हिसेचा वापर ही मंडळी आज करत आहेत) वगैरे सुरू झालेल्या नक्षली...

साँझ की दुल्हन...

इमेज
आनंद. १९७१ सालातला ऋषिकेश मुखर्जींचा सिनेमा सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेला अफाट सिनेमा. हा सिनेमा एकदा बघितल्यावर कधी समाधान होतच नाही. म्हणजे अगदी वारंवार बघितला तरी तो प्रत्येक वेळी अगदी नवा (हो नवाच !) भासतोस. म्हणजे तोच आनंद, तोच डॉ. भास्कर बॅनर्जी, तेच रामुकाका आणि डॉ. कुलकर्णी आणि आनंदला झालेला लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटस्टाइन या अवघड नावाचा कॅन्सरही तोच. एक वेगळीच जादू या सिनेमात आहे. आता त्यात अर्थातच ऋषिकेश मुखर्जीं, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा वाटा सर्वाधिक आहे. सोबत त्यात असलेली गाणी एक वेगळंच वातावरण तयार करतात. अगदी प्रत्येक गाणं अगदी आठवणीत राहणारं आहे या सिनेमातलं. म्हणजे सुरुवातीचं ‘मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने’ असो की ‘जिंदगी कैसी ये पहेली’ असो. त्यापैकी ‘कहीं दुर जब दिन ढल जाए’ हे तर अगदी खास गाणं. म्हणजे हे गाणं ऐकताना जे आपल्यासाठीचं लिहीलंय याची प्रत्येक वेळी खात्री पटते. म्हणजे आनंद गॅलरीत उभं राहून, क्षितिजाकडे पाहत ‘कही दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं म्हणतो तेव्हा ते गाणं ऐकताना तू नकळत आपणही वेगळ्याच व...

धोका साईबाबांचा !

इमेज
मार्च महिन्यात दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्ष सुनावली. या प्राध्यापक महोदयांवर नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप होता. न्यायालयात तो सिध्द होऊन या पांढरपेशा नक्षलवाद्यास आता आपले उर्वरीत आयुष्य कारागृहात कथित क्रांतीची स्वप्न पाहत घालवावे लागणार आहे. शिक्षा सुनावताना न्यायालयाने जे म्हटले आहे ते अतिशय महत्वाचे आहे, “प्राध्यापक साईबाबा हा नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करीत असल्याचे न्यायालयात सिध्द झाले आहे. प्रा. साईबाबा 90 टक्के अपंग असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे कार्यरत असून तो माओवादी चळवळीमागील प्रेरणा असल्याचे सिध्द होते. 2008 पासून गडचिरोली जिल्ह्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या बंदी घातलेल्या संघटनेचा नेता असल्याने तो जन्मठेपच नाही, तर त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र आहे.” पेशाने प्राध्यापक असलेल्या या व्यक्तीकडून नवीन पिढी घडवण्याचे काम होणे अपेक्षित असताना देशविघातक अशा नक्षल चळवळीत त्याचे असलेले सक्रीय योगदान हे विचारी जनांना नक्कीच काळजीत टाकणारे आहे. पिढी घडविणारी व्यक्तीच जर देशविघातक अशा ...

गाय आणि सावरकर

इमेज
सध्या देशभरात गोरक्षक चळवळ आणि गोरक्षक मंडळींना भलताच उत्साह आला आहे. अवघ्या भारतभूमीत म्हणजे त्यांचे जत्थेच्या जत्थे मोठ्या संख्येने गोरक्षा करून “आम्हीच कसे हिंदूधर्मरक्षक आहोत” हे सिध्द करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. त्यांचा उत्साह एवढा की गाईचा जीव वाचवत असताना माणसाचा जीव घेण्यास त्यांना काहीही वावगे वाटत नाही. उलट ती त्यांना आणि त्यांच्यासारख्यांचे समर्थन करणाऱ्या मंडळींना मोठे शौर्याचे कृत्य वाटते. माणसांचे जीव घेण्याचा हा उन्माद हा विचारी जनांना निश्चितच काळजीत टाकणारा आहे. “रात्री गुन्हेगारी कारवाया करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात. त्यांना गोरक्षणाची दुकाने थाटली आहेत. हे पाहून संताप येतो” आणि “राज्य सरकारांनी अशा गोरक्षकांचे अहवाल बनवावेत, त्यामध्ये 80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक असल्याचे आढळेल”. ही दोन्ही विधाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 6 आॅगस्ट रोजी केली. त्यानंतर तर या स्वयंघोषित हिंदूत्वरक्षकांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी मोंदींवरही टिकेची झो़ड उठवली होती. थोडक्यात काय, “हिंदू धर्म हा आम्हालाच काय तो कळतो, त्याचं कथित रक्षण वगैरे ते आम्हीच आणि आमच्या...

तू तेव्हा तशी... भाग ३- अॅमी

इमेज
मग दोघेही बँकेत चलन भरायला सोबतच निघाले. काॅलेजपासून अगदी पाचचं मिनिटावर बँक होती. चलन भरून झाल्यावर पुन्हा काॅलेजकडे येत असताना सत्यजितनने नाव विचारल... अॅमी. खरं तर सत्यजितला ती बघताच क्षणी आवडली होती. सावळा रंग, कुरळे केस आणि अगदी मोहक असं हास्य. म्हणजे त्याच्या मनात ज्या काही कल्पना होत्या, अॅमी अगदी तशीच होती.  त्यात तिचं नाव तर विशेष आवडलं होतं त्याला. त्यानंतर नवीन ओळख झाल्याच्या परंपरेप्रमाणे मोबाईल नंबर्सची देवाण – घेवाण झाली (आपण एवढ्या सहज आणि स्वत:हून नंबर कसा मागितला, याचं त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही !) आणि दोघेही राज्यशास्त्र डिपार्टमेंटमध्ये आले. डिपार्टमेंटमध्ये आल्यावर जुजबी थोडंफार बोलणं झालं आणि तो निघाला. खरं तर थांबायची ईच्छा होती, पण दुसरी काही कामं असल्याने निघाला. त्याची खोली काॅलेजपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर होती. रूमवर पोहोचल्यावर रूममेटसोबत गप्पा मारताना त्याने तिच्याबद्दल सांगितलं, त्यावर हाॅस्टेलाइट्सच्या प्रथेप्रमाणे सिरियस ते अगदी सुमार असे सल्ले त्याला मिळाले. आणि तो विषय तिथे संपला. संध्याकाळी मग त्याने व्हाॅट्स अॅप उघडून तिच...