ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता

सत्यजित आज पुन्हा एकदा तोच चित्रपट बघत होता. कितव्यांदा ? खर तर त्याने आता मोजणं सोडूनच दिल होत. म्हणजे आधी मोजायचा वगैरे नाही, पण म्हणजे लक्षात राहायचं त्याच्या. पण तो चित्रपट बघतांना आठवणीत बुडून जायला आवडायचं त्याला. म्हणजे चित्रपट त्याला स्वतःचीच गोष्ट वाटायचा. दि. २७ डिसेंबर २०१३ (२६ डिसेंबर संपून २७ लागलेला म्हणजे रात्री १२ नंतर...) वाढदिवस असल्याने Whats App वर सर्वांचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. पण तो अजूनही अस्वस्थ होतो, कारण अजून तिचा मेसेज आलेला नव्हता. तो येणार अशी त्याला खात्री होती... उगाचच दहा वेळा तिची chat window चेक करत होता. ती ऑनलाईन आहे हे पाहून सारखा अस्वस्थ होत होता. “पण मी अस्वस्थ का होतो? हे मला माहित नाही. खरच अस्वस्थ होण्यासारखं काही होता का ? आपण एखाद्या व्यक्तीसाठी अस्वस्थ होतो कारण त्या व्यक्तीच आपल्या आयुष्यातलं स्थान जरा खास असत म्हणून. मग तसं काही होतं म्हणून मी अस्वस्थ होतो का ?” अखेर १.३० वाजता तिचा मेसेज आला........ अॅमी : happy birthday सत्यजित : thanks मी जवळपास १० वेळा wts app चा DP उगाचच बदलण्याचा चाळा करत होतो... का ? ते ...