कधी कधी...!


कधी कधी काहीतरी करावस वाटतं
मग अशा वेळी काय करावं ?

तर अशा वेळी चहा घ्यावा मस्तपैकी
नेहमीच्या टपरीवरचा...
वाटल्यास पुन्हा एकदा घ्यावा 
एक कटिंग...

अशा वेळी कविता वाचाव्यात
पाडगांवकर किंवा ग्रेस
आणि सौमित्रही...
आणखीन वाचायच्या तर
वाचाव्यात अटलजींच्या किंवा
हरीवंशरायांच्या
आणि हरवून जावं त्यात...

अशा वेळी मग वाचावीत मग
प्रवासवर्णनं मीना प्रभुंची
आणि जगावा प्रत्येक देश...
नाहीतर मग जुनी 
बालभारतीची पुस्तकं पहावीत 
आणि शोधावं बालपण....
किंवा मग डायरीची
जुनी पानं चाळावीत
आणि...

नाहीतर मग कागद
आणि पेन घ्यावं
आणि लिहावं 
मनसोक्त....
मनात येईल ते, तेवढं आणि तसंच

आणि मग तेच 
वाचूनही पहावं....
सापडतंय का काही नवीन ?
ते शोधावं.....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता