गाय आणि सावरकर
सध्या देशभरात गोरक्षक चळवळ आणि गोरक्षक मंडळींना भलताच उत्साह आला आहे. अवघ्या भारतभूमीत म्हणजे त्यांचे जत्थेच्या जत्थे मोठ्या संख्येने गोरक्षा करून “आम्हीच कसे हिंदूधर्मरक्षक आहोत” हे सिध्द करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. त्यांचा उत्साह एवढा की गाईचा जीव वाचवत असताना माणसाचा जीव घेण्यास त्यांना काहीही वावगे वाटत नाही. उलट ती त्यांना आणि त्यांच्यासारख्यांचे समर्थन करणाऱ्या मंडळींना मोठे शौर्याचे कृत्य वाटते. माणसांचे जीव घेण्याचा हा उन्माद हा विचारी जनांना निश्चितच काळजीत टाकणारा आहे.
“रात्री गुन्हेगारी कारवाया करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात. त्यांना गोरक्षणाची दुकाने थाटली आहेत. हे पाहून संताप येतो” आणि “राज्य सरकारांनी अशा गोरक्षकांचे अहवाल बनवावेत, त्यामध्ये 80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक असल्याचे आढळेल”. ही दोन्ही विधाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 6 आॅगस्ट रोजी केली. त्यानंतर तर या स्वयंघोषित हिंदूत्वरक्षकांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी मोंदींवरही टिकेची झो़ड उठवली होती. थोडक्यात काय, “हिंदू धर्म हा आम्हालाच काय तो कळतो, त्याचं कथित रक्षण वगैरे ते आम्हीच आणि आमच्या पध्दतीनेच करणार, कोणी त्यास विरोध केला तर तो हिंदूद्रोही” अशा निर्बुद्ध मांडणीवर या मंडळींचा ठाम विश्वास असल्याचे दिसते. शिवाय या मंडळींना अनेक राजकीय क्षेत्रातील लोकांनी अगदी प्रेमाने सांभाळले असल्याने त्यांच्याच आपसुकच एक अहंभाव आलेला असतो. त्यातूनच मग एखाद्याचा जीव घेणे त्यांना अजिबात वावगे वाटत नाही.
मात्र या सर्व प्रकाराबद्दल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जे हिंदूत्ववादीच होते, त्यांची मते अनुकरणीय अशी आहेत. “गाय हा उपयुक्त पशू आहे” एवढ्या स्पष्ट शब्दात सावरकरांनी सागितले आहे, मात्र गाईला देव वगैरे मानणाऱ्या आणि तीच्या पोटात 32 कोटी (ही संख्या बदलू शकते !) देव आहेत असे मानणाऱ्यांना सावरकरांचे हे विचार मान्य होणे शक्यच नाही. मुळात एखाद्या प्राण्याला देव वगैरे मानून, त्याच्या रक्षणाची जबाबदारी मानवाने घेणे हेच ‘देव’ या संकल्पनेस तडा देणारे आहे, मात्र आपल्याच विचार(?)विश्वात मश्गूल असणाऱ्यांना हे सांगणार कोण आणि सांगितले तरी ते ऐकणार कोण, हा प्रश्न आहे.
सावरकरांचे हिंदूत्व हे भल्याभल्यांना पटणारे नाही आणि झेपणारे तर त्याहून नाही. (म्हणूनच काही राष्ट्रीय असणाऱ्या ‘संघ’टनांना ते वर्ज्य असल्याचे दिसते.) परिणामी आज जर सावरकर असते तर या मंडळींनी त्यांनाही ‘हिंदूद्रोही’ ठरवले असते यात संशय नाही. कारण सावरकरांचे हिंदूत्व त्यांना समजणारच नाही. मात्र सध्या सावरकरांच्याच विज्ञाननिष्ठ हिंदूत्वाची अधिक गरज आहे.
