नाहिसे लांब होताना...
बऱ्याचदा आपण अस्वस्थ असतो, खूप काही बोलायचं असतं. पण ते शक्य होत नाही. मग अशाच एखाद्या अस्वस्थ क्षणी सर्व काही लिहून मोकळ व्हायचा प्रयत्न करतो. त्यातलंच हे लिखाण

आपला ना एक प्राॅब्लेम असतो. अर्थात समस्त मानवाजातीचाच तो प्राॅब्लेम आहे, की आपण व्यक्तींमध्ये गुंतून पडतो. आता माणूस म्हटलं की त्याचा हजारो लोकांशी संपर्क येत असतो. त्यातच काही व्यक्ती मग त्याचे जवळचे होऊन जातात.
म्हणजे बघा ना, आपल्याला एखादी व्यक्ती फार जवळची असते. म्हणजे त्यात मित्र, मैत्रीण, सहकारी, वरिष्ठ, किंवा आपलं एखाद्यावर प्रेम असेल ती व्यक्ती. मग आपण त्यात इतके गुंतून जातो की मन मोकळं करायचं असेल, भांडायचं असेल, अगदी छोटीशी गोष्ट सांगायची असेल, त्यासाठी आपण हक्काने त्याच्याकडे जातो. कारण आपल्याला खात्री असते की त्या व्यक्तीला हे सांगितल्यावर तो ऐकून घेणारच. म्हणजे सहवासातून ते एकमेकांशी अशी काही नाळ जुळलेली असते की बऱ्याच गोष्टी अगदी न सांगताही कळत असतात. म्हणजे अगदी वेगळंच फिलिंग असतं ते. आणि त्यामुळेच एक प्रकारचा आधार वगैरे असतो आपल्याला.
पण त्यात होतं असं की आपण नकळत त्या व्यक्तीवर हक्क सांगायला लागतो. हक्क हा शब्द चुकीचा असेल कदाचित. पण आपल्याला असं वाटायला लागतं की आपलं आहे ते अगदी तसचं रहाव. म्हणजे त्यात अगदी छोटासाही बदल होऊ नये. आणि त्यातच तर खरी अडचण असते.
कारण एक वेळ अशी येते की तसं फक्त आपल्यालाच वाटत असतं, समोरचा व्यक्ती त्यातून मात्र अलगद बाजूला झालेला असतो, अगदी आपल्या नकळत. आणि ते पचवणं आपल्याला प्रचंड अवघड असतं. म्हणजे बघा ना, कालपर्यंत अगदी आपला, आपल्या हक्काचा व्यक्ती एकदम दूर निघून जातो आणि आपण प्रचंड अस्वस्थ होतो. कारण तशी कल्पनाच केलेली नसते ना आपण. पण तसं झालेलं तर असतं.
आणि त्यामुळे आपण मात्र अस्वस्थतेच्या भोवऱ्यात अडकतो. कारण तो व्यक्ती आता आपल्यासोबत नसतो. मग आपलं सर्व सांगायचं तरी कुणाला ?. हा प्रश्न आपला पिच्छा पुरवत असतो. आणि यातली आणखी एक अडचण म्हणजे असं काही झालंय हे त्या व्यक्तीच्या गावीही नसतं, आणि ते आपल्याला आणखीनच धक्कादायक असत. म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो की, “अरे कालपर्यंत तर सर्व चांगलं होतं ना.. मग आता एकदम झालंय तरी काय ?.” मात्र हा प्रश्न फक्त आपल्यालाच पडलेला असतो...
ते संदीप खरेंची कविता नाही का

हे भलते अवघड असते
कुणी प्रचंड आवडणारे
ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि
नाहिसे लांब होताना
तर ते “नाहिसे लांब होताना” ही भावना खूप विचित्र असते...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा