दीड वर्षाने मिळाली ‘ती’ सायकल...

‘विक्रम पेंडसे सायकल्स- अ जर्नी इन्टू द पास्ट’ सायकल. आपणा सर्वांची पहिली दुचाकी. सायकल म्हटलं की अनेक गोष्टी आपसूकच डोळ्यासमोर तरळून जातात. म्हणजे अगदी हट्ट करून घेतलेली पहिली सायकल, लंगडी करत सायकल शिकणे, मित्रमंडळींसोबत सायकलच्या लावलेल्या शर्यती, सायकलला खास रेडीयम वगैरे लावून सजवणे, नियमित तेलपाणी करणे, घाईच्या वेळी सायकलची हमखास उतरणारी चेन आणि अगदी भर रस्त्यात सायकल उलटी पाडून बसवलेली ती चेन, त्यात आॅईलने माखलेले हात... एक ना दोन अशा अनेक आठवणी. विक्रम पेंडसे कालांतराने मग सर्वांच्याच आयुष्यातून सायकल रजा घेते आणि आपण मोटरसायकलला सरावतो. पण तरिही अगदी व्यायामासाठी का होईना, पुन्हा सायकलकडे वळतोच आपण. कारण आयुष्यातली पहिली गोष्ट माणूस सहसा विसरत नाही. मग ते प्रेम असो की सायकल ! आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी बाबांच्या अॅटलासच्या सायकलच्या दांडवर बसून मनसोक्त फेरफटका मारल्याचं आठवत असेलच... तर अशा या सायकलबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे पुण्यातल्या विक्रम पेंडसे या सायकलप्रेमीनं चक्क तीन मजली सायकलचं अनोखं असं संग्रहायलय उभारलय. अवघ सायकलविश्व सामावलंय त्यात. पुणे तसं सायकल...