वनवासी कल्याण आश्रम

वनवासी कल्याण आश्रम. देशातील आदिवासी भागात काम करणारी एक स्वयंसेवी संघटना. संघटनेची आणखी एक ओळख म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नामक संघटनेच्या परिघातील म्हणजे ‘संघ परिवार’ यातील एक संघटना. संघटनेची स्थापना स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे १९५२ सालात झाली. रमाकांत केशव उपाख्य बाळासाहेब देशपांडे हे या संघटनेचे संस्थापक. प्रस्तुत लेखात संघटनेची स्थापना, त्यामागचा विचार, महत्वाचे टप्पे आणि कामाचे विविध आयाम यांचा आढावा घेऊया. स्थापना : वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापनेचे प्रामुख्याने दोन टप्पे सांगता येतील : स्वातंत्र्योत्तर काळात जशपूर (सध्या झारखंड राज्याचा भाग) या तत्कालीन मध्य प्रदेश आणि बरार प्रांतातील गावात या संघटनेची स्थापना झाली. अशा प्रकारची संघटना स्थापन करणे आवश्यक का वाटले, त्याची पार्श्वभूमी : स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५२ सालची एक घटना. तत्कालीन मध्य प्रदेश प्रांताचे मुख्यमंत्री पंडीत रविशंकर शुक्ल यांनी या भागास भेट दिली. अन्य ठिकाणी त्यांचे चांगले स्वागत झाले असले तरी जशपूरनगर येथे मात्र त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. हा प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येचा प्रदेश होता आण...