'ती' आणि 'तो'
त्याला ती आवडलेली.
अगदी पहिल्यांदा
पाहिल्यावरच.
Love at First Sight म्हणतात
ना.
तसच घडलं.
तिलाही तो आवडलेला.
मग एक दिवस त्याने
तिला
मनातलं सर्व सांगून
टाकलं.
तिनेही ते ऐकून
घेतलं.
ते सर्व सांगतांना
तिच्या
चेहऱ्यावरचा आनंद
सुखावून गेलेला त्याला.
तो हे सर्व बोलणार
जणू काही
माहितीच होत तिला.
त्याला अपेक्षा होती
तिच्या होकाराची.
पण तिचा नकार आला.
मग तो अस्वस्थ काही
दिवस.
नंतर सावरलाही.
त्याचं एकमेकांशी
बोलणही
सुरु झाल पुन्हा.
मग एक दिवस एकदम
तिने
विचारल.
‘मी अजूनही आवडते
तुला ?’
‘माझी अजूनही आठवण
येते’
तो तेव्हा खोट बोलला
– ‘नाही’
(तो सर्वांत मोठा
मुर्खपणा होता त्याचा
हे नंतर जाणवलेलं
त्याला.)
मग पुन्हा
नेहमीसारखे ‘मित्र’
झाले ते एकमेकांचे.
(खर तर एकदा प्रेमात
पडल्यावर त्या
व्यक्तीसोबत मैत्री
नसतेच आपली.)
पण खर तर सर्व
बदललेलं होत.
ते दोघ बोलायचे
तेव्हा मनात
काहीतरी वेगळच
असायचं.
ते दोघ भेटायचे
तेव्हाही मनात
काहीतरी वेगळच
असायचं.
पण तो विषय कुणीही
काढत नव्हत.
मग असचं एकदा ते
भेटले.
तेव्हा तिने त्याला
प्रेमाची
कबुली दिली.
त्या भेटीनंतर
त्यानेही ठरवलेलं
की आता बास.... काय
ते स्पष्ट करायचं.
आता उगाच भावना
लपवायच्या नाहीत.
अगदी positive
झालेला तो
त्या भेटीनंतर.
पण, त्या भेटीनंतर
सर्वच
एकाएकी बदललं.
नेहमीचच कारण
त्याला.
मग काही महिने संवाद
अगदीच तुटलेला
दोघांचा.
तो अस्वस्थ आणि ती
सुद्धा अस्वस्थच.
मग एक दिवस अखेर ते
भेटले.
सर्व गोष्टी
‘स्पष्ट’ करण्यासाठी.
‘नात’ पुढे जाऊच शकत
नाही.
हे एकमेकांना
सांगण्यासाठी.
आणि ते त्याला आणि
तिलाही पटलेलं.
दोघांनीही
मनाविरुद्ध का होईना
पण ते स्वीकारलेलं.
आणि त्यानंतर दोघेही
तणावमुक्त
झालेले.
सर्व काही स्पष्ट
झालं होत आता.
पण तो अजूनही
गुंतलेला होताच
तिच्यामध्ये.
शेवटी ती म्हणाली,
You can see me but you can't meet me.
You can feel me but you can’t touch me.
You Can Imagine but you can't turn it to reality.
आणि मग
त्यानेही आता
थांबायचं
ठरवलेलं (?)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा