ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता


सत्यजित आज पुन्हा एकदा तोच चित्रपट बघत होता. कितव्यांदा ? खर तर त्याने आता मोजणं सोडूनच दिल होत. म्हणजे आधी मोजायचा वगैरे नाही, पण म्हणजे लक्षात राहायचं त्याच्या. पण तो चित्रपट बघतांना आठवणीत बुडून जायला आवडायचं त्याला. म्हणजे चित्रपट त्याला स्वतःचीच गोष्ट वाटायचा.

दि. २७ डिसेंबर २०१३ (२६ डिसेंबर संपून २७ लागलेला म्हणजे रात्री १२ नंतर...)

वाढदिवस असल्याने Whats App वर सर्वांचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. पण तो अजूनही अस्वस्थ होतो, कारण अजून तिचा मेसेज आलेला नव्हता. तो येणार अशी त्याला खात्री होती... उगाचच दहा वेळा तिची chat window चेक करत होता. ती ऑनलाईन आहे हे पाहून सारखा अस्वस्थ होत होता.

“पण मी अस्वस्थ का होतो? हे मला माहित नाही. खरच अस्वस्थ होण्यासारखं काही होता का ? आपण एखाद्या व्यक्तीसाठी अस्वस्थ होतो कारण त्या व्यक्तीच आपल्या आयुष्यातलं स्थान जरा खास असत म्हणून. मग तसं काही होतं म्हणून मी अस्वस्थ होतो का ?”

अखेर १.३० वाजता तिचा मेसेज आला........
अॅमी : happy birthday
सत्यजित : thanks

मी जवळपास १० वेळा wts app चा DP उगाचच बदलण्याचा चाळा करत होतो... का ? ते  माहित नाही... अनेक वेळा आपल्या मनातली अस्वस्थता आपण कोणत्या न कोणत्या मार्गाने व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो..... त्यासाठी अगदी काहीही करत असतो आपण... मी पण तेच करत होतो कदाचित...    

अॅमी : तुला आणखी काहीच बोलायचं नाहीये का ? (अर्थात तिचे मेसेज मोस्टली इंग्रजीमधूनच !)   
सत्यजित : नाही 
अॅमी : आज तुझा दिवस आहे, तुला खरच काहीही बोलायचं नाहीये का ?
सत्यजित : नाही...

chatting मध्ये ना साला या डॉट ची वेगळीच एक भानगड असते..... हे डॉट खूप भयानक असतात. आपल्याला स्पष्ट काही  बोलायचं नसल की याचा वापर वाढत जातो... आणि पुन्हा अस्वस्थताही वाढते...

अॅमी : ok, आणखी काय सुरु आहे ?
सत्यजित : Internship
अॅमी : good
सत्यजित : hmmm
अॅमी : तुला त्या दिवशी चर्च मध्ये पाहून माझा पुतळाच झाला होता. शॉक बसला मला..
सत्यजित : मलाही 

chatting मध्ये एक वेळ अशी येते की आपण एका शब्दात बोलायला लागतो...... कदाचित खूप काही एकाच शब्दात सांगायचं आणि समोरच्याने ते समजून घ्याव अशी अपेक्षा असते का ?

आता जवळपास २.३० वाजलेले असतात...

अॅमी : मी माझ्या आईला सांगितलं सर्व...
सत्यजित : .....

सत्यजित शब्दशः hang झाला होता.... रात्री ३ वाजता असं काही समजल्यावर तुम्ही निशब्दच होऊ शकतात... काय कराव काहीही सुचत नव्हत सत्यजितला.

भाग १ http://parthdhulekar.blogspot.in/2017/01/blog-post_16.html?m=1

भाग २ http://parthdhulekar.blogspot.in/2017/01/blog-post_17.html?m=1

भाग ३ http://parthdhulekar.blogspot.in/2017/04/blog-post_7.html?m=1

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

पाळणाघरं- गरज आणि वास्तव

हिंसक माणिक 'सरकार'