सावरकर म्हणतात, “गोठ्यात उभ्या उभ्या गवत, कडबा खात असलेल्या, एकीकडे खाताखाता उभ्या उभ्या दुसरीकडे मलमूत्रोत्सर्ग नि:संकोचपणे करणाऱ्या, थकवा येताच रंवथ करीत त्याच मलमूत्रोत्सर्गात स्वेच्छ्या बैठक मारून बसणाऱ्या, शेपटीच्या फटकाऱ्याने स्वत:च्या शेणमूत्राचा तो चिखल अंगभर उडवून घेणाऱ्या, दावे तुटताच थोडा फेरफटका करण्याची संधी मिळताच अनेक समयी कोठेतरी जाऊन घाणीत तोंड घालणाऱ्या नि तसेच ओठ चाटीत गोठ्यात आणून बांधल्या जाणाऱ्या त्या गाई, शुध्द नी निर्मळ वसने नेसलेल्या सोज्ज्वळ ब्राह्मणाने वा महिलेने हाती पूजापात्र घेऊन गोठ्यात पुजावयास जावे नि तिच्या शेपटीस स्पर्शून आपले सोवळे न विटाळता उलट अधिक सोज्ज्वळले आणि तिचे ते शेण नि ते मूत्र चांदीच्या पेल्यात घोळून पिताना आपले जीवन अधिक निर्मळले असे मानावे! ते सोवळे की जे आंबेडकर महाशयांसारख्या महनीय स्वधर्म बंधूच्या श्रेष्ठ मनुष्याची सावली पडताच विटाळावे....”(संदर्भ- समग्र सावरकर वाङ्मय- खंड 6, गोपालन हवे, गोपूजन नव्हे, विज्ञाननिष्ठ निबंध, पृष्ठ. क्र 51).
अतिशय स्पष्ट आणि समर्पक शब्दात सावरकरांनी गाय म्हणजे देव असे मानणाऱ्या प्रत्येकाची अगदी व्यवस्थित कानउघाडणी केली आहे. एकीकडे गाय या प्राण्यास देव मानायचे आणि दुसरीकडे अजुनही जात वगैरे पाळायची आणि माणसामाणसात भेदभाव करायचा असा दांभिकपणा आपल्या समाजात सररास चालत असतो. त्या समाजात सावरकरांचे हे विचार अडगळीत जाणारच.
या सर्व प्रकारास देशात चालत आलेल्या हिंदू-मुस्लिम संबंधांचीही किनार आहे. गाईची हत्या करणारे, कसाईखाने चालवणारे बहुतांशी मुस्लिम असतात, ते जाणूनबुजून आमच्या धर्मभावना दुखावण्यासाठी गाईची कत्तल करतात हा या गोरक्षक मंडळींचा आवडता सिद्धांत आणि त्यातूनच मग त्यांची हत्या करण्यासही त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही. मात्र ते चिंताजनक आहे. असे चालत राहिल्यास पुन्हा एकदा रानटी अवस्थेत समाजातील एक घटक जाणार आणि सर्व समाजालाच त्याचा त्रास होणार हे नक्की.
गोरक्षक मंडळींना गोरक्षण करणे मोठे शौर्याचे, अभिमानाचे आणि धर्मरक्षणाचे काम वाटत असले तरी त्याला मानवी हिंसेची किनार लाभली आहे, ती अधिक गंभीर आहे. देशात त्यावरून हिंसेच्या अनेक घटना घडत आहेत आणि विनाकारण त्यातून ताण वाढतो आहे, जो सद्यस्थितीत देशाला परवडणारा नाही.
गोरक्षक मंडळींबद्दल सावरकरांनीच अतिशय समर्पक शब्दात म्हटलंय, “तेव्हा आमच्या साऱ्या गोरक्षक संस्थांस अशी विनंती आहे की, त्यांना गोपालक बनावे, वैज्ञानिक साधनांनी त्या मनुष्यास त्या पशूचा अधिकाधिक कसा उपयोग करता येईल ह्याच काय त्या दृष्टीने तिची अमेरिकेसारखी सकस नि सुरेख वीण वाढवून, दूध वाढवून, आरोग्य वाढवून जोपासना करावी. गोरक्षण करावे, राष्ट्राचे गोधन वाढवावे परंतु त्या नादात भाबडेपणाची भेसळ होऊ देऊन पशूला देव करून पूजण्याचा मूर्खपणा करू नये. गाईचे कौतुक करायचे तर तिच्या गळ्यात घंटा बांधा. पण कुत्र्याच्या गळ्यात आपण पट्टा घालतो त्या भावनेने, देवाच्या गळ्यात आपण हार घालतो त्या भावनेने नव्हे ! हा प्रश्न एका फुटकळ धर्मसमजुतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकाची बुध्दीहत्या करीत आहेत त्या भाकड प्रवृत्तींचा आहे.” (संदर्भ- संदर्भ- समग्र सावरकर वाङ्मय- खंड 6, गोपालन हवे, गोपूजन नव्हे, विज्ञाननिष्ठ निबंध, पृष्ठ. क्र 59)
आता आपणास एक ठरवावे लागेल, सावरकरांचे हिंदूत्व मानायचे की गोरक्षक मंडळींचे. कारण एकात प्रगती आहे तर दुसऱ्यात अधोगती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा