तू तेव्हा तशी... भाग ३- अॅमी



मग दोघेही बँकेत चलन भरायला सोबतच निघाले. काॅलेजपासून अगदी पाचचं मिनिटावर बँक होती. चलन भरून झाल्यावर पुन्हा काॅलेजकडे येत असताना सत्यजितनने नाव विचारल...
अॅमी. खरं तर सत्यजितला ती बघताच क्षणी आवडली होती. सावळा रंग, कुरळे केस आणि अगदी मोहक असं हास्य. म्हणजे त्याच्या मनात ज्या काही कल्पना होत्या, अॅमी अगदी तशीच होती. 
त्यात तिचं नाव तर विशेष आवडलं होतं त्याला. त्यानंतर नवीन ओळख झाल्याच्या परंपरेप्रमाणे मोबाईल नंबर्सची देवाण – घेवाण झाली (आपण एवढ्या सहज आणि स्वत:हून नंबर कसा मागितला, याचं त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही !) आणि दोघेही राज्यशास्त्र डिपार्टमेंटमध्ये आले. डिपार्टमेंटमध्ये आल्यावर जुजबी थोडंफार बोलणं झालं आणि तो निघाला. खरं तर थांबायची ईच्छा होती, पण दुसरी काही कामं असल्याने निघाला.
त्याची खोली काॅलेजपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर होती. रूमवर पोहोचल्यावर रूममेटसोबत गप्पा मारताना त्याने तिच्याबद्दल सांगितलं, त्यावर हाॅस्टेलाइट्सच्या प्रथेप्रमाणे सिरियस ते अगदी सुमार असे सल्ले त्याला मिळाले. आणि तो विषय तिथे संपला. संध्याकाळी मग त्याने व्हाॅट्स अॅप उघडून तिची विंडो पाहिली आणि तिचा फोटो पाहून पुन्हा एकदा दुपारच्याच भावना मनात दा़टून आल्या. त्याने काही वेळाने मग Hi असा मेसेज केला. पाच मिनिटांनी तिचा रिप्लाय आला. मग त्यांचं बोलणं सुरू झालं. ती मुळची केरळची आणि सर्व सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झालेलं असल्याने मराठी जुजबी समजत होतं तिला. आणि सत्यजितचं इंग्रजी म्हणजे एक संशोधनाचा विषय असल्याने हिंदी मिश्र इंग्रजीत त्यांचं बोलणं सुरू झालं आणि संवादाला भाषेची अडचण कधीच येत नाही याचा साक्षात्कार सत्यजितला झाला. कारण अगदी आजचं ओळख झाली असली तरी बोलताना मात्र तसं काहीचं जाणवत नव्हतं. आणि मग त्या दिवशी बराच वेळ बोलत होते ते. रात्री कधीतरी उशारा सत्यजितला जाणवलं की, काहीतरी वेगळं होतंय बाॅस...

भाग १
http://parthdhulekar.blogspot.in/2017/01/blog-post_16.html?m=1

भाग २
http://parthdhulekar.blogspot.in/2017/01/blog-post_17.html?m=1

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता