भारतीय समाजाला पुस्तकप्रेमी बनवूया
फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सच्या २६ व्या वार्षिक सभेत ३ जुलै १९९९ रोजी नवी दिल्ली इथं लालकृष्ण अडवाणी यांनी भाषण केलं होतं. भारतीय समाजाला पुस्तकप्रेमी बनवण्यासाठी, एकूणच वाचन संस्कृती रुजवण्यासाठी काय काय करता येईल याबद्दल त्यांनी मांडलेले विचार कालातीत आहेत. आजही हे सगळे मुद्दे तंतोतंत लागू पडतात. अठरा वर्षांपूर्वीचं भाषण आज वाचतानाही ताजंच वाटेल.
मी पुस्तकप्रेमी आहे, ही गोष्ट आज मी कबुल करतो. वाचन ही ज्याची दुखरी नस आहे, तो व्यक्ती प्रकाशकांचा अतिशय ऋणी असतो. कारण तुम्ही नसता तर पुस्तकांच्या या अनोख्या जगाची दारं आमच्यासाठी कधीच खुली झाली नसती.
‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असं एक वाक्य आहे. म्हणजे ज्या गोष्टी सुर्य बघू शकत नाही, त्या गोष्टी कवी आणि लेखक अगदी सहजतेने बघू शकतात. मात्र हे पूर्ण सत्य नाही. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेल की, ‘प्रकाशकाशिवाय कोणत्याही लेखकाला वाचक पाहू शकत नाही आणि वाचकाला कोणताही लेखक पाहू शकत नाही.’
पुस्तक वाचनात व्यक्तीमध्ये आमुलाग्र बदल घडवण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे ज्याला वाचनाची आवड असते त्याला चांगली पुस्तकं वाचण्याची सवय आपोआपच लागते.
वाचन म्हणजे मनाचे सर्व बंद दरवाजे उघडण्याचा अनुभव असतो. ह्रदय आणि मन यांना स्पर्श करून जीवनाच्या विविध पैलूंची ओळख करून देण्याचं सामर्थ्य त्यात असतं. पुस्तकं नसती तर हे कधीही शक्य झालं नसतं. एखादं चांगलं पुस्तक आपल्या संवेदनांना जागं करतात आणि आपलं कल्पनाविश्व, अद्भूतता, प्रश्न आणि स्वत:ला जाणून घ्यायची क्षमता वाढवतात.
या सर्व प्रक्रियेत आपल्याला स्वत: सोबतच जीवनाच्या महत्त्वाच्या पैलूंशी परिचय होत असतो, ज्यांच्याशी आपण तोपर्यंत अनभिज्ञ असतो. चांगलं पुस्तक वाचण म्हणजे आपल्या खुर्चीवर एका जागी बसून भिन्न भिन्न कालखंडातला, संस्कृतींचा आणि देशांचा प्रवास करणे होय. जगातील सर्वोत्कृष्ट महाकाव्य ही साहित्याचा एक उत्तम नमूना आहेत.
पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट. पुस्तकं फक्त आपल्या एकूणच माणूस म्हणून असलेल्या ओळखीबाबत सजग करतात, असे नाही. पण राष्ट्रीय आणि स्थानिक विशिष्ट अशा इतिहासाबाबतही सजग करत असतात. जेव्हा असं काही होतं तेव्हा तेव्हा इतिहास घडतो. बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीतल्या वंदे मातरम् या गाण्याने स्वातंत्र्यसैनिकांच्या कित्येक पिढयांना उर्जा दिली. राष्ट्रकवी सुब्रमण्यम भारती यांच्या काव्य संग्रहांनीही असाच परिणाम साधला होता. अन्य भारतीय भाषांमधील पुस्तकांचेही स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे,
प्रत्येक भारतीय भाषेत राष्ट्रीय आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या पुस्तकांची मोठी परंपरा आहे, हे मान्य केलं पाहिजे. या सर्व भाषा आणि त्यातले साहित्य हे एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत मात्र त्यात मुलभूत अशी अनोखी एकता बघायला मिळते. त्यामुळेच गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांची मुळ बंगाली भाषेतील गोरा सारखी कादंबरी तेलुगु आणि मल्याळम वाचकांना भावते. ही कादंबरी मी शाळेत असताना माझी मातृभाषा- सिंधी भाषेत वाचली आहे. मराठीतले लेखक शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कर्णावरची ऐतिहासिक कादंबरी ही हिंदीतही सर्वाधिक विकली जाणारी कादंबरी आहे. या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर मी वाचत असतो.
नोबेल विजेत्या भारतीय लेखकांच्या संख्येवरून भारताची या क्षेत्रातली दर्जेदार परंपरा ठरवणं योग्य नाही. जागतिक साहित्यात भारतीय लेखक आणि कवींचं असलेल बौध्दिक आणि साहित्यिक योगदान हे अनन्यसाधारण आहे. आपल्या दीर्घ इतिहासाकडे पाहिल्यास आपला समाज हा अतिशय उदार असा आहे. जगभरातील चांगल्या पुस्तकांचं आपण नेहमीच स्वागत केलं आहे. चांगली पुस्तकं आणि महानं साहित्यिक हे जागतिक बंधुत्वाचे शक्तीशाली असे राजदूत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या 1857चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाचा तरूणपणी माझ्यावर मोठा प्रभाव होता. इंग्रजांनी बंदी घातलेल्या या पुस्तकाची प्रत माझ्या सिंधमध्ये सोबत बाळगणे ही विलक्षण अशी कृती होती. आणि ती मी केली याचा मला अजुनही अभिमान वाटतो.
साहित्य आणि राष्ट्रीय इतिहास यांच्याव्यतिरिक्तही पुस्तक प्रकाशनाचं विश्व मोठ्या प्रमाणात विस्तारलं आहे. प्रकाशन व्यवसाय विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यवसाय आणि व्यवस्थापन, आरोग्य आणि वैद्यक, खेळ, मनोरंजन, राजकारण, प्रेम आणि सेक्स, व्यक्तिमत्व विकास या आणि अशा अनेक विषयांवरची पुस्तकं प्रकाशित करत असतात. पुस्तकं वाचकांच्या ज्ञान, रस आणि बुध्दीच्या कक्षा सातत्याने रूंदावत असतात.
भारताला पुस्तक वाचन समात कसं बनवावं या मुळ प्रश्नाकडे मी आता येतो. पुस्तकं आणि वाचनाबद्दलचं प्रेम हा समकालीन भारतीय समाजाचा विशेष गुण राहिलेला नाही, हे सर्वप्रथम मान्य करावं लागेल. भारतात दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या संख्येवरून हा निष्कर्ष काढला आहे (दरवर्षी सुमारे 6000 पुस्तक प्रकाशित होतात. ही संख्या आपली लोकसंख्या आणि अन्य विकसित देशांची संख्या पाहता कमीच आहे.) त्याचप्रमाणे दर्जा, विषय, वितरण आणि विक्री यावरूनही हे सिद्ध होतं. आपली अर्धी लोकसंख्या अशिक्षित आहे, हे सांगून या प्रश्नाचं स्पष्टीकरणं देता येणार नाही. आपली शिक्षित लोकसंख्याही फार मोठी आहे. त्याचप्रमाणे किमान दहावी उत्तीर्ण असलेली लोकसंख्याही प्रकाशन व्यवसायास मोठं बळ देऊ शकतात, जर वाचनाची आवड मोठ्या प्रमाणात वाढवली तर.
त्याचप्रमाणे भारत काही तसा श्रीमंत देश नाही हे कारणही तितकसं पटणारं नाही. कारण आर्थिकदृष्ट्या पुस्तकं विकत घेणं परवडू शकेल अशी संख्याही मोठी आहे. थोडीशी वाचनाची सवय लावली तर हे सहज शक्य आहे.
पुस्तकांच्या किमती आता मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, त्यामुळे खऱ्या पुस्तकप्रेमींना अडचण येतेय. मात्र ही एवढी एकच गोष्ट आहे का जी मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्ग खरेदी करत असतो ? खरं तर या लोकांच्या यादीत पुस्तक खरेदी, विशेषत: भारतीय पुस्तकांची खरेदी ही अगदी तळाला असते.
या गोष्टीचं मुळ आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. आपल्या शाळा आणि महाविद्यालयं परिक्षाकेंद्रीत झाली आहेत. परिणामी पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त विद्यार्थी दुसरं काही वाचतच नाहीत. बरीच मंजळी तर पाठ्यपुस्तक वाचायचीही तसदी घेत नाहीत, गाईड्स, सोडवलेल्या प्रश्नपचत्रिका वगैरेच त्यांना पुरेशा असतात. सुरूवातीच्या वयातच म्हणजे मन पुरेसं समृद्ध नसतानाच प्रश्न विचारण्याच्या सवयीतून एखाद्याची वाचनाची आवड जाणीवपूर्क जोपासता येते. मात्र ज्या व्यवस्थेत शिकवणं आणि शिकणं एकाच वेळी होत असतं, त्या व्यवस्थेत हे शक्य नाही. त्यासाठी सर्व शिक्षणतज्ज्ञ आणि पुस्तकप्रेमींनी स्वामी विवेकानंद, जे स्वत: पुस्तकप्रेमी होते, ते काय म्हणाले ते जाणून घ्यायला हवं. ते म्हणतात, “वाचनाची कला जोपासण्यासाठी रिकाम्या आणि प्रश्न असलेलं मन तयार होऊ द्या आणि मग ती उत्तर पुस्तकांत शोधा.”
पुस्तकांबाबत औदासिन्य असण्याचं आणखी एक कारण हे माध्यमांशी निगडीत आहे. इंग्रजी माध्यम, ज्यांचा प्रभाव इंग्रजी वाचू आणि बोलू शकणाऱ्यांवर अधिक आहे, ते पुस्तकविश्वाबद्दल पक्षापाती आहेत. जे इंग्रजी भाषेत लिहिलंय तेच फक्त उत्तम आणि त्यालाच बौध्दीक वर्तुळात प्रतिष्ठा मिळते आणि त्याचीच दखल इंग्रजी माध्यमं घेतात. हा अतिशय चुकीचा पायंडा पडला आहे. द हिंदू आणि अन्य काही छोटे वर्तमानपत्र, काही मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्र वगळता इंग्रजीशिवायच्या साहित्याची फार कमी नियतकालिकं आणि दैनिक दखल घेतात.
गेल्या काही काळात घडलेल्या घडामोडींमुळे हा प्रकार वाढला आहे. कारण भारतीय आमि भारतीय वंशाच्या इंग्रजीत लिखाण करणाऱ्या लेखतांना अचानक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी मिळायला लागली आहे. परिणामी इंग्रजीशिवाय अन्य भाषेत लिखाण करणारे लेखक हे झाकोळून गेले आहेत. अर्थात आमच्या नव्या पिढीने मिळलवेल्या यशाबद्दल कोणतीही असुया नाही, त्यांनी भारतात आणि परदेशात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा अभिमानच वाटतो. मात्र त्याच वेळी इंग्रजीशिवाय अन्य भाषेतील लिखाणाविषयी अतिशय अस्पष्टता आणि गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. अन्य भाषक लेखकांच्या मनात त्याबद्दल असुरक्षितता वाढणे भारतीय प्रकाशन व्यवसायासाठी चांगले लक्षण नाही.
साहित्यकृती आणि साहित्यिकांना अतिशय व्यावसायिक पद्धचीने समोर आणणे ही सध्याची माध्यमांची प्रवृत्ती झाली आहे. परिणामी कोणत्या प्रकाशकाने लेखकाला किती रूपये अॅडवान्स दिला हा मोठा चर्चेचा विषय होऊन जातो. त्यामुळे ते सर्व वाचून ते पुस्तक कोणी वाचण्याची शक्यता फारच कमी होते.
माध्यमं, विशेषत: दूरचित्रवाणी आणि बिगरसरकारी सामाजिक संस्था वाचनाची आवड वाढणे आणी पिढ्यानपिढ्या जपणे यासाठी मोठं काम करू शकतात, जेणेकरून ते आपल्या संस्कृतीचा एक भाग बनेल. त्यासाठी बंगाली, मराठी आणि मल्याळम भाषेत झालेले प्रयत्न देशभरात नक्कीच अनुकरणीय आहेत. महाराष्ट्रात ग्रंथाली चळवळीने फिरत्या ग्रंथ प्रदर्शनांनी महत्वाचे काम केले आहे. त्याचप्रमाणे एखाद्या नामवंत लेखकासोबतच्या ग्रंथ दिंडीनेही चांगला प्रभाव निर्माण केला आहे.
ग्रंथ दिंड्यांनी संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीची परंपरा पुढे चालवली आहे.
त्याचप्रमाणे बंगालमधील मोठ्या साहित्य संमेलनांचं आहे, त्यात पुस्तक प्रदर्शन आणि विक्री ही दुर्गापुजा उत्सवाच्या वेळी होते. गीताप्रेस, गोरखपुर याचं यशही वाखाणण्याजोगं आहे.
वाचनसंस्कृतीला धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींशी जोडल्यास वाचनचा प्रसार करता येतो, हे यातून सिध्द होतं.
हे प्रयत्न मुस्लिम समाजातही यशस्वी होतील, ज्या समाजाचं वाचन धार्मिक पुस्तकांव्यतिरिक्त फारसं नसतं. प्रेषित महंमदांनी त्यांच्या अनुयायांना एक महत्वाचा संदेश दिला आहे, “जन्म ते मृत्यूदरम्यान तुम्ही ज्ञान मिळवा” त्याचप्रमाणे “विद्वान माणसाची शाई ही हुतात्म्याच्या रक्तापेक्षा जास्त पवित्र असते.”
जाहिरात, खरेदी-विक्री आणि पुस्तकांचं वाचन या गोष्टींमुळे प्रकाशन विश्वात नाट्यमयरित्या बदल घडताय. हा बदल माहिती तंत्रज्ञान विशेषत: इंटरनेटमुळे होतो आहे. जगातील सर्वांत मोठं पुस्तकांच दुकान, ज्यांची दारं वाचकांसाठी सदैव खुली आहेत- Amazone.com हे इंटरनेटवरील एक संकेतस्थळ आहे.
हे संकेतस्थळ आपल्याला अगदी प्रत्य्क विषयावरचं पुस्तक उपलब्ध करून देतं, जे इंटरनेटद्वारेच खरेदीही करता येतं. अॅमेझाॅनने आपली जाहीरात अतिशय कल्पकरित्या केले आहे- “आकाशात तारे, समुद्रात मासे आणि अॅमेझाॅनमध्ये पुस्तकं.”
येत्या काही वर्षात जागतिक बाजारपेठेत वरचष्मा निर्माण करायचा असेल तर भारतीय प्रकाशकांनी नव्या माध्यमांकडे वळायला हवं, असं मी त आवाहन करतो. भारत आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता होऊ पाहतोय. या क्षेत्रातले बरेच टप्पे आपण पार केले आहेत. आता भारतीय प्रकाशकांनीही राष्ट्रीय कार्यात आपलं योगदान द्यावं.

लालकृष्ण आडवाणी
(माजी उपपंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते)
मूळ इंग्रजी भाषण, अनुवाद: पार्थ कपोले
पूर्वप्रसिद्धी: मासिक जडणघडण, एप्रिल २०१७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा