पुरस्कार वापसी: एक स्टंटबाजी
सध्या देशभरातील साहित्यिकांमध्ये पुरस्कार परत करण्याची लागण झाली आहे. देशात वाढत असलेली असहिष्णुता हे कारण त्यासाठी हे लोक देत आहेत. मात्र खरे कारण काहीतरी वेगळेच आहे.
लाल सलाम
पुरस्कार परत करणाऱ्या लोकांकडे नजर टाकली तर यात बहुसंख्य हे डाव्या विचारांशी बांधीलकि सांगणारे असल्याचे दिसून येते. या सर्वांना काँग्रेसने खास पोसले आहे आणि संघ व भाजप विरोधी लढण्यासाठी आपली 'राखीव फौज' म्हणून वारंवार वापरले आहे. त्याचा मोबदला म्हणून या लोकांचा भरपूर फायदाही करून दिला आहे. काही लोकांनी तर निव्वळ चाटुगिरि करण्यात धन्यता मांडली आहे (मुनव्वर राणा यांचे उदाहरण बोलके आहे). एरवी निधर्मीवादाच्या बोंबा मारणारे हे लोक काँग्रेसच्या वळचणीला गेल्यावर बिनकण्याचे होऊन जातात.
खाल्ल्या मिठाला जागायला नको ?
तर या सहित्यिकांना काँग्रेसने विविध संस्थांमध्ये नेमले, समित्यांवर नेमले, महामंडळांवर नेमले. आणि त्यांचा डावा अजेंडा सुखनैव राबवता येईल, याची सोय करून दिली. काँग्रेस सरकार होते तोपर्यंत सर्व व्यवस्थित होते, मात्र १६ मे २०१४ या दिवशी भाजपा सरकार आले आणि हे लोक अनाथ झाले. एरवी लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्या या लोकांना लोकशाही पद्धतीने निवडून आलेले भाजपा सरकार खुपायला सुरूवात झाली. त्यात नव्या सरकारने वर्षानुवर्षे असलेली यांची संस्थाने खालसा करण्याचे धोरण अवलंबले, त्यामुळे 'आम्हीच सर्वश्रेष्ठ' असा समज असणाऱ्यांची आणखीनच चिडचिड सुरु झाली. अर्थात वर्षानुवर्षे सुखनैवपणे मिळणारा चारा असा अचानक बंद झाल्यावर चिडचिड होणारच !
त्यात काँग्रेस पुरता गलितगात्र झालेला, पक्षाच्या उपाध्यक्षास वर्ष झाले तरी प्रधानमंत्री मोदी यांचे कपडे सोडल्यास अन्य मुद्दा सापडला नाही, यावरून त्यांचा वकुब ध्यानात येतो. पक्षीय पातळीवर सुमार परिस्थिति असल्याचे ध्यानात आल्यावर काँग्रेसला आठवण झाली ती आपल्या राखीव फौजेची. आणि ही फौजही खाल्ल्या मिठाला जागायची संधी मिळाल्याचे पाहुन तडक कामाला लागली आणि 'देशात अचानक असहिष्णुता कशी वाढली आणि यापूर्वी कसे आबादीआबाद होते' याचे ढोल बडवत पुरस्कार परत करु लागली.
तेव्हा झोपला होतात का ?
दादरी प्रकरण घडले ते अतिशय निषेधार्हच आहे. सरकारने अशी प्रकरणे होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र दादरीचे नाव पुढे करून देशात असहिष्णुता वाढल्याचे म्हणणाऱ्या या सहित्यिकांना पुढील काही घटना दिसत नाहीत, त्यावरून त्यांचा संधीसाधूपणा अधोरेखित होतो :
१९४८ : गांधीहत्येनंतर ब्राह्मण समाजाविरोधात झालेल्या दंगली.
१९८४ : शिखांचे शिरकाण
१९९०चे दशक : काश्मीरी पंडितांच्या कत्तली
मुजफ्फरनगर दंगल
डाव्यांच्या रासवट राजवटीत केरळ आणि प. बंगालात झालेल्या संघ स्वयंसेवकांच्या हत्या
या सर्वांचे आवडते - नक्षलवादी
आणि अशा बऱ्याच घटनांवर हे लोक मौन बाळगतात कारण त्यांचे हितसंबंध त्यात अडकलेले असतात.
खरे दुखणे
या लोकांचे खरे दुखणे म्हणजे निवडून आलेले भाजपा सरकार. वर्ष झाले तरी ही गोष्ट यांना सहन होत नाहीये, त्यामुळे ही सर्व स्टंटबाजी हे लोक करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा