त्यांना आपण गृहित धरतोय...
“श्रमिकांच्या म्हणजे विविध प्रकारची कामं करणाऱ्या आणि तुलनेने समाजातील निम्न स्तरातील लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल कोणत्याही आस्था नसते, महत्त्व नसतं. त्यांना फक्त दोनवेळच्या जेवणाची आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाची चिंता असते. शिवाय शिक्षण हे त्यांना परवडणारंही नसतं. हे अत्यंत चुकीचं अॅनालिसिस आपण करत आलेलो आहोत. त्यात काहीही तथ्य नाही. खरं तर आपण या त्यांच्या प्रश्नांना समजून घ्यायला कमी पडतोय. कारण आपण त्याचा विचार आपल्या पद्धतीने करतोय. त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण बरंच काही करू शकतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलांना आपण सपोर्ट देऊ शकतोच. पण ते आपल्यापैकी किती लोक करतात.. आपण फक्त लांब राहून चुकीचे निष्कर्ष काढण्याचं काम करत असतो. खरं तर त्यापेक्षा खूप काही करता येण्यासारखं आहे आपल्याला.” रजनी परांजपे बोलत होत्या.
रजनी परांजपे. पुणे आणि मुंबईत गेल्या 25 वर्षांपासून ‘डोअरस्टेप स्कूल’ ही संस्था चालवणाऱ्या शिक्षणसाधक... साधक याच्यासाठी की अतिशय निरपेक्ष भावनेने आणि काहीतरी बदल घडावा या उद्देशाने रजनीजी काम करताय. त्यातला हेतू एकच, तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या फारसे सक्षम नसलेल्या, प्रामुख्याने शहरी भागात राहून श्रमकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना शिक्षणाच्या परिघात आणणे.
शिक्षणविश्वात जरा वेगळं काम करणाऱ्या अनेक संस्था आपल्या आजुबाजूला असतात. डोअरस्टेप स्कूल ही अशीच एक संस्था. म्हणजे प्रत्येकालाच शाळेपर्यंत जाणं शक्य असतचं, असं नाही (अर्थात हे आपल्या एकूणच व्यवस्थेचे दुर्दैव..) मात्र आपण शिक्षणाला अशा मुलांपर्यंत नेऊ शकतोच की. मात्र गरज असते ती फक्त समस्या समजून घेण्याची आणि त्यावर नेमकेपणानं विचार करून तोडगा काढण्याची. अर्थात हे प्रत्येकालाच जमतंच असं नाही, मात्र डोअरस्टेप स्कूल सारख्या काही संस्था मात्र त्यात यशस्वी होताना दिसतात.
वाढते नागरीकरण हे भारताचं आता एक वैशिष्ट्य झालंय. मात्र ते होत असताना काही समस्याही निर्माण होत आहेत (अर्थात त्यासाठी नागरीकरणाच विरोध करणे योग्य नाही, कारण तसं करणं आपल्या हातात नाही.). त्यामुळे नागरी गरीब वर्गावर त्याचा परिणाम अनेक अंगांनी होतो. त्यातला शिक्षणावर होणारा परिणाम हा गंभीर आहे. कारण औपचारिक शिक्षणही न मिळू शकणाऱ्या मुलांची संख्या फार मोठी आहे आणि तसं होत असल्याने अनेक समस्याही पुढे जाऊन निर्माण होत आहेत. सर्वांत महत्वाचे म्हणजे सरकार त्यांच्या पध्दतीने विविध योजना आणतचं असते, मात्र त्यासोबत समाजाकडूनही काही प्रयत्न होणं गरजेचं आहे. तसाच एक प्रयत्न म्हणजे डोअरस्टेप स्कूल.
पुण्यातल्या औंध भागात आनंद पार्क सोसायटीमध्ये रजनी परांजपे राहतात. आपल्या दोन मजली घराच्या वरच्या मजल्यावर डोअरस्टेपचं कार्यालय आहे. अर्थात कार्यालय नावालाचं, कारण डोअरस्टेपचं खरं काम हे आऊटडोअरचं जास्त आहे...
रजनीजींशी डोअरस्टेपबद्दल बोलायला सुरूवात केली आणि पुढचे दिड-दोन तास एका वेगळ्याच शिक्षणप्रवासात अगदी गुंतून गेलो.
डोअरस्टेपची नेमकी संकल्पना, स्थापना याविषयी बोलताना परांजपे म्हणाल्या की, “साधारणपणे 1988 – 89च्या सुमारास कामाची नोंदणी केली मात्र प्रत्यक्षात काम मात्र त्यापूर्वीचं सुरू होतं. मुंबईत मी निर्मला निकेतन काॅलेज आॅफ सोशल वर्क या ठिकाणी शिकवत होते. सामाजिक कार्यात आधीपासूनच असल्याने झोपडपट्टी आणि तत्सम भागांमध्ये जाऊन काम करणं, त्यांचे प्रश्न हाताळणं हे काही फार वेगळं असं काम नव्हतचं आमच्यासाठी. स्कूल सोशल वर्क म्हणून आमच्या महाविद्यालयाचा एक प्रकल्प होता, त्यात आम्ही शाळेत न जाणाऱ्या मुलांना शाळेत टाकत असू, त्यासाठी त्यांच्या पालकांना भेटणं, समजावणं, अशा प्रकारचं कामाचं स्वरूप होतं. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करायचे, जेणेकरून त्यानाही अनुभव मिळायचा. त्यातून एक गोष्ट समजली, ती म्हणजे हा प्रश्न फार गंभीर आहे आणि असं विद्यार्थ्यांकडून काम करून घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही. कारण विद्यार्थ्यांना साहजिकच काही मर्यादा असतात. त्यामुळे मग 1989मध्ये रितसर संस्था स्थापन केली. त्यानंतर मी पुण्यात आले, पुण्यातही 1999मध्ये मग या संस्थेचं काम मी सुरू केल.”
साधारपणे 1988-89चा काळ म्हणजे भारतात प्रौढ शिक्षणावर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करत होते. ते अभियान यशस्वी झालं की नाही, हा वादाचा विषय असू शकतो. मात्र यामुळे मुलांच्या शिक्षणाचं काय... या प्रश्नाकडे सर्वांचचं दुर्लक्ष झालं, जे व्हायला नको होतं. अर्थात प्रौढांना साक्षर करून ते त्यांच्या मुलांना शिकवतील या हेतूने असं अभियान चालवंलं गेलं असावं. मात्र त्याचा कितपत उपयोग होतो, याबद्दल साशंकता आहे. कारण शिकण्याचं एक वय निघून गेल्यावर पुन्हा त्या प्रवाहात येणं आणि त्यातही कष्टकरी वर्गाने येणं जरा अवघड आहे. कारण त्यांना रोजच्या जिथं भ्रांत असते, तिथं ते स्वत: शिकतील आणि त्यानंतर मुलांना शिकवतील ही अपेक्षाचं करणं चुकीचं आहे. त्यासाठीच काहीतरी वेगळे प्रयत्नही करणं गरजेचं असतं.
अशाच प्रकारचे प्रयत्न डोअरस्टेपने सुरू केले. त्याबद्दल बोलताना रजनीजी म्हणाल्या की, “आम्ही महाविद्यालयात प्रौढ साक्षरता वर्गही चालवले होते, तेव्हा आम्हाला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे प्रौढांना शिकवणं हे लहान मुलांपेक्षा तुलनेनं अवघड आहे. कारण एकतर त्यांचे व्याप बदललेले असतात आणि शिक्षणाबद्दलच महत्व जजरा अडगळीत पडलेलं असतं. त्यामुळे हे स्वत:हून मुलांना शाळेत टाकतील, हे थोड अवघड होतं. मग आम्ही विचार केलाकी, जर हे शाळेपर्यंत जाऊ शकत नसतील तर आपण तर शाळा यांच्यापर्यंच आणू शकतोच की, म्हणजे शिकवू शकतोच. सर्वचं मुलांना शाळेपर्यंत नेणं शक्य नसेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना किमान साक्षर करायचं. किमान साक्षर म्हणजे वर्तमानपत्र त्यांना वाचता आलं पाहिजे, असं आम्हाला अभिप्रेत आहे. जेणेकरून ते साक्षर तरी होतील आणि शिक्षणाशा त्यांची नाळ तुटणार नाही. जेणेकरून भविष्यात संधी मिळाल्यास ते पुन्हा शिक्षणाकडे वळतील. म्हणजे त्यांना शाळेत जावसं वाटणंयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणयाचं आम्ही ठरवलं. कारण एकदा जर त्यांची शिक्षणाशी नाळ जोडली गेली की पुढच्या अनेक गोष्टी मग सोप्या होत जातात.”
हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे शिक्षणाच्या प्रसारासाठी अनेक योजना आहेत, मोठा खर्च त्यासाठी सरकार करत असते, मात्र मुलभूत अशी गोष्ट म्हणजे मुलांना शाळेत जावसं वाटाव यासाठी जे प्रयत्न करायला हवेत, त्यात व्यवस्था कुठेतरी कमी पडते आहे का ?
डोअरस्टेपचं काम विविध पातळ्यांवर चालतं, त्याबद्द बोलताना रजनीजी म्हणतात, “प्रत्येकालाच शाळेत घालणं हे शक्य होत नाही शिवाय प्रत्येक मुलं हे शाळेपर्यंत आलंच पाहिजे, असा अट्टाहासही नाही. त्यासाठी आम्ही वेगळा उपक्रम सुरू केला तो म्हणजे त्यांना किमान वाचता येईल एवढं शिकवायचं. म्हणजे आम्हाला समांतर शाळा वगैरे चालवायची नव्हती. ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही शाळेत घातलंच मात्र ज्या मुलांना ते शक्यच नाही, ती मुलं निरक्षर राहू नयेत यासाठी त्यांना किमान साक्षर करण्याचा कार्यक्रम सुरू केला. अर्थात फक्त एवढंच करून भागणार नव्हतं. त्यांना शिक्षणापर्यंत आणणं हा तर एक भाग झाला. मात्र आपल्यासारख्यांच्या घरात मुलं जर शाळेत जात असेलल तर त्याला ज्या प्रकारचं वातावरणं मिळतं, ते या मुलांना मिळणं शक्य नसतं. परिणामी त्यांना तशा प्रकारचं सहाय्य करण हे अधिक महत्वाच आहे.”
डोअरस्टेप सध्या फक्त आणि फक्त शिक्षणावरचं काम करत आहे. त्यांचं काम चार बाबींवर प्रामुख्याने चालतं.
वय वर्षे तीन ते सहा वयोगटातल्या मुलांसाठी डोअरस्टेपतर्फे बालवाड्या चालवल्या जातात. त्याबद्दल रजनीजी म्हणाल्या, “बालवाड्या चालवणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण सध्या पाहिलं तर अंगणवाड्या आहेत, मात्र त्या फक्त ग्रामीण आणि आदिवासी भागात चालवल्या जात आहेत. शहरी भागासाठी तसं काहीचं नसल्याचं चित्र आहे. आणि बालवाड्या चालवण्याचा फायदा म्हणजे त्यामुळे मुलांची शाळेत जाण्यासाठी जी पूर्वतयारी होणं आवश्यक असते, ती साध्य होते आणि दुसरी म्हणजे आम्ही ज्या विभागात काम करत आहोत, त्या विभागात प्राथमिक शिक्षण घेणारी नेमकी किती मुलं आहेत, याची नेमकी परिस्थिती आम्हाला समजते. त्यानंतर मुलांना शाळेव्यतीरिक्तही सहाय्य व्हावं म्हणून स्टडी क्लासेसही जाणीवपूर्वक चालवतो. जेणेकरून अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि शाळेपासून ते दूर जाऊ नयेत. वस्तीपातळीवर मुलांसाठी वाचनालयं चालवणे हा आणखी एक प्रयोग. कारण मुलांना चांगलं वाचायला मिळायलाचं हवं.”
शिक्षणाच्या बाबतीतच ही चार मुख्य काम डोअरस्टेप करत आहे, त्यात गरजेप्रमाणे वाढही होते आहे. म्हणजे शाळेपर्यंत मुलांना तर आणलं, पण मुलांचे पालक हे दिवसभर कामावर जात असल्याने मुलांना शाळेत न्यायचा आणि परत आणायचा एक मोठा प्रश्न उभा राहिला, त्यावरही डोअरस्टेपने उपाय काढला. त्यासाठी मग स्कूल बसची सोय त्यांना केली. शिवाय आता काही शाळा त्यांच्या अवांतर वेळी त्यांच्या बसही डोअरस्टेपला देतात. त्यामुळे दररोज आठशे ते हजार मुलांची वाहतुकीची सोय डोअरस्टेपने केली आहे.
प्रोजेक्ट फाऊंडेशन (पाया प्रकल्प)
प्रोजक्ट फाऊंडेशन अथवा पाया प्रकल्प ही डोअरस्टेपची एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आहे. यात प्रामुख्याने बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जातं. त्याबद्दल बोलताना रजनीजी म्हणाल्या की, “पुण्यात 2003 च्या सुमारास आम्ही एक सर्वेक्षण केलं. त्यात असं लक्षात आलं की पुणे शहरात आणि आसपासच्या परिसरात नवनवी बांधकामं वाढता आहेत, अर्थात वाढत्या नागरीकरणाचाच तो परिणाम. आणि त्यामुळे हजारो मजूर भारताच्या कान्याकोपऱ्यातून त्या बांधकामांवर काम करण्यासाठी सहकुटुंब पुण्यात येतात. मात्र त्यांची मुलं मात्र शाळेत जाऊ शकत नाही. तेव्हा अशा मुलांसाठी आम्ही काम करायचं ठरवलं. त्यासाठी प्रथम एक सर्वेक्षण केलं, त्यात पाच ते पंधरा वयोगटातली शाळेत न जाणारी सुमारे साडेचार ते पाच हजार मुलं असल्याचं आढळून आलं. त्यानंतर मग बांधकाम ठिकाणांवर जास्त लक्ष द्यायचं ठरवलं. त्यानुसार आम्ही प्रत्यक्ष त्याच ठिकाणी वर्ग सुरू करण्याचं ठरवल. मात्र यात एक अडचण आली, ती म्हणजे बांधकाम व्यावसायिकांनी आम्हाला सागितलं की फक्त पाच ते पंधरा कशाला, तुम्ही जर अगदी लहान मुलांचीही जबाबदारी घेणार असाल तर तुमच्या उपक्रमाला आमची काहीही हरकत नाही, कारण या लहान मुलांना सांभाळणं ही एक अतिरिक्त जबाबदारी आमच्यावर आहे. मग आम्ही आमच्या पध्दतीत थोडा बदल केला. म्हणजे शून्य ते तीन वयोगटासाठी आम्ही पूर्वप्राथमिक वर्गही सुरू केले. आणि बाकी काम ठरल्याप्रमाणेच सुरू केल.”
सध्या सुमारे 95 ते 100 बांधकाम प्रकल्पांवर डोअरस्टेपचे वर्ग सुरू आहेत. वर्षभर पुण्यात सुमारे 100 ते 150 बांधकाम प्रकल्प हे सुरू असतात. त्या सर्व ठिकाणी हे वर्ग चालवले जातात. या वर्गांचे काम अतिशय नियोजनबध्द पध्दतीने चालवले जाते. दिवसभर पूर्णवेळ दोन शिक्षिका कार्यरत असतात. तसेच पाच वर्गांच्या एका गटाला एक पर्यवेक्षक तर दहा गटांना एक समन्वयक अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दररोजच्या हजेरीसोबतच अन्य गोष्टी म्हणजे पालकांशी संपर्क, मुलांना जवळच्या शाळेत घालणे, पालकांना त्याबद्दल मार्गदर्शन करून सक्षम बनवणे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे संबंधित विद्यार्थ्यांचे ट्रॅकींक करणे म्हणजे जर तो अन्य गावातील अथवा अन्य राज्यातील असेल आणि पुण्यातले काम संपून जर त्याचे कुटुंब बाहेर गेले असेल तर त्यांच्याशी संपर्क ठेवणे आणि ते शाळेत जातोय की नाही, याची माहिती घेणे. आणि याचे सकारात्मक परिणामही दिसायला लागलेत. आता पालकांनाही शिक्षणाचं महत्व पटायला लागलंय, परिणामी ते नवीन काम शोधताना ज्या भागात शाळा असेल, त्याला प्राधान्य द्यायला लागलेत. आणि हा निश्चितच एक सकारात्मक बदल आहे.
ग्रो विथ बुक्स (वाचनसंस्कार प्रकल्प)
ग्रो विथ बुक्स हा अणखी एक अभिनव प्रकल्प. डोअरस्टेप वस्तीपातळीवर वाचनालयं चालवतेच. मात्र जरा वेगळ्या पध्दतीने हा हा प्रकल्प चालवला जातो. महापालिकाच्या शाळेत आठवड्यात 25 मिनिटांचा एक असे दोन तास वाचनासाठी दिलेले असतात. मात्र त्याचा म्हणावा तसा विनियोग होत नाही, हे त्यांच्या लक्षत आले होते. डोअरस्टेपने महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून पहिली ते चौथीच्या वर्गांचे तास मागून घेतले. त्या वेळात डोअरस्टेपचे स्वयंसेवक मुलांना वेगवेगळी पुस्तकं वाचायला देतात, वाचनाशी संबंधित विविध खेळ घेतात, एकूणच वाचनाचा तास रटाळ वाटू नये, याची काळजी घेतली जाते. शिवाय वर्षातून दोन वेळा या मुलांची वाचन क्षमता चाचणीही घेतली जाते, जेणेकरून मग मुलांची नेमकी प्रगती आम्हाला समजली. सुरुवातीला फक्त पहिली ते चौथीसाठी हा उपक्रम राबवला जात होता. मात्र त्यानंतर पाचवी ते सातवीच्या वर्गांनीही मागणी केली, त्यामुळे आता त्यांच्यासाठीही हा उपक्रम सुरू आहे. डोअरस्टेपकडे असलेली सुमारे दिड लाख पुस्तक आज ही मुलं वाचत आहेत.
एव्हरी चाइल्ड काउंट्स (प्रत्येक मुल मोलाचे)
शिक्षणापासून एकही मुल वंचित राहू नये, या हेतून लोकसहभाग असलेली ही योजना आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग डोअरस्टेप घेते. शिक्षण हक्क कायदा लागू झाला असला तरी त्याचा कागदोपत्री वगळता फारसा प्रभाव पडल्याचे दिसत नाही. परिणामी यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक होता. त्याबद्दल रजनाजी सांगतात, “त्यासाठी डोअरस्टेपने नागरिकांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग आणि त्यांनी विविध ठिकाणी सर्वेक्षणे करणे त्यानंतर मुलांच्या पालकांशी बोलून मुलांना शाळेत आणणे, अशी रचना आहे. गेली पाच वर्षे हा उपक्रम सुरू आहे, मात्र आम्हाला अपेक्षित असा नागरिकांचा सहभाग मात्र मिळालेला नाही. तरीही सुमारे 1500 मुलांना आम्ही आज शाळेपर्यंत पोहोचवू शकलो आहोत. मात्र काॅर्पोरेट सेक्टरची आम्हाला यासाठी पार चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”
पालक सहभाग
“हे सर्व करताना जर पालकांचा सहभाग नसेल तर काहीही उपयोग नाही. कारण मुलं दोन दिवस शाळेत येईल, मात्र जर पालकांचा त्यात सहभाग नसेल तर शाळेकडे होणाऱ्या मुलांच्या दुर्लक्षाकडे त्यांना काणाडोळा केला तर ते धोक्याचं आहे. त्यासाठी पालक सहभागासाठी आम्ही विशेष कार्यक्रम आखला. पालकांची भेट घेणे, त्यांचे एकत्रीकरण करणे, गोष्टींच्या माध्यामातून त्यांना पटवून देणे आणि नवीन शाळेच्या प्रवेशासाठी नेमकं काय करायचं हे आम्ही त्य093Eना शिकवतो, पटवून देतो आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत”- पालक सहभाग या उपक्रमाबद्दल रजनीजी सांगत होत्या.
डोअरस्टेपचं आणखी एक महत्वाचं काम म्हणजे पुस्तक प्रकाशन. हे महत्वाचं याच्यासाठी की अतिशय आवश्यक अशा प्रकारातली पुस्तकं ते प्रकाशित करत असतात. म्हणजे मुळाक्षरांचे पुस्तक- यामध्ये काना, वेलांटी, उकार, ओकार, उकार आणि मात्रा अशा पध्दतीने पुस्तकं प्रकाशित केली जातात. म्हणजे उकारांच्या पुस्तकात उकारांचा वापर असलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. जेणेकरून मुलांना ते समजून घ्यायला अगदी सोपं जातं. त्यानंतर याच प्रकारची जोडाक्षरं पुस्तिका, जोडाक्षरं विरहित पुस्तिका, गाणी, कवितांची पुस्तकं प्रकाशित केली जातात.
गेल्या 25 वर्षांपासून रजनी परांजपे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत, शिवाय प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करण्याची त्यांची सवय असल्याने एकूणच व्यवस्थेच्या शिक्षण धोरणाबद्दल त्या काहीशी नाराजी व्यक्त करतात. त्या म्हणतात, “शिक्षणाविषयी सरकारची धरसोड वृत्ती आहे. म्हणजे एखादी नवी योजना जाहीर कल्यावर जुनी योजना अगदी बंदच केली जाते, हे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे कोणत्याच गोष्टीत सातत्य राहत नाही. शिवाय सध्याच्या शिक्षणात व्यावहारिक शिक्षण आहेच कुठे... सर्वजण फक्त डिग्र्यांच्या मागे लागलेत. यामुळे शिक्षणाचा दर्जाविषयी काळजी वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय इंग्रजीचा जो बागुलबुवा उभा केला जातोय, ते तर अतिशय़ चुकीचं आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मातृभाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे.”
पुणे आणि मुंबईत गेली 25 वर्षे एका विशिष्ट ध्येयाला समोर ठेवून डोअरस्टेप, रजनी परांजपे आणि त्यांची पुण्यातली 750 कर्मचाऱ्यांची टिम काम करते आहे. बऱ्याचदा आपल्याला काहीतरी वेगळं करावसं वाटतं, मात्र काय करावं हे लक्षात येत नाही. मात्र आता तुम्ही डोअरस्टेपसाठी खूप काही करू शकतात. शिवाय डोअरस्टेपला आर्थिक मदतही करता येईल, 80 (जी) प्रमाणे देणग्या या करमुक्त आहेत.
कुठे आहे डोअरस्टेप :
डोअरस्टेप
रजनी परांजपे, 110, आनंद पार्क, औंध, पुणे, 411007
संपर्क- 020- 25898762
मोबाईल- 9766337431/ 32
इ मेल- pune@doorstepschool.org
संकेतस्थळ- www.doorstepschool.org
पूर्वप्रसिद्धी- मासिक जडणघडण, मार्च २०१७

![]() |
रजनी परांजपे |

- बालवाड्या
- शिकवणी वर्ग (स्टडी क्लासेस)
- वय वर्षे 12 ते 14 वयोगटातील मुलांना किमान साक्षर करणे
- वाचनालयं

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा