तू तेव्हा तशी भाग १- अॅडमिशन

काॅलेजमध्ये नवीन अॅडमिशन घ्यायचा तो दिवस. साधारणपणे त्या दिवसांत प्रत्येक काॅलेजमध्ये जी परिस्थिती असते, तशीच परिस्थिती त्या काॅलेजमध्ये होती. म्हणजे काही चेहरे नवीन काॅलेज बघून भांबावून गेली होती, काही उगाचच टेंशनमध्ये होती, काही अगदी उत्साहात होती.
अर्थात सत्यजित त्यातही अगदी निवांत उभा होता, कारण डिग्रीच्या तीन वर्षांत हे असं त्याने पुरेपुर अनुभवलेलं असल्याने तो त्याच्या डिपार्टमेंटमध्ये बसला होता. पुण्यात मध्यभागी असलेल्या काॅलेजच्या मोठ्या कँपसमध्ये अगदी एका टोकाला असलेलं राज्यशास्त्र डिपार्टमेंट एक स्वतंत्र असं जगचं होतं. म्हणजे एकदा तुम्ही डिपार्टमेंटचे झालात की बाकी काॅलेजशी संपर्क आपोआप तुटायचा.
तर थोड्या वेळाने सत्यजित फाॅर्म भरायला निघाला. चालत जायचा खरं तर कंटाळा आला होता, डिपार्टमेंटमध्येच फार्म का सबमिट करता येत नाही, यावर चर्चा करत तो अखेर पोहोचला. रांग बरीच कमी झाली होती. नेहमीच्या व्यक्तीकडे फार्म देऊन तो निवांत तिथेच बसला, तीन वर्षांत नाही म्हटलं तरी तीन वर्षांची ओळख कामी येऊन रांगेत उभं न राहता फाॅर्म सबमिट झाला होता.
तिथून चलन भरायला निघणार इतक्यात डिपार्टमेंटमधलाच एक मित्राने थांबवलं आणि सांगितलं की, “ही नवीन आलीये डिपार्टमेंटमध्ये, जरा अॅडमिशनचं करून दे...”
आणि तो तीला घेऊन पुन्हा रांगेकडे गेला. पुन्हा गर्दी वाढल्याने रांगेत उभं राहणं आता भाग होतं. अर्धा तास रांगेत गेला, दिड वाजत आला होता. आता लवकरात लवकर बँकेत जाऊन चलन भरणं गरजेच असल्याने तो आणि ती सोबतंच बँकेत निघाले.
आणि त्याच्या लक्षात आलं की अजुन आपण तीचं नाव विचारलेलं नाही...
तुझं नाव ?
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा