पोस्ट्स

अनुभवायची गाणी – १

इमेज
आपणा सर्वांना गाणी ऐकायला खूप आवडते. वेगवेगळी गाणी आपण ऐकत असतो. अगदी जुन्या गाण्यांपासून नवीन गाण्यांपर्यंत (हनी सिंग, मिका सिंग क्षमस्व). प्रत्येक गाण आपल्यासाठी “खास” असत. प्रत्येक गाण्यासोबत आपल्या काही आठवणी निगडीत असतात, ती गाणी ऐकतांना आपण आठवणींत रमून जातो.... मग त्या आठवणी हव्याहव्याशा वाटणाऱ्या असतील किंवा नकोशा वाटणाऱ्या. गाणी ऐकतांना आपण पुन्हा एकदा “ते” प्रसंग अनुभवतो. गाणी नुसती ऐकायची नसतात, तर ती अनुभवायची असतात. अस मला वाटत. आता हेच बघा ना, जगजित सिंह यांनी गायलेली “होशवालों को खबर क्या” ही गझल ऐकतांना आपण अक्षरशः त्यात बुडून जातो. आणि त्यात जर तुम्ही प्रेमात पडलेला असाल किंवा त्याच्या उंबरठ्यावर असाल तर मग विचारायलाच नको. खास करून ती शेवटची ओळ – “हम लबोंसे कह ना पाए, उन से हाल-ए-दिल कभी और वो समझे नहीं, ये खामोशी क्या चीज है” आणि “खामोशी क्या चीज है” यापूर्वी घेतलेला अर्थपूर्ण पॉझ... ती गझल आपल्यासाठीच लिहिलेली आहे, असा आपला समज करायला पुरेशी असते (हसलात ना स्वतःशीच). “आनंद” चित्रपटातील “मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने” हे आणखी एक ‘अनुभवण्याच’ ग...

टाटायन....... प्रवास एका उद्योगसमूहाचा !

इमेज
आज २३ एप्रिल. जागतिक पुस्तक दिन. पुस्तकं आणि आपलं एक वेगळच नात असत. चंपक आणि चांदोबा पासून आपली पुस्तकांशी ओळख होते. मग ती ओळख हळुहळू वाढत जाते. तिचे घट्ट मैत्रीत कधी रूपांतर होते ते आपल्याला कळतही नाही. मग आपण त्यांच्याशी बोलतो आणि भांडतो सुद्धा. काही पुस्तकं आपली आवडती असतात आणि काही नावडतीही !. आज अशाच एका आवडत्या लेखकाच्या नव्या पुस्तकाबद्दल बोलूया. तो लेखक म्हणजे गिरीश कुबेर आणि पुस्तक म्हणजे नुकतच प्रकाशित झालेले “टाटायन”. टाटा.... भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षर नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसर नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली, भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती. टाटांनी केलेली संपत्तीनिर्मिती म्हणजे लक्ष्मी – सरस्वतीचा संगम. सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजीपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीन सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन !      अशा स...

राजयोगी नेता

इमेज
आज अटलजींना भारतरत्न प्रदान करण्यात आले, यानिमित्ताने तरी त्यांचे दर्शन घडेल अशी अपेक्षा होती, मात्र फक्त छायाचित्रावर समाधान मानावे लागले. त्यामुळे जरा हिरमोड झाला असला तरी एका अटलजींना भारतरत्न मिळाला आहे, हा आनंद अगदी अवर्णनीय असाच आहे. तस पाहायला गेल तर अटलजी म्हणजे आमच्यासाठी जुन्या पिढीतले राजकारणी. पण या जुन्या पिढीतल्या नेत्याने आमच्यावर एक वेगळच गारुड केलय. अटलजींकडे पाहिल्यावर आपोआप आदर वाटतोच पण सोबतच एक आपलेपणाही जाणवतो.     अटलजी म्हटले की सर्वांत अगोदर आठवतात ती त्यांची भाषणे ! भारतरत्न प्रदान करताना महामहीम राष्ट्रपती !  हिंदीवर असामान्य प्रभुत्व, तोंडपाठ असणारे संदर्भ आणि जरा श्रोत्यांचा अंदाज घेत केलेली अचूक शब्दफेक. एक वेगळीच नजाकत त्यांच्या भाषणात असायची. त्यांची संसदेतील भाषणे ऐकणे म्हणजे तर पर्वणीच. ज्यांनी अटलजींना प्रत्यक्ष बोलतांना ऐकलय, पाहिलय त्या सर्वांचा खूप हेवा वाटतो. प्रचारसभा अथवा अन्य सभा यांत काय बोलावे आणि संसदेत काय बोलावे याचा वस्तुपाठच अटलजींनी घालून दिला आहे. आमच्या आजच्या “नेत्यांनी” हे जरुर शिकण्यासा...

“शिवसैनिक” खासदार

इमेज
स्थळ – नवे महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली. “सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याखाली एक व्यक्ती ‘भावी’ पत्रकारांच्या प्रश्नांना आपल्या ‘खास शैलीत’ ‘बिनधास्त’ उत्तरे देत होती, त्या व्यक्तीची ती शैली पाहून सर्व भावी पत्रकार जरा गडबडलेच होते !”. ती व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि ते भावी पत्रकार होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभागाचे विद्यार्थी. या भेटीचे निमित्त होते  आमच्या बहुचर्चित ‘दिल्ली अभ्यास दौऱ्या’चे. या दौऱ्यादरम्यान दिल्लीतील ‘आलिशान’ महाराष्ट्र सदनात आमची अनेक खासदारांशी भेट झाली, पण सर्वाधिक लक्षात राहणारी भेट होती ती खासदार अरविंद सावंत यांचीच. “मी अतिशय सामान्य घरातून आलेलो आहे. सुरुवातीला एमटीएनएल मध्ये नोकरीस होतो, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या संपर्कात आलो. त्यानंतर माझ्यासारखा  राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला तरूण राजकारणात यशस्वी झाला ते फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळेच” हे सांगताना सावंत हे अतिशय वेगळच रसायन आहे, ते जाणवत होत. एरवी दूरचित्रवाणीवरील चर्च...

आपली संसद

संसदेचे प्रथम दर्शन हे डोळे दिपविणारेच असते..... ''डौलाने उभी असलेली, स्वतःच एक इतिहास असलेली  भव्य, दगडी वास्तु, भव्य आवार, त्यात उभ्या  असलेल्या लाल दिव्याच्या मोटारी, एका बाजूला थांबलेले वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, प्रचंड(!) सुरक्षाव्यवस्था, वातावरणात असलेली एक वेगळीच ‘लोकशाहीची नशा’ आणि त्यात असणारे आपले लोकप्रतिनिधी.''  या सर्व गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहात नाही. एरवी दूरदर्शनवर संसदेचे दर्शन घेणारे आपण प्रत्यक्ष संसद पाहिल्यावर थोडे का होईना पण दडपणात येतोच. खर सांगायचं तर आपली त्यावेळची मनस्थिती म्हणजे,‘संसद प्रत्यक्ष बघतोय याचा आनंद, उत्साह आणि वाटणारी अगदी थोडीशी भिती याचं मिश्रण.’ ते अस शब्दात सांगता येणं खूप अवघड आहे, त्यासाठी तुम्ही ते स्वतःच अनुभवायला हवं! अगदी असाच अनुभव आम्हाला आला. निमित्त होत ते आमच्या अभ्यासक्रमातील बहुचर्चित ‘दिल्ली अभ्यास दौऱ्या’चे. तर आम्ही सर्व ‘भावी पत्रकार’ संसदेच्या आवारात पोहोचलो ते मनात उत्सुकता आणि दडपण घेऊन. अर्धा तास सुरक्षेचे सोपस्कार पार पडण्यात गेले आणि अखेर आम्ही लोकसभेच्या ‘प्रेक्षक द...

प्रेमात पाडणारी ‘दिल्ली’

“एखाद्या अनोळखी शहरात एकट्याने फिरण्याची मजा काही औरच असते. सुरुवातीला अनोळखी वाटणारे रस्ते, झाडं, इमारती हळुहळू आपल्याशी संवाद साधू लागतात आणि मग आपलाही नवखेपणा गळून पडतो. आपली त्या सर्वांशी छान गट्टी जमते, आणि ते शहर आपल्याशी काय बोलतय ते आपल्याला समजायला लागत, मग आपण                           त्या शहराच्या प्रेमात पडायला लागतो” पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने दिल्लीला जायचा योग आला आणि अगदी असाच अनुभव मला आला. दिल्लीला जायची, दिल्ली अनुभवायची इच्छा यानिमित्ताने थोड्या प्रमाणात पुर्ण झाली असली तरी आठवड्याभराच्या या धावत्या भेटीमुळे तूर्तास तरी दुधाची तहान ताकावर भागली, असेच म्हणावे लागेल. सुमारे आठवडाभरासाठी आमचा पत्ता होता ‘आंतरराष्ट्रीय छात्र आवास, ५, न्याय मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली.’ चाणक्यपुरी या भागाबद्दल सांगायचे तर हा भाग म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण ठरविणारा एक महत्वाचा भाग, ते अशासाठी कारण प्रामुख्याने प...
"नात चांगल्या प्रकारे फुलवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण,  आपला Ego बाजूला ठेवण खुप आवश्यक असत. आपण आपल्या Ego ला एवढ कुरवाळत बसतो,  की त्यातच आपण अडकून पडतो आणि मग पाहिजे तेव्हा  सकारात्मक प्रतिसाद देत नाही, आपण चुकतोय हे माहित असत आपल्याला  पण Ego काही सुचू देत नसतो.  आणि मग खुप काही घडून गेल्यावर आपण भानावर येतो,  पण तोपर्यंत जे व्हायच ते होऊन गेलेल असत.  म्हणून नात्यामध्ये जास्तीतजास्त सकारात्मक असाव आणि Ego तर अजिबातच नसावा." to be continued..... ©पार्थ