धोका साईबाबांचा !

मार्च महिन्यात दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्ष सुनावली. या प्राध्यापक महोदयांवर नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप होता. न्यायालयात तो सिध्द होऊन या पांढरपेशा नक्षलवाद्यास आता आपले उर्वरीत आयुष्य कारागृहात कथित क्रांतीची स्वप्न पाहत घालवावे लागणार आहे. शिक्षा सुनावताना न्यायालयाने जे म्हटले आहे ते अतिशय महत्वाचे आहे, “प्राध्यापक साईबाबा हा नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करीत असल्याचे न्यायालयात सिध्द झाले आहे. प्रा. साईबाबा 90 टक्के अपंग असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे कार्यरत असून तो माओवादी चळवळीमागील प्रेरणा असल्याचे सिध्द होते. 2008 पासून गडचिरोली जिल्ह्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या बंदी घातलेल्या संघटनेचा नेता असल्याने तो जन्मठेपच नाही, तर त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र आहे.” पेशाने प्राध्यापक असलेल्या या व्यक्तीकडून नवीन पिढी घडवण्याचे काम होणे अपेक्षित असताना देशविघातक अशा नक्षल चळवळीत त्याचे असलेले सक्रीय योगदान हे विचारी जनांना नक्कीच काळजीत टाकणारे आहे. पिढी घडविणारी व्यक्तीच जर देशविघातक अशा ...